MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

उन्हाळ्यात शेतीचे व्यवस्थापन कसे करावे ?

वर्षातील उन्हाळा हा खरं तर अभूतपूर्व आहे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
उन्हाळ्यात शेतीचे व्यवस्थापन कसे करावे ?

उन्हाळ्यात शेतीचे व्यवस्थापन कसे करावे ?

वर्षातील उन्हाळा हा खरं तर अभूतपूर्व आहे.हे एप्रिल महिन्यात पडलेले भयंकर ऊनया पूर्वी आपण कधीच अनुभवले नव्हते. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे जागतिक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिग याची ही सुरुवात. अश्या बदललेल्या परिस्थितीत शेती चे व्यवस्थापन सुद्धा आपल्याला बदलावे लागेल.

यासाठीच आपणासर्वांसाठी यंदा च्या उन्हाळ्यात शेतीचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत काही मार्गदर्शक बाबी सुचविल्या आहेत. या बाबीचा आपण अवलंब केल्यास सर्वांना फायदा होणार हे नक्की !

फवारणी आणि सिंचन

विशेष पिकांना पाणी देताना किंवा फवारणी करतानासंध्याकाळी ६ नंतर करावी . भरदुपारी कडक उन्हात पिकांना पाणी देऊ नये.यामुळे झाडांच्या पांढरी मुळीला शॉक बसण्याचीशक्यता असते. फळबागा आणि ज्या पिकाचा सध्या माल चालू आहे म्हणजे वेलवर्गीय भाजीपाला यांचे सिंचन व्यवस्थापन योग्य करवे.

पालेभाजी लागवड विशेष

उन्हाळी हंगामात अनेक शेतकरी मेथी , कोथिंबीर,पालक, शेपू अश्या पालेभाजी लागवड करण्याला प्राधान्य देतात.पालेभाजी लागवड करण्यापूर्वी जमिनीला चांगले पाणी द्यावे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जमीन पोट भरून पाणी पिली पाहिजे.पाणी दिल्यानंतर जमीन वाफसा अवस्थेत आल्यावर पालेभाजी लावावी . लागवड करण्यापूर्वी बियांना जैवि क बुरशीनाशक वापरावे यामुळे मर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो .

फळबागा विशेष

राज्यात अनेक डाळिंब, मोसंबी , लिंबू, केळी उत्पादकशेतकरी आहेत.आज अनेक बागा सेटिंग अवस्थेत किंवा बहार अवस्थेत आहेत अश्या सर्व फळ उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. कारणया वर्षीचा उन्हाळा अत्यंत कडक स्वरूपाचा आहे. जर ठिबक सिंचनाचा वापर करून झाडाची पाण्याची भूक भागत नसेल तर पाट पाणी म्हणजे मोकळ्या पद्धतीने पाणी देऊ शकता .ठिबक आणि गरजेनुसार मोकळे पाणी दिल्याने झाडांची उत्तम व्यवस्था होते.आपल्या जमिनीच्या प्रकारा नुसार आणि आपल्या भागातील ऊनयांचा विचार करून वरील सांगितल्याप्रमाणे नियोजन करावे.

रोप लागवड

उन्हाळी हंगामात कारली , दोडका , काकडी , टोमॅटो ,मिरची इत्यादी ची लागवड अनेक शेतकरी बांधवकरतात. लागवड करताना अगोदर यांची शेडनेट मध्ये रोपे तयार करून घ्यावीत. नंतर यांची शेतात पुनर्लागवड करावी . यामुळे रोप मर होण्याचे प्रमाण कमी होते.वरील पद्धतीमुळे आपल्याला सशक्त आणि जोमदार रोपे लागवड करण्याचा निवडता येतात.रोपे पुनर्लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली भिजवून घेणे आवश्यक आहे.

विशेष बाबी

कडक उन्हामुळे सिंचन कालावधी कमी करणे गरजेचे आहे.म्हणजे जर आपण अगोदर. पिकाला ५ व्या दिवशी पाणी देत असेल तर आता ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी देणे गरजेचे आहे. ज्या पिकांना माल चालू आहे विशेषत वेलवर्गीय भाजीपाला अश्या पिकांना आपण एका दिवसा आड एका सरी आड पाणी द्यावे. म्हनजे सोमवारी सरी क्रमांक १, ३,५,७,९ तर मंगळवारी सरी क्रमांक २,४,६,८ पुन्हा बुधवारी सरी क्रमांक १,३,५,७,९ अश्या पद्धतीने पाणी द्यावे. 

ही पद्धती आपण कोणत्याही पिकाला वापरू शकता यामुळेजमीन ओलसर राहते आणि पिकांना याचा फायदा होतो .टरबूज खरबूज पिके काढणीसाठी तयार झाली असेल तर त्याची काढणी करून घ्यावी .भर दुपारी शेतात काम करणे टाळावे.

पशु काळजी

आपल्या सर्व जनावरांना झाडाच्या सावलीत किंवा गोठ्यातबांधावे.लहान करडे, वासरे या ना ऊन लागणार नाही याचीकाळजीघ्यावी .जनावरांना स्वच्छ आणि थंड पाणी पिण्यास द्यावे.पोल्ट्री फार्म, गोट फार्म किंवा बंदिस्त गौ पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्या वी .दुभत्या जनावरांना आवश्यक प्रमाणात, पौष्टिक आणि पचनास हलका असा चारा द्यावा .शक्य असल्यास गोठ्या भोवती गोणपाट शिवून तयार केलेले पडदे बांधा वेत आणि हे पडदे वेळेला ओले करावेत यामुळे गोठ्यात थंडावा राहतो 

English Summary: How to manage the farm in the summer? Published on: 10 April 2022, 09:04 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters