शेत जमीन मोजण्यासाठी गुंठा, एकर, हेक्टर, आर या मोजमाप (measurement) एककाचा वापर केला जातो. मात्र अनेक शेतकऱ्यांना गुंठा, एकर, हेक्टर, आर यामधील फरक माहीत नसतो. याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.
गुंठा, एकर, हेक्टर, आर मधील फरक
१ गुंठा = १०८९ चौ फुट
१ आर = १०७६.३९ चौ फुट
१ एकर = ४० गुंठे
आर म्हणजे १०० चौरस मीटरचा १ आर असतो.
एका हेक्टर मध्ये एक लाख सात हजार ६३९ चौरस फूट असतात.
सावधान! 'या' रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराचा धोखा मोठ्या प्रमाणात असतो
एक मीटर बाय एक मीटर बरोबर एक चौरस मीटर तयार होतो. जेव्हा असे दहा हजार चौरस मीटर (Ten thousand square meters) तयार होतात त्यावेळी एक हेक्टर तयार होतो. गुंठ्या मध्ये जमीन मोजणी कशी करावी? याविषयी माहिती घेऊया. क्षेत्रफळ = लांबी बाय रुंदी, गुंठे = जमिनीचे क्षेत्रफळ (चौरस फूट) / १०८९, एकर = गुंठे / ४० अशी मोजणी केली जाते.
लेसर लेव्हलिंग, सरी वरंबा पद्धतींमुळे बाजरी उत्पादनात भरभराटी; जाणून घ्या प्रक्रिया
जमीन मोजणी
तुम्हाला जर जमीन मोजमाप करायची असेल तर भूमी अभिलेख (Land Records) व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन (land) मोजणीसाठी अर्ज करावा करा. मात्र जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मोजणी फी (Calculation fee) भरुन त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते. संबंधित धारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते.
महत्वाच्या बातम्या
'या' वनस्पतीची लागवड करून मिळवा भरघोस उत्पन्न; केंद्र सरकारही करतंय मदत
शेतकरी मित्रांनो 'या' गाईचे करा पालन; दिवसाला देते 12 लिटरपेक्षा जास्त दूध
मान्सूनचा कहर! पुढील 3 ते 4 दिवस राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता
Share your comments