जर आपण तंत्रज्ञानाचा वापर केला तर तो आता प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. याला कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही. कृषी क्षेत्रामध्ये देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आले असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना आता उत्पादन वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. या दृष्टिकोनातून जर आपण शेतीचा विचार केला तर शेतीसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. पाण्याशिवाय शेती शक्यच नाही.
बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की पाऊस कमी पडल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण पडतो किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते व शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते.
परंतु या दृष्टिकोनातून देखील एक महत्वपूर्ण तंत्रज्ञान येऊ घातले असून पाण्याची टंचाई जरी शेतीसाठी असली तरी या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी बंधू चांगले उत्पादन घेऊ शकतात. हे तंत्रज्ञान म्हणजे हायड्रोजल तंत्रज्ञान होय.
काय आहे नेमके हायड्रोजल तंत्रज्ञान?
शेतकरी बंधूंनी हायड्रोजल तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर शेतकरी बंधू कमीत कमी खर्चात आणि कमी पाण्यात देखील अधिक उत्पादन घेऊ शकतात.
करण्यात आलेल्या दाव्यानुसार या तंत्रज्ञानाचा वापर करून 30% पर्यंत अधिक शेती उत्पादन मिळणे शक्य आहे. पाण्याचे टंचाई असताना भारतीय शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हायड्रोजल तयार केले असून जे दुष्काळग्रस्त भागाच्या शेतीसाठी खूप महत्त्वाचे ठरू शकते.
सिंचनाची कमी साधने किंवा पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. हायड्रोजल एक जल असून ते पाण्यात मिसळतात जास्तीत जास्त पाणी शोषून घेते.
ते झाडाच्या मुळांजवळ राहते व मुळाना पाण्याची सर्वाधिक कमतरता असते. हायड्रोजनचा वापर तीन ते चार वेळा करता येणे शक्य आहे. हे जेल सहसा गवार गम किंवा त्यापासून बनवलेल्या पावडर पासून बनवले जाते. हायड्रोजल तंत्रज्ञान हे रांची येथील इंडियन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रेसिन अँड गम मध्ये विकसित करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर पिकासाठी कॅप्सूल किंवा गोळ्यांच्या स्वरूपामध्ये केला जातो.
समजा तुम्हाला या हायड्रोजनचा एका एकर क्षेत्रासाठी वापर करायचा आहे तर दोन ते तीन किलो हायड्रोजल पुरेसे ठरते. अगदी उन्हाळ्यामध्ये 40 ते 50° c तापमानात देखील ते खराब होत नाही. प्रदूषणमुक्त असलेले हे तंत्रज्ञान शेतीत वापरल्याने शेतीतील व परिसरातील भूजल पातळीत देखील सुधारणा करता येणे शक्य आहे. हायड्रोजलचा वापर केल्याने 50 ते 70 टक्के पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.
Share your comments