आयसीएआरने विकसीत केले मिरचीचे नवीन वाण; या खरीप हंगात येईल भरघोस उत्पन्न

09 February 2021 11:22 PM By: भरत भास्कर जाधव
ICAR ने  विकसीत केली  नवी हायब्रीड वाण

ICAR ने विकसीत केली नवी हायब्रीड वाण

देशात अनेक शेतकरी मिरचीचे उत्पादन घेत असतात. मिरची मसाल्याच्या पदार्थातील सर्वात महत्वाचा घटक आहे. हिरवी मिरची आणि लाल मिरचीला बाजारात चांगला भाव मिळत असतो हे आपणांस परिचिती आहे, पण मिरचीचे उत्पन्न घेत असताना अनेक प्रकारचे रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. यातील एक असा रोग हा ज्यामुळे पुर्ण देशातील शेतकरी चिंताग्रस्त होत असतात.

हा रोग आहे, एलसीव्ही (LCV) leaf curl virus चुरडामुरडा रोग. पण शेतकरी बांधवांनो आता या रोगापासून आपली सुटका होणार आहे, कारण ICAR- Indian Institute of Horticulture Research (IIHR), Bengaluru आयसीएआर- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फलोत्पादन संशोधन (आयआयएचआर), बेंगलुरूने एक हायब्रीड मिरची वाणाचे संशोधन केले आहे. या वाणाला हा चुरडामुरडा रोग लागत नसल्याचा दावा संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. चुरडामुरडा या रोगामुळे मिरची उत्पादकांचे मोठे नुकसान होत असते.

या रोगाला विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, कुठे चुरडामुरडा, घुबड्या, कोकड्या, बोकड्या या नावाने या रोगास ओळखले जाते. दरम्यान हा विषाणूजन्य रोग य्सून याचा कुठेही उपाय नाही. या विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे, पांढरी माशी, मावा,तुडतुडे, रस शोषणाऱ्या  किडीमार्फत होत असल्याने त्यांना या रोगाचे वाहक म्हणतात. पिकास या रोगाची लागण झाल्यास मिरचीच्या पानांचा आकार बदलून ती काठाकडून गुंडाळली जातात.पाने गुंडाळल्यामुळे झाड बोकडल्यासारखे दिसते.

 

झाडाची वाढ खुंटते. मिरचीच्या अशा झाडांना फुले लागत नाहीत.फुलांचे फळात रुपांतर होत नाही. या रोगामुळे ९० टक्के पिकांचे नुकसान होत असते. यामुळेच आम्ही पुढील खरीप हंगामाकरिता एलसीव्हीला रोखणाऱ्या हायब्रीड मिरचीचा वाण तयार केल्याची माहिती आयआयएचआर चे संचालक श्री. दिनेश यांनी दिली.आम्ही पारंपारिक प्रजनन पद्धतीद्वारे जवळपास 55 संकरित विकसित केले आहेत ज्यात सूक्ष्म जंतू वेगवेगळ्या ठिकाणांवरून तपासले जातात. यापैकी पाच संकरित एलसीव्हीला सातत्याने प्रतिरोध दर्शवित आहेत आणि त्यांचे निरंतर प्रतिकार होत आहेत आणि आता त्यांचे व्यापारीकरण करण्यात आले असल्याचे, ”आयआयएचआर बेंगळूरु येथील भाजीपाला पिके प्रमुख विभाग माधवी रेड्डी के म्हणाल्या.

माधवी रेड्डी ह्या एलसीव्ही रोखणाऱ्या मिरची वाण तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांची टीमचे नेतृत्त्व करत आहेत.

ICAR chilli leaf curl virus LCV चुरडामुरडा एलसीव्ही आयसीएआर Indian Institute of Horticulture Research (IIHR) Bengaluru इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फलोत्पादन संशोधन (आयआयएचआर)
English Summary: ICAR develops new varieties of chilli ; This kharif season will bring in a lot of income

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.