सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना (New plans) राबवत असते. आता आपण पाहिले तर शेतीमध्ये नवनवीन तंत्रे (New techniques) देखील आली आहेत. याच्या साहाय्याने शेतकरी आपले उत्पन्नही वाढवत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी भाजीपाला पिकातून चांगले उत्पादन घेऊ शकतात.
परंतु शेतकऱ्यांना योग्य पद्धतींचा वापर कसा करायचा हे माहीत असणे गरजेचे आहे. मचान आणि 3G कटींग (Scaffolding and 3G cutting) पद्धतीने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला तर त्यांना चांगला नफा मिळू शकतो. ग्रामीण भागातील बरेच शेतकरी मचान पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करून चांगला नफा मिळवत आहेत.
व्यवसाय करायचाय पण भांडवल नाही बोलणारांसाठी ही बातमी! आता शेळी पालनासाठी मिळणार 4 लाख रुपये...
मचान पद्धतीने भाजीपाला लागवड
वेल भाजीपाला मचान पद्धतीने (Scaffolding) पिकवल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. या तंत्राने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना बांबू किंवा वायरची जाळी तयार करून भाजीपाला जमिनीपासून उंच वाढवला जातो. या पद्धतीने काकडी, कारले, दुधी भोपळा, दोडका यासारख्या वेलवर्गीय भाज्या उगवता येतात.
पावसाळ्यात मचान बांधल्याने पिकाचे (crops) नुकसान होण्यापासून संरक्षण होते. रोग आणि आजार होण्याची शक्यता खूपच कमी होते. पिकात कोणताही रोग आढळल्यास सोप्या पद्धतीने तुम्ही सहज औषध फवारणी करू शकता.
अशा पद्धतीने लागवड (cultivation) केलेली भाज्या दिसायला अतिशय आकर्षक आणि निरोगी राहतात. त्यामुळे या भाज्यांची किंमत देखील बाजारात चांगली राहते. इतर पद्धतींनी भाजीपाला लागवडीपेक्षा उत्पन्नही जास्त मिळते.
Agricultural Business: शेतकऱ्यांनो 'हे' 3 व्यवसाय शेतीमधून करा; कमी खर्चात मिळेल लाखोंचा नफा
3G कटिंग
3G कटींग विषयी आपण जाणून घेऊया. यामध्ये मुख्य फांदीमध्ये २०-२५ पाने दिसू लागल्यावर वरचा भाग काढून टाकला जातो. त्यातून दोन मादा फांद्या निघतात. त्यामुळे फळांची संख्या वाढते. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि नफाही दुप्पट होईल. यास 3G कटींग म्हणतात.
थ्रीजी कटिंग पद्धतीने (3G Cutting Methods) शेती केल्यास त्याचे चांगले उत्पन्न मिळेल. मुख्य फांदीला बहुधा नर फुले येतात आणि दुय्यम फांदीवर मादी फुले येतात. त्यामुळे फळांची संख्या वाढते. याचा अर्थ शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्याचवेळी नफाही दुप्पट होईल.
महत्वाच्या बातम्या
Heavy Rain: 'या' ठिकाणी धो-धो बरसणार पाऊस; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
'या' राशीच्या लोकांना कामात मिळणार भरभरून यश; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मत्स्यपालकांनो आता ऑनलाइन ताजे मासे खरेदी विक्री करा; सरकारने केले 'एक्वा बाजार' अँप लाँच
Share your comments