1. कृषीपीडिया

शेतकरी दादांनो! पिकांच्या पांढऱ्या मुळी वाढवण्यासाठी ह्युमिक ऍसिड आहे उपयुक्त, घरी बनवायचे तर वापरा ही पद्धत

ह्युमिक ऍसिड बरेच शेतकरी शेतीमध्ये वापरतात. जर आपण सद्य परिस्थितीचा विचार केला तर शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत असून सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेले पोषक घटक वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल सध्या वाढत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
humic acid is benificial for crop that help to growth white root

humic acid is benificial for crop that help to growth white root

ह्युमिक ऍसिड बरेच शेतकरी शेतीमध्ये वापरतात. जर आपण सद्य परिस्थितीचा विचार केला तर शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत असून सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेले पोषक घटक वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल सध्या वाढत आहे.

जर आपण सेंद्रिय शेतीचा विचार केला तरी यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे ह्युमिक ऍसिड हा होय. ह्युमिक ऍसिड चे पिकांना होणारे फायदे भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे हे आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो. या लेखामध्ये आपण ह्युमिक ऍसिड घरच्या घरी बनवण्याची पद्धत जाणून घेणार आहोत.

नक्की वाचा:केळी उत्पादकांसाठी मोलाचा सल्ला! खूपच कडक ऊन आहे तर मग अशा पद्धतीने घ्या लहानशा केळीच्या रोपाची काळजी

 अशा पद्धतीने घरच्या घरी बनवा ह्यूमिक ऍसिड ( एक एकर साठीची पद्धत )

1- लागणारे साहित्य- यासाठी जुन्या गोवऱ्या, दोन किलो गूळ, दीड ते दोन किलो दही आणि शंभर लिटर पाणी घ्यावे.

2- ह्युमिक ऍसिड बनवण्याची कृती- एक मोठा ड्रम किंवा भांडे घ्यावे. यामध्ये पाणी भरावे व या पाण्यामध्ये गोवऱ्या  टाकाव्यात. त्यानंतर 100 लिटर पाण्यात गुळ टाकायचा आहे.

नंतर हे मिश्रण चांगल्याप्रकारे ढवळून घ्यायचे आहे. ढवल्या नंतर यामध्ये दही टाकावे. गोवऱ्या, दही आणि गूळ पिकांच्या पांढऱ्या मुळासाठी उपयुक्त असते. हे मिश्रण पाच ते सहा दिवस व्यवस्थित झाकून ठेवावे परंतु महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी हे मिश्रण एका चांगल्या काठीने व्यवस्थित ढवळायचे आहे. त्याला सहा दिवस पूर्ण झाल्यानंतर 100 लिटर पाण्याचे मिश्रण 200 लिटर च्या ड्रममध्ये टाकायचे. आणि यामध्ये 100 लिटर पाणी घालायचे आहे. त्यानंतर हे सगळे मिश्रण व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे व ड्रीप द्वारे किंवा पाण्यातून देखील देता येते. एक एकर पिकांना हे मिश्रण  उपयुक्त ठरते. आठ दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवू नये म्हणजे जास्तीत जास्त आठ दिवसांमध्ये याचा वापर होणे महत्त्वाचे आहे. यापेक्षा जास्त दिवस झाले तर हे मिश्रण पिकांना देऊ नये.

शक्य तितक्या लवकर वापरायचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे मिश्रण तुम्ही भाजीपाला किंवा कोणत्याही प्रकारच्या पिकांसाठी आणि फळबागेसाठी वापरू शकतात. महिन्यातून दोनदा पिकांना पुरवले तर खूप फायदा मिळतो.

नक्की वाचा:मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना ठरेल एक टर्निंग पॉइंट, मिळेल भक्कम आर्थिक मदत

 ह्यूमिक एसिड चे फायदे

1- पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ जलद होते.

2- मातीला तडे जाणे, पृष्ठभागावरून पाण्याचा बहाव कमी करते आणि मातीची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

3- ह्युमिक ऍसिड मुळे मातीचे पाणी साठवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे पाण्याचा ताण पडला तर पिकांची प्रतिकार करण्याची ताकद वाढते.

4- ह्युमिक ऍसिडचा वापर आणि मातीचा रंग गडद होतो त्यामुळे सूर्याची ऊर्जा शोषणास मदत होते.

5- अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेण्याची क्षमता सुधारते.

6- ह्युमिक ऍसिड अनेक  जैविक प्रक्रियांमध्ये सेंद्रिय उत्प्रेरक म्हणून काम करते.

English Summary: humic acid is benificial for crop that help to growth white root Published on: 21 April 2022, 08:03 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters