देशातील सर्व कामगार आणि मजुरांसाठी ई श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे. कारण याद्वारे सरकार मजूर आणि कामगारांसाठी नवीन योजना बनवू शकते. याद्वारे नवीन धोरणे बनवली जाऊ शकतात आणि त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात.
केंद्र सरकारने सर्वसामान्य, हातावरील पोट असलेल्यांसह असंघटित कामगारांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांच्या लाभासाठी ई-श्रम लाभार्थींना नोंदणी करावी लागते.
काही योजनांचा लाभ बँकांच्या माध्यमातून दिला जातो. बँकेतील बचत अथवा जनधन खात्यातून
योजनेचा हप्ता कपात केला जातो. आतापर्यंत देठाभरातीळ २५ कोटी ५८ लाख २२ हजार २४६ जणांनी विविध योजनांमध्ये नोंदणी करून केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या द्वारे नोंदणी करून श्रमकार्ड घेतले आहे.
असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही.
या योजनेचे उद्दिष्ट
वृध्दपकाळ आरामदायी जावा, उदरनिर्वाहासाठी ज्येष्ठांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पेंशन तथा निवृत्ती वेतन योजना सुरु केल्या आहेत.
तर हातावरीळ पोट असलेल्या दोनवेळच्या जेवणासाठी धडपडणाऱ्यांना आजारपणात मोफत उपचार मिळावेत, त्यासाठी योजना आहेत. असंघटित कामगारांसह विविध घटकांचा त्यात योजनांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कोण अर्ज करू शकतं?
या योजने साठी केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरीच नोंदणी करू शकतात. सधन शेतकरी वा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत, त्यांना या ठिकाणी नोंदणी करता येत नाही.
कुठे करावा अर्ज ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन केंद्रांवर अथवा आपले सरकार सेवा केंद्रांवरून अर्ज करावा लागेल. सामान्य सुविधा केंद्र, राज्य सेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र आणि पोस्ट ऑफिसचे डिजिटल सेवा केंद्र इत्यादी ठिकाणीही नोंदणी करता येऊ शकते.
Share your comments