1. कृषीपीडिया

आरोग्यदायी ड्रॅगन फळ व प्रक्रियायुक्त पदार्थ

ड्रॅगन फळ हे २१ व्या शतकातील आश्चर्यकारक फळ म्हणून ओळखले जाऊ लागले असून त्याने भारतीय फलोत्पादनामध्ये सद्यस्थितीत एक क्रांती घडवून आणली आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
आरोग्यदायी ड्रॅगन फळ व प्रक्रियायुक्त पदार्थ

आरोग्यदायी ड्रॅगन फळ व प्रक्रियायुक्त पदार्थ

ड्रॅगन फळ हे २१ व्या शतकातील आश्चर्यकारक फळ म्हणून ओळखले जाऊ लागले असून त्याने भारतीय फलोत्पादनामध्ये सद्यस्थितीत एक क्रांती घडवून आणली आहे. शेतकरी आणि ग्राहकांना एक वरदान ठरले आहे. ड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जाते. अलीकडे भारतामध्येही या पिकाची लागवड सुरू झाली आहे. ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. हायलोसेरेयस ही त्याची प्रजाती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून गुलाबी रंग व आतील गर पांढरा, वरून पिवळा व आतील गर पांढरा व वरून गुलाबी व आतून गर गुलाबी अशा तीन प्रकारांत हे फळ येते.

 

ड्रॅगन फळाचे आरोग्यदायी फायदे

संशोधकांना ड्रॅगन फळाचा रसामध्ये प्रकृती चांगली ठेवणे, त्वचा (कातडी) तेजस्वी दिसणे व त्वचेच्या विकृत्ती कमी करण्याचे गुणधर्म आढळले.

ड्रॅगन फळामध्ये युनिव्हर्सिटी जेटच्या संशोधकांनी असे शोधून काढले

की यामध्ये अत्यावश्यक फॅटी अॅसीड (जीवनसत्व ई) ने समृद्ध असते. यामुळे शरीराची झीज भरून निघते. जीवनसत्व ई हे शरीराला आत्यावश्यक असते.

ड्रॅगन फळामध्ये कॅन्सर विरोधक व रक्तदाब कमी करणारे गुणधर्म आहेत.

ड्रॅगन फळात जीवनसत्त्व बी १ अधिक असल्याने प्रतिकार शक्ती वाढते. पचनक्रिया सुधारते

मेंदू तरतरीत राहतो. ड्रॅगन फळाच्या सेवणाने ताणतणावावर मात होते.

डोळ्याचा मोतीबिंदू कमी होतो. पेशींची सुसुत्रता सांभाळते. एल्झामायर नावाच्या रोगावर आराम पडतो.

ड्रॅगन फळ मधुमेह नियंत्रित करते.

कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

संधिवात रोखण्यास मदत करते. दमा रोखण्यास मदत होते.यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिने भरपूर उपलब्ध असतात.

ड्रॅगन फळात भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह, आणि विटामीन बी तसेच ९०% पाणी असते.

अन्नघटकांचे प्रमाण (प्रति १०० ग्रॅमनुसार)

प्रथिने ०.१९४, कॅल्शिअम ७.५५ मिलिग्रॅम, फॉस्फरस ३३.१५ मिलिग्रॅम, लोह ०.६ मिलिग्रॅम, जीवनसत्वे बी १- ०.१६१५ मिलिग्रॅम, बी २- ०.०४४ मिलिग्रॅम, बी ३- ०.३६३५ मिलिग्रॅम, ‘क’ ८.५ मिलिग्रॅम, स्निग्ध पदार्थ ०.४१ ग्रॅम, ऊर्जा २३६ किलो कॅलरी, कर्बोदके २० ग्रॅम, फॉलिक अॅसिड १८.३ मिलिग्रॅम.

 

ड्रॅगन फळाचे प्रक्रियायुक्त पदार्थ 

१) गर (रस) 

पिकलेले ड्रॅगन फळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. फळावरील साल काढून आतील गर वेगळा करावा.

गरामधील बिया वेगळ्या करून घ्याव्यात. यंत्राच्या साह्याने गर व्यवस्थित मिसळून घ्यावा. तयार झालेला १० मिली गरामध्ये १०० मिली दूध व १० ग्रॅम साखर मिसळून त्याचा रस बनवू शकतो.

हा गर (रस) हा वजा १८ अंश सेल्सिअसला गोठवून ठेवल्यास ६ ते ८ महिने पर्यंत वापरता येतो.

२) स्क्वॅश

ड्रॅगन फळाचा २५०मि.ली. गर घ्यावा. पाणी ३२० मिली घेऊन त्यात ४२० ग्रॅम साखर मिसळावी. हा पाक मंद आचेवर गरम करावा. त्यात ६ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावे. उष्णता देत असताना ही त्यामध्ये २५० मिली गर मिसळावा.

मिश्रणाला ४३ अंश ब्रिक्स येईपर्यंत मंद आचेवर ढवळावे. त्यानंतर स्क्वॅश हा गरम असतानाच निर्जंतूक केलेल्या बाटलीत भरावा. बाटली थंड करावी. बाटलीमध्ये स्क्वॅश भरल्यानंतर पुन्हा निर्जंतुकीकरण करावे.

३) जॅम

पिकलेली ड्रॅगन फळ फळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. व्यवस्थित कापून, त्यातील गर काढून घ्यावा. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून घ्यावी. त्यात प्रतिकिलो जॅमसाठी १ ते २ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावे. मिश्रण एकजीव करावे.

 

लेखक:

सचिन अर्जुन शेळके

आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, 

सॅम हिगिनबॉटम कृषि, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय प्रयागराज, उत्तरप्रदेश.  

8888992522 

English Summary: Healthy Dragan fruit and protein substance Published on: 14 February 2022, 04:33 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters