आपल्या साठी शेती महत्त्वाची आहे कारण आपली उपजीविका त्या शेतीवर अवलंबून आहे.या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्यासाठी शासन नवनवीन योजना राबवत असतात त्याच विषयावर च आजचा लेख आहे. शेतकरी बांधवांनो केंद्र शासनाने च उद्दीष्ट २०२२पर्यत आपल्या शेतकरी वर्गाचं उत्पन्न दुपटीने वाढले पाहिजे या विचाराने एक योजना राबवत आहे ति म्हणजे 'गट शेती' आपल्या शेतकर्याच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची आहे.आपल्या शेती मधे आपला उत्पादन खर्च कमी व्हावा या दृष्टीने गट शेती सर्व शेतकरी बांधवांना फायद्याची कश्या प्रकारे ठरू शकते हे सर्व शेतकरी बांधवांनी समजून घेऊन गट शेती केली पाहिजे. म्हणूनच शेतकरी बांधवांच्या गट शेतीच चालना मिळाली पाहिजे या दृष्टीने सरकारने गट शेती ला 24 जुलै 2017 नुसार मान्यता दिली.आता प्रश्न पडला असेल कि हे गटशेती म्हणजे काय?काय करावे लागेल या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळलं व समाधान सुद्धा होईल.
गट शेती म्हणजे शेतकऱी मित्रांनी आपली जमीन स्वतः न कसता अनेक शेतकऱी मित्रांना सोबत घेऊन व सर्व मित्र एकत्र आल्या वर आपल्या गावातिल किंवा शिवारातील शेती भौगोलिक क्षेत्राचा विचार करून एकत्रितपणे शेती करणे म्हणजे यालाच साध्या भाषेत गट शेती किंवा समुह शेती असे म्हटले जाते.त्याच बरोबर गट शेती म्हणजे शेती ला अनुसरून आपल्या शेतामधुन निघणार्या उत्पादनावर प्रक्रिया करणे सुध्दा गटशेती करण्यासाठी सर्व शेतकर्याच्या सहकार्याने सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करणं आणि या सर्व माध्यमांतून आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा म्हणजेच गट समूहाचा विकास साध्य करून सर्व शेतकऱ्यांची गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करणे म्हणजे गटशेती.
जमिनीचे सातत्याने होत असलेले तुकडे त्या मध्ये जमिन चे क्षेत्र ही कमी होत चालली आहे. एवढ्या कमी क्षेत्रावर शेती करणेआर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरनारच नाही या समस्येवर समूह शेती प्रभावी उपाय ठरू शकतो गट शेती यशस्वी करायची असेल तर शेतकऱ्यांना गट शेती साठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविण्यात येत आहे,तसेच गट शेती च्या माध्यमातून सामूहिक रित्या शेती करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल यासाठी गट शेती ला प्रोत्साहन हे देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे साठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. आणि याच अनुषंगाने शासन तर्फे पथदर्शी योजना ही आखण्यात आलेली आहेत.अंमलबजावणी कश्या करावं महाराष्ट्र राज्यात गट शेती योजना अंतर्गत शेती करण्यासाठी ज्यांना गट शेती करायची आहे त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणी करावी व गट स्थापन करण्यात यावा. अथवा कंपनी कायदा 1956 च्या तरतुदी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून शेतकरी गटाची नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.आता पाहू गटशेतीचे फायदे काय आहेत समूह शेतीमुळे आधुनिक तंत्रज्ञान व नविन पद्धतीचे यांत्रिकीकरण करून शेती व्यवसाय चांगला होण्यास मदत होणार आहे
गटाच्या माध्यमातून शेतीमालाची विक्री केल्याने उत्पादन व वाहतूक खर्चात बचत होऊन फायदा वाढेल.त्याच बरोबर काही शेती उत्पादन मालावर काढणीपश्चात प्रक्रिया करणे ही शक्य होईल व शेतीमालास योग्य चांगले भाव भेटणे ही शक्य होईल.त्याच बरोबर गट शेतीमुळे पशुपालन, दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय, मत्स्य व्यवसाय व्यवसाय रोपवाटिका मधुमक्षिकापालन आदी शेतीपूरक जोडघंदे करणे शक्य होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन
वाढणार आहे.या गटासाठी आवश्यक असणारी पात्रता
गटामध्ये किमान खातेदार शेतकरी संख्या २० व किमान समूहाचे क्षेत्र १०० क्षेत्राच्या प्रमाणात आर्थिक अनुदान राहील.अल्पभूधारक शेतीच्या संसाधनाची व मनुष्यबळाची उणीव असणाऱ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा गट किंवा समूह शेती.समान पीक पद्धतीवर आधारित उत्पादन प्रक्रिया ते विक्री यामधील समान उद्दिष्टवर काम करणाऱ्या शेतकऱ्यासाठी गट किंवा समूह शेती विपणन आधारित समूह शेती संकल्पना प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन या संकल्पनेवर आधारित समूह शेती संकल्पना पीक उत्पादन प्रक्रिया मधील विशिष्ट कामावर आधारित समुह शेती संकल्पना समान आर्थिक व भौगोलिक परिस्थितीत समान व पूरक व्यवसाय करणारे शेतकरी
गटांची नोंदणी कुठे करावी ?
आत्मा संस्थेकडे नोंदणी
सहकारी संस्था अधिनियम अन १९६०अंतर्गत नोंदणी शेतकरी उत्पादक कंपनी अधिनियमन १९५६ अंतर्गत नोंदणी योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरता शेतकरी गटांच्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न सलग्न असणे अनिवार्य असणार आहे.गट शेतीअंतर्गत २० शेतकरी गटांच्या माध्यमातून किमान १०० एकर क्षेत्रावर शेतीकरिता गटांमार्फत विविध कृषी व कृषीपुरक उपक्रम, प्रकल्प स्वरूपात राबविल्यास राज्य सरकार मान्यता देते. सदर योजनेअंतर्गत एका समूह गटासाठी आवश्यक असलेली १०० एकराची क्षेत्रमर्यादा ज्या ठिकाणी सुरक्षित भाजीपाला, सुरक्षित फुलपिके अशा पिकांचे उत्पादन घेतात, त्यांचे एका समूह गटाचे पॉलीहाऊस किंवा शेडनेटचे एकूण क्षेत्र किमान २५ एकर असल्यास व ४ उपगटाचे एकूण क्षेत्र १०० एकर असल्यास सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतात.त्याच बरोबर आपल्या शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी गट शेती योजनेमार्फत कामाचे नियोजन व आधुनिक पद्धतीची आपल्या राज्याला गरज आहे. त्यासाठी राज्यातील शेतक-यांना गट शेती योजनेमार्फत प्रोत्साहन देण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे.
श्री. अमर तायडे विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार)
कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती १
मों9850620002
श्री अमर तायडे सर यांच्या मार्गदर्शन
माहीती संकलण
मिलिंद जि गोदे
Share your comments