ऊसाची पाचट जाळु नका. पाचट जाळणारे स्वतःचे घर व भविष्य जाळत असतात . निसर्गाचेही घर जाळत असतात .एकरी ५ टन जेव्हा पाचट तुम्ही जाळता तेव्हा त्याच जमिनीवर पुढील ऊसाला जगवणारे सर्व तत्वं त्या पाचटजाळण्यांतून नष्ट करीत असता . तसेच जमिनीत जमीन सशक्त बनविणाऱ्या अनंत कोटी जीव जंतूंचं राहतं घर तुम्ही नष्ट करीत असता .
आज जगात भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो आणि विशेष म्हणजे या लोक संख्येला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याबाबत भारत स्वंयपूर्ण आहे.यावरून भारतीय संस्कृतीत शेतीचे महत्व विषद होते.
परंतु असे असले तरीही दुसरीकडे मात्र पिकाच्या अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी भारतीय शेतीचे आरोग्य बिघडत चालले असल्याचे चित्र सामोरे येत आहे. सधन कृषी पद्धतीत रासायनिक खतांच्या अनिर्बंधित वापरामुळे तसेच तदनुषंगिक कारणामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी माती तपासणी आधारित खतांच्या परिणामकारक वापरास महत्व प्राप्त झाले आहे.परिणामी शेतीबाबत पर्यायाने मातीच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे.
ऊसाच्या पाचटात असे आहे काय ? ऊस पिक जमिनीतून जी अन्नद्रव्ये उचलतात ती सगळीच असतात . म्हणजे आपण जो ऊस पिकवितो, तो ऊस आपल्या जमिनीतून जे जे काही उचलतं, ते सगळं चिपांड, पाचट व वाढयांत असतं व खोडकीतही असतं हे सगळं (ऊसातील रस सोडून ) जरी जमिनीला आच्छादन म्हणून परत केलं , तरी तेवढा ऊस जगण्याला जे जमिनीतून पाहीजे ते मिळून जातं वरून टाकण्याची गरज राहत नाही . हे पक्के लक्षात घ्यावे . एक हेक्टर उसापासून हे पाचट किती मिळते व त्यात काय असते ? ८ ते १० टन पाचट मिळते . ते जर ऊसात / द्राक्ष /केळी /डाळींब / नारळ / सुपारी / आंबा / संत्रा उभ्या फळपिकात आच्छादन म्हणून वापरले व कुजविले तर
त्यापासून ४ / ५ टन खत मिळते हया खतात त्याच्या एकुण वजनाच्या ०.४८ % नत्र , ०.१९ % स्फूरद, ०.९२% पालाश, ०.९४ % कॅल्शिअम , ०.७४ % मॅग्नेशियम , ०.१२% सोडिअम, ०.१७ % लोह, ०.००९ % मॅग्नीज, ०.००४ % जस्त,० .०००३ % तांबे इत्यादी अन्नघटक असतात. ते वरील सर्व फळपिकांत आच्छादन म्हणून टाकले तर पिकाला सहज उपलब्ध होतातच! शिवाय जीवजंतूची आच्छादनाखाली व परिसरात प्रंचड वाढ होते व आच्छादनाचे इतर सर्व फायदे मिळून येताातच. त्यासाठी ऊसाचे पाचट न जाळून स्व:तावर कृपा करून जीवजंतूचे पर्यायाने निसर्ग सजीव सृष्टीचे रक्षण करुन शाश्वत शेती करूया
Share your comments