आजचा विषय शेती व आपल्या साठी महत्वाचा आहे.आपन सेंद्रिय शेती करत असताना काही पिकांचा चांगले दर्जेदार रहाण्यासाठी काही पद्धती ची शिफारस असतात आपन सेंद्रिय शेती म्हटले फक्त सेंद्रिय शेती नव्हे ! जसे पिक सापळा पद्धती, जिवाणू विरजन,आच्छादन,दशपर्णी वापसा,बायोडायमिक, अश्या खूप काही पद्धती या सेंद्रिय शेती मध्ये महत्वाचं आहे. मला आज हा विषय समजून घेणे आवश्यक वाटला.आपल्या पिकांला उन्हाळ्या पाण्याची आवश्यकता असते पण आपन जर उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी जैविक आच्छादन महत्वाची भुमिका बजावत असतो
आच्छादनाचे उद्दीष्ट काय असते?
शेती मध्ये आच्छादने तणांचा बंदोबस्त करता येते.त्याच बरोबर पाण्याची हमखास बचत होते.
महत्वाचं म्हणजे शेती मधे मित्र बुरशी व जीवाणु चे जमिनीत झपाटयाने वाढ होते.नैसर्गिक जमिनीची सुपिकता वाढली की. जमिनीचा पोत म्हणजे हृमस वाढतो. आच्छादन हे हवेतील ओलावा ओढून घेते. नत्र प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा 'वेग वाढतो. वनस्पतीचे जुनं आच्छादन बरोबर नविन वनस्पती आच्छादनाचे लवकरच कुजल्यामुळे जमिनीत संजिवकांची निर्मिती होते. जमिनीत दर्जा टिकून राहते. पिकां वाढीसाठीआवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो. मित्र बुरशी मुळे मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते.या आच्छादन पद्धतीने सर्वच जैव रासायनिक क्रिया प्रक्रियांचे नियंत्रण होते.
आपल्या जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होत असणे हे माती साठी महत्त्वाचे असते . अश्या पद्धतीने एकदल- द्विदल आंतरपिकांचे आच्छादनामुळे वनस्पती मुळांना पोषक वातावरण तयार होऊन जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होत असते.या कारणामुळे मातीची धूप थांबून पाणी जिरण्यास मदत होते व आच्छादन पद्धतीने नैसर्गिक गांडूळे हे मातीला आॅक्शिजन सारखें काम करत असते.महत्वाचं म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेतामध्ये आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस कसदार बनवण्याचे कार्य करीत राहतो. मातीच प्रकाशसंश्लेषण काम योग्य दिशेने सुरू असते. पिकाचींअन्न तयार करण्याची प्रतिकार शक्ती चा वेग वाढतो.
त्या पिक प्रती पिक उत्पादन वाढत राहते.उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगविण्याचे काम हे आच्छादन करत असते. जिवाणू व जमिनीची जलधारणाशक्ती वाढ होण्यास मदत होउण जमिनीचा सामू नियंत्रित राहातो जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखण्यासाठी मदत होते. जमिनीला अतिनील किरणांपासून वाचवीत जमिनीत शक्ती संतुलन बनत जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते. पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढत जमिनीवरिल वातावरण जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होत असते व सर्वात महत्वाचे म्हणजे जमिन वापसा स्थितीत राहते.
Save the soil all together
मिलिंद जि गोदे
९४२३३६११८५
शेती बलवान तर शेतकरी धनवान
वाटचाल सेंद्रिय शेती ची
Share your comments