1. कृषीपीडिया

पावसाळ्यात किट व्यवस्थापनासाठी पिकांची कशी काळजी घ्यावी

खरीप हंगाम हा नेहमी भरगोस पीक देऊन जात असतो.खरिपातील पिके पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. तसेच पावसाच्या उघडझाप झाल्यामुळे अनेक किडी व बुरशीजन्य रोग फैलावण्यास पोषक वातावरण तयार होत असते

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पावसाळ्यात किट व्यवस्थापनासाठी पिकांची कशी काळजी घ्यावी

पावसाळ्यात किट व्यवस्थापनासाठी पिकांची कशी काळजी घ्यावी

किडींचा प्रादुर्भाव दुपटीने वाढत असतो म्हणूनच योग्य खत नियोजनासोबत किडीं व रोगांसाठी प्रतिबंध व नियंत्रण उपाय अंमलात आणावे.

रोग प्रतिकारक्षम वाणाची लागवडीसाठी निवड करावी.

खरिपात कोणत्याही पिकांची लागवड करण्याआधी भविष्यात होणाऱ्या बुरशीजन्य रोगांना आळा घालण्यासाठी बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी.जसे सोयाबीन मधील तांबेऱ्यासाठी बियाना ट्रायकोडर्मा किंवा थायरम ने बीज प्रकिया करावी.पिकावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाल्यास किंवा होण्या आधी प्रतिबंध म्हणून हेक्झाकोनॅझोल(0.15%) या बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.

पिकाची कायिक वाढ होत असताना पिकाचे सतत निरीक्षण करावे. किडींच्या विविध अवस्था अभ्यासाव्यात.

भातासारख्या पिकामध्ये पाण्याची पातळी 5 सेमी इतकी ठेवावी.बाकी पिकामध्ये तुंबणारे पाणी शेताबाहेर काढून द्यावे.

ऊसामध्ये झालेल्या हुमणी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी मेटरझियम एनीसोपली नावाची बुरशी शेतामध्ये टाकावी.

शक्य असल्यास सरीमध्ये पाणी तुंबवावे.

वांगी-टोमॅटो यांसारख्या पिकावर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो.ही पिके घेणे शक्यतो टाळावी.जरी घेत असाल तर एकात्मिक किट व्यवस्थापन अवलंबवावे.

वांग्यात शेंडे आणि फळ अळी तसेच टोमॅटोमध्ये नागअळीचा प्रादुभाव मोठ्या प्रमाणात वाढतो.

पिकामध्ये येणारी कीड ओळखून त्यानुसार सुरवातीपासूनच कामगंध सापळे लावून घ्यावेत.सापळ्यात पतंगांची संख्या जास्त सापडत असेल तर सापळ्यांची संख्या वाढवावी.

पावसाळ्यात खराब न होणारे पिवळे व निळे चिकट सापळे वापरावेत.

मोहरी,झेंडू,यांसारख्या सापळा पिकांचा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वापर करावा.लष्करी अळीसाठी मक्का व एरंड या सापळा पिकांचा वापर करावा.

कीटकनाशकांचा वापर संतुलित ठेवावा.जेणे करून या काळात किडीमध्ये प्रतिरोध क्षमता तयार होणार नाही.

 

संकलन - IPM school

महेश कदम हातकणंगले

 

 

English Summary: How to take care of crops for pest management in rainy season Published on: 06 October 2021, 08:11 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters