निसर्गात कोट्यवधी वर्षांपासून बुरशी आणि कीटक यांचा संबंध अस्तित्वात आहे, मूळातच बुरशी ही परावलंबी असते, त्यामुळे निसर्गातील सजीव अथवा निर्जीव सेंद्रिय घटकांवर त्यांची उपजीविका चालत असते.गेल्या काही वर्षात संशोधकांनी किटकांवर हल्ला करणाऱ्या काही मित्र बुरशी शोधून काढल्या आहेत, आणि त्यांचा उपयोग सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जैविक कीडनाशक म्हणून केला जात आहे.
1) Metarhizium_Anisopleae2) Baeuveria_Bassina आणि3) Verticilum_Lecaniiया तीन प्रमुख मित्र बुरशिंचा वापर जैविक कीडनाशक म्ह्णून जगभरात मोठ्या प्रमाणावर केला जातो.कठीण कवच असणाऱ्या किटकांवर Metarhizium ही बुरशी चांगला result देते, तर अळ्या,मऊ आवरण असणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव Beauveria ही बुरशी रोखते, अगदी छोटे कीटक ( उदा, ऍफिडस्,milibug) यांवर verticilium चांगले काम करते,,
बुरशी कीटकांचा प्रादुर्भाव कशा रोखतात ?बुरशीचे बीज ( spores) हवा किंवा पाण्यामार्फत त्या किडीच्या अंगावर चिकटतात,,आणि किडीच्या अंतरंगात प्रवेश करतात.बुरशी किडीच्या अंगात वाढत असताना काही टॉक्सिन्स निर्माण करते,,जेणेकरून किडीची चाल मंदावते,,आणि काही काळानंतर तिच्या संपूर्ण अवयांवर बुरशीचे साम्राज्य निर्माण होते.जेव्हा किडीचा मृत्यू होतो तेव्हा ही बुरशी चक्क तिचे शरीर फाडून बाहेर येते,,आणि किडीच्या संपूर्ण शरीरावर आपले पुढचे life cycle चालू ठेवते,
या प्रक्रियेला #mummification असेही म्हणतात.पुढे जाऊन ही वाढलेली बुरशी तिचे spores प्रसारित करते, आणि ते बीज त्याच्या पुढच्या टार्गेटचा शोध घेण्यासाठी निसर्गात आपला प्रवास चालू ठेवते,निसर्गातील कीड आणि बुरशीचा संबंध अभ्यासून, त्यातील फक्त मित्र बुरशीला ओळखून, त्यांचा सेंद्रिय शेतीला कसा वापर करून घेता येईल, यासाठी कित्येक संशोधकांनी आपले आयुष्य खर्ची केले आहे, आणि अजूनही करत आहेत त्यांच्या या अथक प्रयत्नातूनच सेंद्रिय शेती अधिकाधिक यशस्वी होत आहे.
Share your comments