1. कृषीपीडिया

जाणून घ्या जिप्समचा वापर केव्हा, का, कसा करावा? असे केल्यास होईल फायदा

शेतीसाठी कॅल्शिअम तसेच सल्फर चा वापर करत नसल्यामुळे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जाणून घ्या जिप्समचा वापर केव्हा, का, कसा करावा? असे केल्यास होईल फायदा

जाणून घ्या जिप्समचा वापर केव्हा, का, कसा करावा? असे केल्यास होईल फायदा

शेतीसाठी कॅल्शिअम तसेच सल्फर चा वापर करत नसल्यामुळे जमिनीमध्ये सल्फर , कॅल्शिअम ची कमतरता भासत आहे. जिथे सघन शेती केली जाते अश्या जमिनीमध्ये कॅल्शिअमची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे जिप्सम चा वापर केला जातो.

जिप्समचे रासायनिक नाव कॅल्शियम सल्फेट असून त्यामध्ये २३.३ टक्के कॅल्शियम आणि १८.५ टक्के सल्फर असते. जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला जमिनीचे आरोग्य जाणून घेणे गरजेचे आहे. जमिनीच्या गुणवत्तेवर पिकाची वाढ, उत्पादन , उत्पन्न अवलंबून असते. जर जमिनीमध्ये कॅल्शिअम ची कमी असेल तर त्याचा वाईट परिणाम पिकांवर होतो. अश्यावेळेस शेतकरी मातीचे आरोग्य टिकून राहावे यासाठी जिप्सम चा वापर करतात.

साधारणतः शेतकरी शेतीसाठी नायट्रोजन, पोटॅशिअम, फॉस्फरस चा वापर करतात. 

जाणून घेऊ जिप्समचे फायदे

जिप्सम कॅल्शिअम तसेच सल्फर ची कमतरता भरून काढून पिकांच्या मुळाचा वाढीस मदत करते.जिप्सम मध्ये मुबलक प्रमाणात सल्फर उपलब्ध असल्यामुळे पिकांचे संरक्षण होते.तेलबिया पीक घेतांना जिप्सम चा वापर केल्यास पीक, तेल यांच्या सुवासासाठी उपयुक्त ठरते.जिप्सम चा वापर केल्यास मातीतील कॅल्शिअम बरोबर नायट्रोजन, फॉसफरस, पोटॅशिअम यांची वाढ होते.जिप्सम जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.

जिप्सम चा वापर करतांना काय काळजी घ्यावी?

जिप्सम ला जमिनीपासून थोडे वर ठेवावे तसेच नरम जागी ठेवण्यापासून टाळावे.

मृदा परीक्षण करूनच जिप्सीमचे प्रमाण ठरवावेत.जोरदार हवा असेल तर जिप्समचा छिडकाव करू नका.संपूर्ण शेतामध्ये जिप्सम चा समान प्रमाणात छिडकाव करावा.जिप्सम चा छिडकाव केल्यानंतर माती चांगल्याप्रकारे मिसळून घ्यावी.लहान मुलांपासून जिप्समला दूर ठेवावेत.

मातीचे आरोग्य टिकून राहावे यासाठी जिप्समचा वापर करणे फायद्याचे ठरते.

जमिनीमध्ये कॅल्शियम कमी असण्याचे लक्षणे 

कॅल्शिअम ची कमतरता असेल तर पानांचा काही भाग पांढरा होतो. झाडांची पाने आकसून जाऊन मोडतात.

कॅल्शिअम जास्त प्रमाणात कमी असेल तर पिकांची वाढ खुंटते.पीक सुकण्यास सुरुवात होते.

जिप्सम चा वापर कसा करावा?

जिप्सम ला पीक लागवड करण्यापूर्वी जमिनीला दिले जाते.जिप्सम टाकण्यापूर्वी जमीन २ ते ३ वेळा चांगली नांगरून घ्यावी.जिप्सम त्यानंतर मातीमध्ये मिसळावेत.साधरणतः प्रति हेक्टर १० ते २० किलो कॅल्शिअम भात त १५ किलो कॅल्शिअम कडधान्य जमिनीमधून घेतात.

शेतकरी मातीचे आरोग्य टिकून राहावे यासाठी जिप्सम चा वापर करतात.

English Summary: how to use why when of gypsum do this will benefit Published on: 23 April 2022, 02:04 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters