1. कृषीपीडिया

बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने कमी वेळेत तयार होते उत्तम दर्जाचे कंपोस्ट, जाणून घ्या तयार करण्याची पद्धत

KJ Maharashtra
KJ Maharashtra
बायोडायनॅमिक तंत्रज्ञान

बायोडायनॅमिक तंत्रज्ञान

  जर बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाचा विचार केला तर हे मुख्यत्वे करून भारतीय वेदांवर आधारीत जैवऊर्जा म्हणजेच बायोडायनॅमिक तंत्र होय. या तंत्रात ब्रह्मांडातील ग्रह, तारे यांचा पृथ्वी वनस्पती आणि जलचरावर होणारा सकारात्मक परिणामांचा अभ्यास आणि विचार केला जातो. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे या तंत्रज्ञानाच्या मदतीने कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा इतर रासायनिक गोष्टीचा कुठल्याही पद्धतीचा वापर न करता कमी वेळेत  उत्तम दर्जाचे कंपोस्ट.

या तंत्रज्ञानान तयार करता येते. या तंत्रज्ञानात प्रत्येक अन्नघटकांचा जसं की नत्र,  स्फुरद, पालाश इत्यादीचा वेगवेगळा विचार करण्याऐवजी सगळ्या अन्नद्रव्यांचा एकत्रित विचार केला जातो. शेणखत हे शेतीसाठी फार उपयुक्त आहे  उपयुक्त आहे परंतु सध्याच्या काळामध्ये जनावरांची संख्या आणि त्यापासून शेणखताची उपलब्धता फार कमी झालेली आहे. आणि जे काही उपलब्ध आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे म्हणजेच त्यामध्ये गवऱ्या, तणाच्या बिया किंवा प्लास्टिक  मिसळून तेएवढे उपयुक्त राहत नाही.परंतु बायोडायनामिक तंत्रज्ञानाने मुग, उडीद आणि सोयाबीन यासारख्या कडधान्यांच्या उपलब्ध काडाचे उपयोग कंपोस्ट तयार करण्यासाठी केला पाहिजे. अशा प्रकारचे कंपोस्ट हे बायोडायनामिक पद्धतीने कमी खर्चात आणि वेगाने करणे शक्य होते.

बायोडायनॅमिक कंपोस्टसाठी करावी लागणारी पूर्वतयारी

 • या पद्धतीमध्ये पिकअवशेषांचे थरावर थर रचले जातात.त्यापासून साधारणतः दोन अडीच महिन्यात कंपोस्ट तयार होते. जर या पद्धतीमध्ये थोडी पूर्वतयारी केल्यास वेळेची चांगल्याप्रकारे बचत होते.

 • ज्या  पीकांचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी थर द्यायचे आहेत अशा पिकांचे अवशेष चार-पाच दिवस पुरेसे ओले करावेत. जेणेकरून ते नरम होऊन जीवाणूंना काम करणे सोपे होते.  यामध्ये प्रामुख्याने सोयाबीनची काड, मुग, उडदाच्याशेंगांची टरफले त्वरित कंपोस्टसाठी वापरता येतात. ते चांगल्या प्रकारे व पूर्णपणे कुजतात.

 • त्या अगोदर एक बैलगाडी ओले शेन  जमा करून ठेवावे.

 • कोणत्याही वनस्पती चा हिरवा पाला दोन बैलगाडा इतका जमा करून ठेवा.

 • यामधील एक ढिगासाठी  एक किलो बायोडायनामिक एस9 हे विरजण स्वरूपात लागते.

 • यामध्ये कंपोस्ट तयार करण्यासाठी खड्डा खोदण्याची गरज नसते. शेतावरील उंचावरील सपाट जागा निवडून, पूर्व पश्चिम दिशेने पंधरा फूट लांब आणि पाच फूट रुंद अशी जागा आखून घ्यावी. त्या जागेवर पाणी शिंपडून चांगले ओलसर करावे. अगोदर शेण काला तयार करून ठेवा. 1किलो बायोडायनॅमिक एस 9 हे तेरा लिटर पाण्यात एक तास भर उलट सुलट पद्धतीने घोळून तयार ठेवावे. जशी आपली गरज असेल त्यानुसार ते जास्तीच्या पाण्यात टाकून वाढविता येते.

थर कसे रचावेत

 पहिला तर अगोदरच पुरेसे ओले केलेल्या पीक अवशेषांचा एक फूट उंचीचा असावा. त्यावर एस नाईन द्रावण शिंपडून त्यावर पुरेसाशेणकाला टाकावा. त्यानंतर या झाडावर हिरवा झाड चा पाला एक फूट उंचीपर्यंत पसरवून त्यावर s9 द्रावण शिंपडावे शेणकाला टाकून शेतातील दोन घमेले माती पसरावी. असा पद्धतीने पहिला थर तयार होतो.  अशा पद्धतीने पाच फूट उंचीपर्यंत एकावर एक थर रचावेत. नंतर शेणकाला व माती मिसळून आणि उपलब्ध असल्यास गव्हांडा टाकून तयार केलेले मिश्रण ने ढीग पूर्णपणे जमिनीपर्यंत लिंपून घ्यावा.

 

उकरी करणे

एक महिन्यानंतर या ढिगाच आकार लहान होतो. त्या वेळी पूर्ण ढीग फावड्याने उकरून सरमिसळ करून घ्यावे. यावर पुरेसे पाणी टाकून ओले करून पुन्हा शेणकाल्याने लिंपून टाकावे. यावेळी  s9 टाकण्याची गरज नाही.  अशा पद्धतीने एकूण 60 70 दिवसात दर्जेदार कंपोस्ट खत तयार होते. यामध्ये सर्व पीक अवशेषांचे कंपोस्ट झालेले असते.  जे पदार्थ नुसत्या शेण खड्या मध्ये  कुजण्यासाठीआठ ते नऊ महिने लागतात.

हेही वाचा : कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क आहे फायदेशीर...

या तंत्रज्ञानाने तयार झालेल्या कंपोस्ट खताचे  फायदे

 • पंधरा फूट लांब व पाच फूट रुंद आकाराच्या ढिगातून साधारणतःदहा गंठण पूर्णपणे कुजलेले कंपोस्ट खत मिळते. मुग, उडीद, शेंगांची टरफले सुर्यफुलाचे काड इत्यादींची जाळून विल्हेवाट लावली जाते. त्याऐवजी त्याचे कंपोस्ट केल्यास जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बवाढून जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.

 • बायोडायनॅमिक कंपोस्ट ढिगातून साधारणतः पिकांसाठी 18 ते 20 किलो नत्र, उपलब्ध स्फुरद 18 ते 20 किलो, पालाश दहा किलोपर्यंत मिळते. याबरोबरच गंधक,झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम अनिल लोह इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्येही मिळतात.

 • बायोडायनामिक कंपोस्ट हे पिकाच्या आवश्यकतेनुसारनायट्रोजन कंपोस्ट, फास्फोरस कंपोस्ट, पोटॅश कंपोस्ट आणि सल्फर कंपोस्ट असे म्हणतात.

 • या तंत्रज्ञाने कंपोस्ट तयार करण्यासाठीखड्डा खोदणे ची आवश्यकता नसल्याने सावली करतात शेड उभारण्याचा खर्च येत नाहीकिंवा दररोज पाणी देणे व देखभालीची सुद्धा गरज नाही.

 • पूर्व तयारी केली असल्यास दोन मजूर एका दिवसात दोन ढीग बनवू शकतात.

 • पूर्णपणे तयार झालेल्या कंपोस्ट डिगा खाली बऱ्याच वेळा शेतातील गांडूळे जमा झालेली दिसून येतात. जमिनीमधील जिवाणू व गांडुळांना सक्रिय करण्यास बायोडायनॅमिक कंपोस्ट मोलाचे कार्य करते.

 • एका ढिगातून साधारणतः दहा क्विंटल म्हणजे 50 किलो वजनाची सुमारे वीस पोती सेंद्रिय खत घरीच तयार होऊ शकते.

 

 माहिती स्त्रोत- बळीराजा मासिक

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters