पुरातन काळापासून आयुर्वेदामध्ये तुळशीला महत्वाचे स्थान मिळाले आहे. तुळशी मध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे तसेच अनेक आजारांवर तुळस ही गुणकारी आणि लाभकारी ठरते. सध्या तुळशीला मार्केट मध्ये सुद्धा प्रचंड मागणी आहे. तुळशीला सर्वात जास्त मागणी ही औषधें निर्मीती करणाऱ्या कंपन्यांची आहे.तुळशीचा उपयोग अनेक आजारांवर केला जातो त्यामध्ये दमा, सर्दी, खोकला,व्रण, डोकेदुखी,अपचन, आणि विविध पोटाचे आजार यापासून बचाव करण्यासाठी तुळशीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच थंडीच्या दिवसात तुळशीचा काढा पीने आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. तुळशीची पाने, मुळे,बिया यामध्ये औषधी गुणधर्म असतात.
तुळशीची शेती:-
सध्या बाजारात तुळशीला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच आपल्या देशामध्ये तुळशीला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून पाहिले जाते. सध्या काही औषध कंपन्यांना मोठ्या प्रमाणात तुळशीची आवश्यकता असल्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा तुळशीची लागवड करत आहेत. तुळशीचा सर्वात जास्त उपयोग औषध निर्मितीसाठी केला गेल्यामुळे तुळशीला प्रचंड मागणी आहे.
तुळशीचे विविध प्रकार:-
तुळशीचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये
1)तुळशी किंवा फ्रेंच तुळशी -स्वीट फ्रेंच तुळस किंवा बोबाई तुळशी हे प्रकार आहेत
2)काळी तुळशी, वन तुळशी आणि राम तुळशी
3)होळी तुळशी,जंगली तुळशी आणि कर्पर तुळशी
4)श्री तुळशी आणि रामा तुळशी
लागवडीसाठी खर्च:-
इतर पिकांच्या तुलनेत खर्च हा खूप कमी येतो. तुळशी चे रोप लागवडीनंतर सर्वात प्रथम सिंचन केले जाते. त्यानंतर खते तसेच पाण्याचे योग्य नियोजन करावे लागते. रोपांचा संपूर्ण कालावधी हा 100 दिवसांचा असतो. तुळशीचीच्या कापणीसाठी योग्य वेळ ही उन्हाळ्यात असते. २.३० गुंठा जमिनीवर लागवड करण्यासाठी सुमारे १५०० रुपये खर्च येतो. आणि यातून मिळणारे उत्पन्न हे लाखो रुपये असते.
तुळशीचे फायदे:-
तुळस ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. तुळशीच्या बिया, पाने,मुळे यांमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म असतात सर्वात जास्त उपयोग हा औषध निर्मितीसाठी केला जातो त्यामुळे बाजारात तुळशीला प्रचंड मागणी आहे. तुळशी चा उपयोग अनेक आजारांवर केला जातो सर्दी खोकला ताप थंडी अश्या हजारो आजारांवर तुळशी गुणकारी असल्यामुळे पुरातन काळापासून तुळशीला आयुर्वेदामध्ये महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
Share your comments