1. कृषीपीडिया

कोणती आहेत हिरवळीचे खते तयार करण्यासाठी लागणारी पिके आणि त्याचे फायदे

KJ Maharashtra
KJ Maharashtra
green fertilizer

green fertilizer

कोणती आहेत हिरवळीचे खते तयार करण्यासाठी लागणारी पिके आणि त्याचे फायदे

हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांचं कोवळ्या फांद्या बाहेरून आणून मुद्दाम जमिनीमध्ये पेरून वाढलेली पिके फुलोऱ्यावर आली म्हणजे शेतात नांगरून गाढून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांमधून तयार झालेल्या खतास हिरवळीचे खत असे म्हणतात. या लेखात आपण हिरवळीचे खत तयार करण्यासाठी आवश्यक पिके व या खताचे फायदे माहिती करून घेणार आहोत.

 • धैचा:

हे तागा  पेक्षा काटक हिरवळीचे पीक आहे. या वनस्पतीच्या मुळावर तसेच खोडावर ही गाठी निर्माण होतात. यामध्ये रायझोबियम जिवाणू सहजीवी  नत्र स्थिरीकरणाचे प्रक्रियेने हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण करतात. या वनस्पतीच्या मुळावर गाठी निर्माण होण्याची क्षमता इतर द्विदल वनस्पती पेक्षा पाच ते दहा टक्के जास्त आहे. पाणी साचून राहणाऱ्या दलदलीच्या, कोरड्या किंवा क्षारयुक्त चोपण जमिनीतसुद्धा धैंचा पीक वाढू शकते. पावसाळ्याच्या सुरवातीला हेक्‍टरी 25 ते 40 किलो बियाणे पेरावे. पीक सहा ते सात आठवड्यात नव्वद ते शंभर सेंटिमीटर उंचीचे वाढल्यानंतर  जमिनीत नांगराने गाडावे. या कालावधीत धैचा पासून 18 ते 20 टन इतके हिरव्या वनस्पतीचे उत्पादन मिळते.  या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण 0.46 इतके असून मुळावरील व कोडावरील गाठीतील जिवाणू मुळे प्रतिहेक्‍टरी दीडशे किलो ग्रॅम पर्यंत स्थिर केले जाते.

 

 • ताग :

 ताग हे सर्व प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढणारी  हिरवळीचे पीक आहे. पेरणी झाल्यानंतर पाच ते सहा आठवड्यांनी गाडल्यानंतर हेक्‍टरी सर्वसाधारणपणे साडेसतरा ते 20 टन सेंद्रिय खत मिळते. त्यापासून 60 ते 100 किलो प्रति हेक्‍टरी नत्र प्राप्त होते. त्याचबरोबर इतर मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्येही पुढील पिकांना उपलब्ध होतात. पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत तागाची योग्य वाढ होत नाही.

 • द्विदलवर्गीय पिके:

मुग, चवळी, उडीद, सोयाबीन, मटकी, गवार इत्यादी पिके फुलोरा आधीसुद्धा गाढून  चांगला फायदा मिळू शकतो. मात्र या पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर सर्व अवशेष जमिनीत गाडल्यास त्याचा चांगला फायदा होतो. या पिकांचे अवशेष जमिनीत लवकर कुजतात.

 • हिरव्या कोवळ्या पानांची खते:

शेतात बांधावर किंवा पडीक जागेवर गिरिपुष्प, शेवरी, करंज, सुबाभूळ, मोगली इत्यादी पिकांची लागवड करून त्यांची कोवळी पाने अथवा कोवळ्या फांद्या तोडून जमिनीत मिसळावीत. या हिरवळीच्या पिकांचा एक मुख्य फायदा म्हणजे  या पिकांसाठी ज्या जमिनीत मुख्य पीक घ्यावयाचे आहे तेथे हिरवळीच्या पिकाच्या लागवडीसाठीवाट बघावी लागत नाही.केवळ बांधावर या पिकांची लागवड करून त्याच्या कोवळ्या फांद्या, पाने तोडून ते मुख्य पिकातील जमिनीवर मिसळता येतात. त्यामुळे हंगाम वाया जाण्याची शक्यता नसते.

 • गिरीपुष्प:

गिरिपुष्प हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत आणि हवामानात वाढणारे हिरवळीचे पीक आहे. या झाडाच्या पानांमध्ये साडेआठ टक्के कर्ब,0.40 टक्के नत्र असते. या वनस्पतीच्या बांधावर लागवड करून त्याची पाने वरचेवर जमिनीत मिसळता येतात. याशिवाय इतर वनस्पतींच्या तुलनेत या पिकाच्या पानात नत्राचे प्रमाण भरपूर असते.

 

 हिरवळीच्या खताचे फायदे

 • हिरवळीच्या खताचा मध्ये ह्युमस नावाचे सेंद्रिय द्रव्य असते, त्यामुळे मातिला काळा रंग येतो.
 • हिरवळीच्या खताचा मधील सेंद्रिय द्रव्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजिवाणूंना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी जीवाणूंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमाने वाढते. जमिनीतील पोषक द्रव्य रासायनिक क्रियने  विरघळुन ती पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात.
 • लवकर कुजणारे हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्पुरदचे प्रमाण आणि ऍझोटोबॅक्‍टर सारख्या जिवाणूंचे प्रमाण वाढते.
 • जमिनीत टिकून राहणाऱ्या कण समूहांचे  चे प्रमाण वाढते.
 • जमिनीच्या जलधारण क्षमता वाढते. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते.
 • सेंद्रिय पदार्थामुळे माती रवेदार होण्यास मदत होत. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत साचून राहता  त्याचा निचरा लवकर होतो. हलक्‍या जमिनीत देखील सेंद्रिय पदार्थांमुळे पाणी धारण क्षमता वाढते.
 • द्विदल वर्गातील हिरवळीची पिके हवेतील नत्र शोषून घेतात आणि ते नत्र जमिनीत साठवले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते.
 • क्षार जमिनीत हिरवळीचे पीक गाडल्यामुळे जमिनीतील क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीखाली आणता येतात.
 • हिरवळीच्या खताचे पिके जमिनीत असेंद्रिय स्फुरदाचे सेंद्रिय स्फूरदात रूपांतर करतात व जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.
 • हिरवळीच्या पिकांच्या दाट वाढीमुळे तणांचा नायनाट होण्यास मदत होते.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters