N:P:K व इतर अन्नद्रव्यांच्या पुर्ततेसाठी रासायनिक खतांच्या शिवाय नैसर्गिक पर्यायांवर आधारीत निविष्ठांची माहिती बागायतदार मंडळीना दिल्यास "नैसर्गिक शेती" मध्ये सुद्धा उत्कृष्ट व गुणवत्तेवर आधारीत भरघोस उत्पादन घेता येते. त्याआधारीत वैज्ञानिक संदर्भासह माहिती व जनजागरण करणे हेच ध्येय 'निसर्ग फाऊंडेशन, अमरावती' या संस्थेचे आहे.
"मासोळी खत" द्वारे नत्र (नायट्रोजन-N) व अमीनो ॲसीड चा जमिनीत भरपूर पुरवठा होतो."Masoli Manure" provides abundant supply of nitrogen (Nitrogen-N) and amino acids to the soil. करीता नत्रयुक्त युरीया,
पाच हजार रुपये प्रति महिना पेन्शन देणारी 'ही' योजना; जाणून घ्या
अमोनियम सल्फेट व अमोनियम नायट्रेट या रासायनिक खतांपेक्षा 'मासोळी खत' उत्तम असते.बोन पावडर या निसर्ग निर्मीत हाड-मासाचे वेस्टेज खतात फॉस्फरस (स्फुरद-P), कॅल्शियम व थोडेसे नत्र मिळेल. म्हणूनच सुपर फॉस्फेट (SSP), डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) या स्फुरदयुक्त
(Phosphate) रासायनिक खतांपेक्षा नैसर्गीक "बोन पावडर" हा अतिशय उत्तम व सरस पर्याय आहे."ऊस मळी" वर मेटॅरीझीयम या मीत्र बुरशी ची प्रक्रिया करून शेतीत वापरल्यास खुप मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरीत्या पालाश (पोटॅश -K) ची निर्मीती करते. त्यामुळेच पोटॅश युक्त रासायनिक खत 'म्युरेट ऑफ पोटॅश' साठी हा नैसर्गिक पर्याय ठरतो.'जिप्सम' चिकट, चिबाड व पाणी धरून ठेवणाऱ्या जमीनी करीता याचा उपयोग भु-सूधारक म्हणुन करतात. 'जिप्सम' च्या वापराने जमिनीतील क्षारांचे
विलगीकरण होवून जमीन भुसभुशीत होते. याशिवाय 'जिप्सम' हा मुख्य किंवा प्राथमिक खते N:P:K नंतर च्या दुय्यम खते Ca:Mg:S (कॅल्शियम:मॅग्नेशिअम:सल्फर) मधील कॅल्शियम व सल्फर चा नैसर्गिक स्त्रोत आहे.करीता वारंवार होत असलेल्या ओलीताच्या शेतीमुळे जमिनीतील 'सल्फर' कमी होऊन इतरही अन्नद्रव्यांची उपलब्धता व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव फळ-शेतीत वाढिस लागला आहे. अशा परिस्थितीत 'सल्फर' पुरवठा करणाऱ्या नैसर्गिक 'जिप्सम' चा वापर अतीशय महत्वाचा ठरतो.
संकलन - पंकज काळे (M.Sc. Agri), निसर्ग फाऊंडेशन, अमरावती
संपर्क -९४०३४२६०९६, ७३५०५८०३११
Share your comments