कोणत्याही पिकाची सेटिंग करण्यास मदत करते. झाडांची व फुलांची,फळांची सेटिंग चांगली होती.ऍमिनो ऍसिड हे सेंद्रिय पद्धतीने घरच्या घरी कमी खर्चात कसे बनवायचे हे पाहणार आहोत.अमिनो ऍसिड बनवण्याच्या दोन पद्धती आहेत त्यामध्ये शाकाहारी ऍमिनो ऍसिड आणि दुसरे मांसाहारी ऍमिनो ऍसिड आपण यामध्ये सोपे आणि सुलभ पद्धत म्हणजे शाकाहारी, कसे बनवायचे हे
बघणार आहोत.शाकाहारी ऍमिनो ऍसिडयासाठी लागणाऱ्या वस्तू Ingredients for Vegetarian Amino Acids- एक किलो गूळ, एक किलो सोयाबीन आणि 150 ग्रॅम बेसन पीठ (बेसन पीठ नसले तरी चालेल),
स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी १०४ कोटी ५० लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता
पाच लिटर पाण्याची टाकी किंवा भांडे.प्रक्रिया - सर्वप्रथम आपल्याला एक किलो सोयाबीन पाच लिटर पाण्यामध्ये आठ तास भिजत घालायचे
आहेत नंतर ते भिजलेले सोयाबीन आहेत असे त्या पाण्याबरोबर मिक्सरमधून बारीक करून काढायचे आणि त्यामध्ये एक किलो गूळ आणि 150 ग्रॅम बेसन पीठ बारीक करून टाकायचे आहे . जर पाणी पाच लिटर पेक्षा कमी झाले असेल तर त्यामध्ये पाच लिटर पाणी होईल एवढे पाणी टाकावे .ॲमिनो ॲसिड बनण्यासाठी सात दिवसाचा कालावधी लागतो .
सात दिवस आपल्याला ते मिश्रण रोज सकाळी काठीच्या साह्याने हलवायचे आहे.सात दिवसांनी ते मिश्रण सुती कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे. आत्ता ते पूर्ण पणे फवारणे योग्य ॲमिनो ॲसिड तयार झालेले आहे.फवारायचे प्रमाण- 500 मिली प्रति 15 लिटर पाण्यात फवारायचे आहे. दहा दिवसाच्या अंतराने फवारणी घेतल्यास योग्य तो परिणाम आपल्याला दिसून येईल.
Share your comments