1. कृषीपीडिया

कसे पूर्ण होते कीटकांचे जीवनचक्र?

पीक संरक्षण पर्यावरणपूरक करायचे असेल एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती अवलंबली पाहिजे आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती समजून घ्यायची असल्यास किडीचे जीवनचक्र कसे पूर्ण होते हे माहिती असले पाहिजे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
कसे पूर्ण होते कीटकांचे जीवनचक्र

कसे पूर्ण होते कीटकांचे जीवनचक्र

सामान्यता किडींचे जीवनचक्र अंडी(Egg)-अळी(Larva)-कोश(Pupa) आणि पतंग(Adult) या चार मुख्य अवस्थांमधून पुर्ण होते कोणतीही कीड असूद्या ती कमी-अधिक वेळ या प्रत्येक अवस्थांमधून जात असते.प्रौढ मादी पतंग अंडी देतो त्यामधून अळी बाहेर पडते.अळी अवस्था चार ते पाच वेळा कात टाकून पूर्ण वाढते.. पुर्ण वाढ झालेली अळी जमिनीमध्ये,पालापाचोळा मध्ये किंवा झाडावरच कोष अवस्थेमध्ये जाते काही दिवसांच्या सुप्त कोषावस्थेमधून प्रौढ पतंग बाहेर पडतो.

अशाप्रकारे सामान्यता हर एक किडींचे जीवनचक्र पूर्ण होते.उदा.पाने खाणारी अळी,घाटेअळी,वांग्यातील शेंडे व फळ अळी.

     तर हे झाले अळीअवस्था असणाऱ्या कीडिंचे जीवनचक्र. रसशोषक किडी जसे पांढरी माशी,मावा, तुडतुडे यांचे जीवनचक्र अंडी(Egg)-पिल्ले(Nymph) -प्रौढ (Adult) या अवस्थेतुन पूर्ण होते. रसशोषक किडीमध्ये अळी अवस्था पहायला मिळत नाही. उदा

     तापमानानुसार व वातावरणातील बदलानुसार जीवनचक्र पूर्ण होण्याच्या कालावधी थोडाफार बदल होत असतो.

अंडी-अळी-कोश आणि पतंग हे जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी सर्वसाधारण 28-40 दिवसांचा कालावधी लागतो तर अंडी-पिल्ले-प्रौढ हे रसशोषक किडींचे जीवनचक्र 22-28दिवसात पूर्ण होऊ शकते.

     काही किडी ह्या ठराविक महिन्यामध्ये सक्रिय असतात जसे हुमणी कीड. अशा अपवादात्मक किडींचे जीवनचक्र 

 पूर्ण होण्यासाठी 8-12 महिने इतका कालावधी लागतो.

 एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती हे किडींची जीवणसाखळी पर्यावरणपूरक पद्धतीने तोडून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यास मदत करते.

-Team IPM SCHOOL

English Summary: How the life cycle of an insect is completed Published on: 10 November 2021, 12:04 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters