1. कृषीपीडिया

सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना , जातीच्या राजकारणात अडकवून कसे फसविले ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य वाढविले याचा अर्थ हिंदूंसाठी फक्त कार्य केले असा होत नाही

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना , जातीच्या राजकारणात अडकवून कसे फसविले ?

सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना , जातीच्या राजकारणात अडकवून कसे फसविले ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य वाढविले याचा अर्थ हिंदूंसाठी फक्त कार्य केले असा होत नाही, तर सर्व समाजासाठी व्यापक कार्य केलें. पण काही राज्यकर्त्यांनी हिंदूंचा राजा दाखवून गावागावात राजकीय लढाया लावल्या, व वातावरण तापविले. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे आदर्श दैवत होते. शेतकरी वर्ग सर्वच जाती धर्मात पसरलेला असून, एका जातीची शेतीत कोणाचीही मनोपल्ली नाही. मात्र राज्यकर्त्यांनी 

 व्यापक भूमिकेच्या शिवाजी राजाला फक्त हिंदूं धर्मात अडकवून मात्र त्यांना लहान केले. खऱ्या 

 अर्थाने शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे राजे होते, त्यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेले आर्थिक धोरण सर्वश्रुत असताना ,राज्यकर्त्यांनी फक्त हिंदूचे राजे संबोधून व्यापक हिंदवी स्वराज्याची मात्र राज्यकर्त्यांनी पायमल्ली केली. "जय भवानी- जय शिवाजी" चा नारा देवून शहरीकरण वाढविले व शेतीमालाला कमी भाव देऊन ग्रामीण भागातील समृद्धी आट्वीली. आज पर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी हेच सोंग वापरुन शेतकरी संपुष्टात आणला. शिवाजी महाराजांच्या नावाने गगनभेदी उदो-उदो करून, समाजाला राजकारणासाठी एकत्र केले आणि सत्ता उपभोगण्यासाठी शिवाजी महाराजांचा उपयोग करून जाती जातीचे भांडणे लागली. "जय भवानी, जय शिवाजी" म्हणणे फारच सोपे आहे पण त्यांनी सांगितलेले शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण हे शिव भक्ताच्या मात्र डोक्यात घालणे अतिशय कठीण काम आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेवूनच, शेतकरी, शेतमजूराना लुटूले व बेवकुब बनविले.

ना हिंदू खत्रे मे है ना, 

मुस्लिम खात्रे मे है, सच्चा ई यह है की, 

  इस देश का किसान खत्रे मे है.

जगद्गुरु तुकाराम महाराजांनी , इंद्रायणी नदीच्या पात्रात कर्जाच्या वह्या डूबवील्या व त्याच्या खात्यावरील कर्ज कमी केले. पहिल्यांदा

शेतकरी कर्ज मुक्त केला. शेतकऱ्यांची ती पहिली कर्जमुक्ती जगद् गुरू संत तुकोबारायानी केली. मात्र राज्यकर्त्यांनी शेतीचे अर्थशास्त्र सोडून दिले,आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्पादन वाढविले मात्र जनता पोसण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले. तुकारामाचे अर्थशास्त्रीय धोरण मात्र बाजूला केले. शेतीतून निर्माण झालेल्या पैशाची लूट पिढ्यानपिढ्या जोपासलेली पद्धत जशीच्या तशी राज्यकर्त्यांनी वापरली. आत्महत्या घडवून शेतकऱ्यांना बेवकुफ बनवीले.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकात शेतकरी आर्थिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी प्रबोधन केले, मात्र राज्यकर्त्यांनी त्यांचा संबंध जातीसी जोडून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्नाची उकल बाजूला ठेवली, राजकीय दुकानदारी वाढविण्या साठी माळी या जातीशी त्याचे नाते जोडले. जाती-धर्माचे तंत्र वापरून निवडणूका जिंकणे सत्ताधीशांना सोपे झाले.

महात्मा गांधींनी ग्रामीण भागात समृद्धी यावी म्हणून भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर "गाव कीओर चलो" या दिशेने वाटचाल सुरू केली होती. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर, काँग्रेस चळवळीचे काम संपले . अशा सूचना केल्या ,परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर राज्यकर्ते नेहरूजींनी 18जून 1951ला पाहिली घटना दुरुस्ती करून, शेतकरी विरोधी धोरणे राबवून , शेतीतून फक्त उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान जोपासले मात्र शेतकऱ्यांच्या घरात पैसा जमा न होऊ देता त्यांना दारिद्र्याच्या खाईत लोटले. शेतकऱ्यांच्या जीवनात अंधकार घडविला .शेतीमाला ला भाव न देता व शेतकरी मेटाकुटीस आणून शेतकऱ्याचे जीवन संपविले व जाणुन बुजून आत्महत्या घडविल्या. सत्तर वर्षात सुध्धा आर्थिक धोरणे शेतकऱ्यांच्या बाजूने बनविली नाहीत. आजचे राज्यकर्ते तर हे बनविणार सुद्धा नाही. त्यांना ग्रामीण भाग लुटूनच शहरीकरण वाढवायचे आहे?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उपयोग संविधान लिहिण्यासाठी करून घेतला गेला. डॉ. आंबेडकर हे अर्थशास्त्र व कायदे शास्त्र या दोन्ही विषयात अतिशय पारंगत होते. या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. मात्र राज्यकर्त्यांनी लिहून ठेवलेल्या मूळ संविधाना प्रमाणे देश चालविला नाही.घटनादुरुस्त्या करून, वेळोवेळी बदल करून शेतकरी संपविण्याचे व आत्महत्या करण्याचे कटू कारस्थान काँग्रेसच्या राजवटीत झाले . व त्याच पाऊल वाटेवर आज ही राज्यकारभार चालू आहे. आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणीचा संबंध बौद्ध धर्मासी व जातीशी जोडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले कायदे शास्त्र समाजात वाढविले गेले , परंतु त्यांनी मांडलेली अर्थशास्त्रीय विचार , या देशासाठी लागू केला नाही. आर्थिक धोरणे फक्त स्वतःच्या व राजकारणाच्या स्वार्थासाठी वापरली गेली . भारत देशातील सर्व समाजासाठी असलेले आर्थिक धोरण बाजूला ठेवून त्यांना फक्त बौद्ध समाजाचे नेते संबोधून, राज्यकारभारातून डावलन्याचे कुटील कारस्थान झाले. म्हणूनच डॉ. आंबेडकर काँग्रेस सोडून बाहेर पडले. काँग्रेस हे जळते घर आहे असे संबोधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही राजकीय पार्टी तयार केली . परंतु रिपब्लिकन नेत्यांनी जातीशी संबंध जोडून काँग्रेसची चाटूगिरी केली. शेतकरी संघटना व रिपब्लिकन पार्टी ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय विचारावर राबवलेली चळवळ आहे.म्हणूनच राज्यकर्त्यांनी त्यांचे तुकडे करून, व नंतर गरिबी हटावचा नारा देऊन शेतकरी शेतमजुरांना बेवकुब बनविले.

या भारत देशात बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर महात्मा गांधी, बॅरिस्टर डॉ. पंजाबराव देशमुख यां विद्वान महापुरुषांना बाजूला ठेवून काँग्रेस राजवटीने हा देश चालविला. व औद्योगीकरणाच्या नावावर शेतकरी शेतमजुराची प्रचंड लूट करून परदेशात पैसा नेऊन ठेवला.

तसेच वारकरी म्हणजे शेतकरी,आणि शेतकऱ्यांचे दैवत म्हणजे पंढरीचा विठोबा राया. महाराष्ट्रात दरवर्षी आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते. शेतकरी सुखी होऊ दे , भरपूर पाऊस पाणी येऊन शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, असे पंढरीच्या विठोबाला साकडे घातले जाते. मात्र प्रत्येक पक्ष्याच्या मुख्यमंत्र्यानी ,आमदार व खासदारानी शेतकरी विरोधी धोरणे राबवून शेतकऱ्यांना लुटण्याचेच कार्य केले. शेतकरी हिताचे कायदे मात्र केले नाही व ते बदलविली सुद्धा नाहीत. सत्तर वर्षात ही परिस्थिती जशीच्या तशीच ठेवली. व पुढेही काही बदल घडवतील अशी चिन्हे दिसत नाहीत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानी ग्रामगितेतून खेड्या तील शेतकरी व शेतमजूर हा कसा सुखी होईल?. हा आर्थिक ,सामाजिक व व्यवहारीक दृष्टिकोन जनतेला समजावून सांगितला , परंतु तुकडोजी महाराजांची आर्थिक धोरणे राज्यकर्त्यांनी न राबविता फक्त मानव संस्कार व जगण्या करिता आचरणाच्या शिकवणी दिल्यात. त्यांनी सांगितलेले अर्थशास्त्रीय धोरण

 "कच्चामाल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन, पिकवूनिया उपाशी".

या आर्थिक धोरणाची बाजू ,मात्र राज्यकर्त्यांनी अलगद बाजूला ठेवली. तुकडोजी महाराजांचे विचार ध्यान, सामुदायिक प्रार्थना , व आचरनाशी संबंधित वातावरण तयार केले. परंतु त्यांच्या मूळ आर्थिक धोरणाला मात्र बगल देऊन, शेतकरी समृद्ध होऊ दिला नाही. व ग्रामीण भाग सुखी होऊ दिला नाही. आतापर्यंतचे सर्वच राज्यकर्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराच्या विरुद्धच वागले . म्हणून हे तुकडोजी महाराजांच्या पादुकावर मस्तक सुध्दा ठेऊ देण्याच्या लायकीचे आहेत काय?.

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, "भीक नको, घेऊ घामाचे दाम" या कार्यप्रणाली साठी शेतकरी संघटना, सतत चाळीस वर्षापासून राज्य व केंद्र शासनासी संघर्ष करीत आहे. शरद जोशींनी राज्य शासनाला व केंद्र शासनाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या,त्याचे राज्यकर्त्यांनी पालन केले नाही. दि. 19 मार्च 1986 ला महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यात चिलगव्हाण येथील शेतकरी स्व. साहेबराव पाटील करपे यांच्या चार मुला सहित नवरा-बायकोनी वर्धा नदीच्या तीरावर पवनार येथे सामूहिक आत्महत्या केली. तेव्हापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले.चाळीस वर्षाच्या अगोदर शरद जोशी म्हणायचे-शेतीमालाला भाव मिळाला नाही तर एक दिवस शेतकरी आत्महत्या केल्या शिवाय राहणार नाही. आज संपूर्ण भारत देशात शेतकरी आत्महत्या वाढतच राहिल्या. या सर्व व्यवस्थेला जर कोणी जबाबदार असेल तर ते राज्यकर्त्यांनी राबविलेले आर्थिक धोरणे आहेत व शेतकरी विरोधी कायदे आहेत.

केंद्र शासन व राज्यशासन या देशात संत महात्मे व राष्ट्रपुरुषांचे सोन्याचे पुतळे सुद्धा उभारतील, बुलेट ट्रेन येतील, हवेत उडणाऱ्या गाड्या येतील, चंद्रावर जाण्यासाठी बसेस सुद्धा सुरू होतील, सरकारी दवाखाने वाढवतील, शारीरिक सुख सुविधा सुद्धा देतील. प्रत्येकाले घरकुल सुद्धा बांधून देईल . शहराला जोडणारे रस्ते अष्टपदरी करतील., कुटुंब संख्या वाढल्यामुळे 

शहरातील विकासाची कामे होतील. शहरांना सर्व सुख सुविधा सुध्धा पुरवील्या जातील . शेतकऱ्यांना गुलामगिरीत ठेवण्यासाठी कर्ज माफी सुद्धा देईल. परंतु हे राज्यकर्ते शेतकऱ्यांना न्याय , हक्क व शेतीमालाला भाव मात्र देणार नाही आणि हेच राज्यकर्ते शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मात्र मिळू देणार नाहीत? त्यासाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना क्रांतीच करावी लागेल, ही काळे दगडावरची, पांढरी रेघ राहील. राजकारणाच्या दुकानदारी साठी संत, महात्म्यांचे नाव घेऊन फक्त उपयोग केला गेला. आजूबाजूच्या , कुटुंबातील होणाऱ्या आत्महत्या शेतकरी हा आपल्याच डोळ्यांनी पाहत राहिला, तरीपण विश्वास टाकून, त्यांनाच शिक्के मारत गेला. सत्ताधीशांनी शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य मातीत घातले व बहुजन समाजाला भिक वाटूनच , सतत फसवित राहिले .

जय हिंद.जय बळीराजा. 

 

आपला नम्र-

धनंजय पाटील काकडे,. 9890368058.

 विदर्भ प्रमुख, शेतकरी संघटना.

 मुक्काम- वडुरा,पोस्ट - शिराळा, तालुका- चांदूरबाजार जिल्हा अमरावती

English Summary: How did the authorities deceive the farmers by getting them involved in caste politics? (1) Published on: 19 April 2022, 01:42 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters