मित्रानो खोडवा ऊसामध्ये भरणी करताना रासायनिक खते कसे टाकली पाहिजेत या बद्दल थोडक्यात माझे मत सांगणार आहे.पटलं तर अनुकरण करा नाही पटलं तर सोडून द्या.अलीकडील काळात ऊसाचे अंतर हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने 3/3.5 फुटावरून 4.5/5फूटा पर्यंत वाढलेले आहे.पूर्वी 3/3.5फुटावरील लावणीचा ऊस तुटून गेल्यानंतर खोडव्याची भरणी करत असताना
रासायनिक खते सरी मध्ये टाकून बैलाच्या औताच्या सहाय्याने भरणी करत होतो.सर्व खते मुळाजवळ मातीआड व्हायचे.All fertilizers should be applied to the soil near the roots. अलीकडील काळात सरीतील अंतर वाढल्या मुळे बैलाच्या सहाय्याने भरणी किंवा मातीची भर लावायला मर्यादा यायला लागली.त्यामुळे 4.5/5फूट सरी मध्ये पॉवर टीलरने भरणी करावी लागते.
खोडव्याची भरणी करत असताना रासायनिक खते सरीमध्ये टाकून पॉवरटिलरने भरणी करतात. टाकलेले रासायनिक खते मातीबरोबर मिसळून वरंब्या(बेड) वरती पडत जाते. वरंब्यावर(बेड)ऊसाच्या बेटामध्ये आत रासायनिक खत मिश्रित मातीची चार इंचाची भर लागत जाते.यामुळे काय होत ऊसाच्या मुळ्या खाली राहतात व टाकलेली सर्व खते
वरंब्यावरती(बेड) पडतात.त्यामुळे वरील बेड भिजणार कधी आणि खते विरघळून खाली मुळीला लागणार कधी?त्यामुळे मुलखाची महाग खते टाकून त्याचा ऊसाला काहीच उपयोग होत नाही.खते वाया जातात.त्यामुळे पॉवर टिलरने भरणी करत असताना पहिल्यांदा खोडव्याचे भरणी करून घ्या. व भरणी झाल्यानंतर सरी मध्ये कुदळीने चर घेऊन खते मातीआड करा.
शेतीनिष्ठ श्री सुरेश कबाडे.
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
मोबा:- 9403725999,
मोबा79 7261 1847
Share your comments