कोकणात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली गेल्याने आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त करताच कधी न झाले ते यंदा होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यापासून कोकणात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
आज सकाळपासून रत्नागिरीकरांना सूर्य दर्शन झाले नाही. शिवाय किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा सुरवाती म्हणजे झाडाला मोहर लागण्याच्या प्रक्रियेपासूनच निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम आंबा फळबागांवर झालेला आहे. टप्याटप्याने होत असलेल्या अवकाळी पावसाने कोकणामध्ये आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हंगामाच्या सुरवातीपासूनच अतिवृष्टी, गारपिट, थंडीचा कडाका आणि आता काढणीच्या दरम्यान होत असलेला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे.
या परिस्थितीमुळे यंदा एकूण उत्पादनापैकी केवळ १० ते २५ टक्केच उत्पादन बागायतदारांच्या पदरी पडणार आहे. कोकणातल्या हापूसला सबंध देशभरातून मागणी असते. रत्नागिरी आणि देवगड हापूसची गोडी आंबा खवय्यांना तृप्त करून टाकते. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा खवय्यांना आंबा आवाक्यात येण्यासाठी तब्बल आणखी महिनाभराची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.
उत्पादनात मोठी घट झाल्याने याचा परिणाम आता दरावर पाहवयास मिळत आहे. आजही आंबा एक हजार ते दिड हजार रुपये डझन विकला जात आहे. हंगामाच्या तुलनेत खूपच कमी आवक मुंबई बाजारपेठेत येत आहे. मात्र, वाढत्या दरामुळे सामान्य ग्राहक आंबा खरेदीला कसा प्रतिसाद देणार ते पहावे लागणार आहे. जानेवारी महिन्यापासूनच आंबा उत्पादनाला सुरवात होते. पण निसर्गाच्या लहरीपणाचा सामना आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच करावा लागला होता. सुरवातीला अवकाळीमुळे मोहर गळाला तर यातून सावरत असताना पुन्हा गारपिटीने उर्वरित मोहोर झोडपला.
निसर्गाच्या अवकृपेमुळे तीन्हीही टप्प्यातील पुरेसे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. परिणामी अधिकचा खर्च करुनही यंदा कोकणातील शेतकरी हताश झाला आहे. यंदा आंबा बाजारपेठेत दाखल होण्यास वेळ झाला असून अद्याप पुरेशी आवक मुंबई बाजार समितीमध्ये होत नाही. गेली ७ ते ८ वर्षांपासून आंबा उत्पादन कमी-जास्त प्रमाणात होत आहे.
दरवर्षी जानेवारी महिन्यापासून मार्चपर्यंत जवळपास १ लाख पेट्यांमधून हापूसची आवक मुंबई बाजार समितीमध्ये होत असते. तर अंदाजे १० हजार पेट्यांची निर्यात ही दुबई, ओमान आणि कुवेत या देशांमध्ये केली जाते. या वर्षी एप्रिल महिना उजाडला तरी केवळ २० ते २५ हजार पेटी आंबा बाजारात येत आहे. तर दराअभावी सामान्य लोकांना ती विकत देखील घेता येत नाही.
महत्वाच्या बातम्या;
LPG सिलिंडर ग्राहकांना मिळत आहे जोरदार ऑफर, ३०० रुपयांनी स्वस्त मिळेल गॅस, जाणून घ्या..
आनंदाची बातमी! आता शेतकऱ्यांना खतांसाठी मिळणार थेट 100 % अनुदान, मोदी सरकारचा मोठा निर्णय..
Share your comments