यातील मुख्य घटक गोठा व्यवस्थापन यातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. त्यासाठी जनावरांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. आज आपण एक आदर्श गोठा कसा असावा याबद्दल माहिती घेणार आहोत.भारतामध्ये भौगोलिक परिस्थती व हवामान यात विविधता आढळते त्यासाठी स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा व हवामानाचा अभ्यास करून बैल/ गाई /म्हशींना निवारा उपलब्ध करणे आवश्यक असते. दुग्धव्यवसाय करणेसाठी गाई म्हशी खरेदी करण्यापूर्वी गाई म्हशींसाठी सुयोग्य आणि मोठे गोठे उभारावेत. गोठा बांधताना भविष्यातील विस्तार विचारात घेऊन आराखडा तयार करावा.
साधारणतः गाई म्हशींची संख्या सोळा पर्यंत असेल तर एकेरी पद्धतीचा गोठा उभारावा व सोळा पेक्षा जास्त संख्या असेल तर दुहेरी पद्धतीचा गोठा उभारावा. या पद्धतीत गाई म्हशी तोंडासमोर तोंड अश्याया पद्धतीने किंवा शेपटीकडे शेपटी अश्या पद्धतीने रचना करता येईल. अशा रचनेत मध्यवर्ती दोन मीटर रुंदीचा रस्ता दोन ओळीत ठेवावा या पद्धतीत दूध काढणी सोयीची होते. भिंतींकडे तोंड असल्यामुळे शुद्ध हवा मिळेल व संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता कमी असते.गोठ्यातील गाई म्हशी बसण्याच्या जागेवर सिमेंट काँक्रीट चा कोबा किंवा खरबडीत फरशी बसवावी. गायी म्हशींचे मूत्र व शेणाची विल्हेवाट लावण्यासाठी शेपटाकडील भागात नाली असावी.
गोठ्याची उंची साधारणतः चौदा ते पंधरा फूट असावी. यापैकी आठ फूट भिंतीचे बांधकाम घेऊन यावर दुप्पट खिडकी ठेवावी. छतासाठी लाकडी किंवा लोखंडी छत वापरता येईल. छताचा भाग भिंतीच्या बाहेर सुमारे तीन चार फूट घ्यावा, म्हणजे पावसाचा ओलावा किंवा उन्हाळ्यात गरम हवा आत येणार नाही. प्रत्तेक गाईला उभे राहण्यासाठी सुमारे दीड ते पावणेदोन मीटर लांब रुंद जागा गोठयात असावी. गायी म्हशींची जात त्यांचे आकारमान लक्षात घेऊन बदल करावा.गायी म्हशींना व्यायामासाठी मोकळी जागा असावी. त्यामुळे आरोग्य चांगले राखले जाते. व त्यासाठी गोठ्यालगत कुंपण घालून आवार तयार करणे.
भारतामध्ये भौगोलिक परिस्थती व हवामान यात विविधता आढळते त्यासाठी स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा व हवामानाचा अभ्यास करून बैल/ गाई /म्हशींना निवारा उपलब्ध करणे आवश्यक असते. दुग्धव्यवसाय करणेसाठी गाई म्हशी खरेदी करण्यापूर्वी गाई म्हशींसाठी सुयोग्य आणि मोठे गोठे उभारावेत. गोठा बांधताना भविष्यातील विस्तार विचारात घेऊन आराखडा तयार करावा. साधारणतः गाई म्हशींची संख्या सोळा पर्यंत असेल तर एकेरी पद्धतीचा गोठा उभारावा व सोळा पेक्षा जास्त संख्या असेल तर दुहेरी पद्धतीचा गोठा उभारावा.
Share your comments