उन्हाळी हंगामामध्ये सिंचनाची सोय असल्यास भुईमुगाचे उत्पादन खरिपाच्या तुलनेमध्ये चांगले येते. या पिकाला उन्हाळी हंगामातील भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान मानवते. रोग, किडींचा प्रादुर्भाव नगण्य राहतो. मात्र शेंगा उत्तमरीतीने पोसण्यासाठी गादीवाफ्यावर भुईमुगाची लागवड करावी.
भुईमूग हे पाण्यासाठी संवेदनशील पीक आहे. पाणी कमी किंवा अधिक झाल्यास त्याचा उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होतो. हे टाळण्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीने (गादी वाफे) लागवड करावी. या पद्धतीमुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. तसेच ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचाही अवलंब करता येतो.
जमीन
पेरणीसाठी मध्यम, परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. या जमिनी भुसभुशीत असून, जमिनीत भरपूर हवा खेळती राहते. परिणामी मुळांची चांगली वाढ होते. आऱ्या सुलभपणे जमिनीत जाऊन शेंगा पोसण्यासाठी मदत होते.
पूर्वमशागत चांगली मशागत करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
पेरणीची वेळ
उन्हाळी भुईमुगाची लागवड जानेवारीचा दुसरा पंधरवडा ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करावी. लागवडीस जसजसा उशीर होईल तसतशी उत्पादनात घट येते.
बियाणे उपट्या वाणासाठी १०० किलो, तर मोठ्या दाण्याच्या वाणासाठी १२५ किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते. निमपसऱ्या व पसऱ्या वाणासाठी ८० ते ८५ किलो बियाणे वापरावे.
बीजप्रक्रिया
पेरनी अगोदर बिजामृत तयार करुन बियान्यावर बीजप्रक्रिया करावी.बिजप्रक्रीया करतांनी बियाने जास्त ओले करु नये व अलगद चोळावे नाहीतर दान्यांचे टरफल निघन्याची शक्यता असते. बियाणे सावलीत वाळवून मग लागवडीसाठी वापरावे. आंतरपीक व सहजीवन म्हनुन भुईमुगामधे झुडपी चवळी,मका,बाजरी,ज्वारी या पैकी जे जमेल ते अतीषय विरळ पध्दतीने टोकावे.पन नत्र पुरवठा करन्याकरीता कोनतेही द्विदल लावने अावश्यकच.
आंतरमशागत
पीक साधारणत: ६ आठवड्यांचे होईपर्यंत तणविरहित ठेवावे. यासाठी आच्छादन उपयुक्त ठरते.
आच्छादन शक्य नसल्यास आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी करावी व खुरपनी केल्यानंतरचे गवत तेथेच पडु द्यावे त्याचे आच्छादन होईल.पीक साधारणत: ५० दिवसांचे झाल्यानंतर मातीची भर देण्याकरिता शेवटची कोळपणी करावी. नंतर मोठे तण उपटून घ्यावे. आऱ्या सुटल्यानंतर आंतरमशागतीचे कोणतेही काम करू नये
पूर्वमशागत करताना शेवटच्या पाळीचे अगोदर एकरी 400 कीलो घनजीवामृत विस्कटुन जमीनीवर टाकावे.
पाणी व्यवस्थापन
पेरणीपूर्वी पाण्याची पहिली पाळी द्यावी. वाफसा आल्यावर पेरणी करून लगेच पाण्याची दुसरी पाळी द्यावी.
उगवणीनंतर नांगे आढळून आल्यास ते भरून नंतर पाण्याची तिसरी पाळी द्यावी. नंतर पाण्याचा ताण द्यावा. म्हणजे साधारणत: २० ते २५ दिवस पिकास पाणी देऊ नये, त्यामुळे एकदम फुले येण्यास मदत होते.
त्यानंतर पाण्याची चौथी पाळी देऊन ताण तोडावा. पुढे पाण्याची कमतरता पडू देऊ नये. साधारणत: फेब्रुवारी महिन्यात १०, मार्च महिन्यात ८, एप्रिल महिन्यात ६ ते ८ आणि मे महिन्यात ४ ते ६ दिवसांनी पिकास ओलीत करावे. तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे भुईमुगास मानवते.
रुंद वाफा सरी तयार करताना पूर्वमशागतीनंतर तयार झालेल्या शेतामध्ये १.२० मीटर अंतरावर छोट्या नांगराने ३० सें.मी. रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. त्यामुळे ०.९० मीटर रुंदीचे रुंद वाफे (गादी वाफे) तयार होतात. वाफ्याची उंची १५ ते २० सें.मी. ठेवावी. यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करता येतो. एकूणच सिंचनाच्या पाण्यामध्ये बचत होते.
रुंद वाफ्यावर दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवून टोकन पद्धतीने भुईमुगाची लागवड करावी.
गादीवाफे पद्धतीचे फायदे
गादीवाफ्यावरील जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढते. पिकांची वाढ जोमदार होते.
जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलित ठेवता येते.
ठिबक, तुषार किंवा पाटानेही सिंचन करणे सोईस्कर होते. पिकास पाण्याचा ताण बसत नाही, तसेच अतिरिक्त पाणी झाल्यास निचराही त्वरीत होतो.
प्रत्येक पान्यासोबत जीवामृत सोडावे एकरी 200 लीटर या प्रमानात.तर पीकाची अवस्था व येनारे रोग,कीडी बघुन फवारनीचे नियोजन करावे,त्या साठी दशपर्नी अर्क,जीवामृत,ताक,सप्तधान्यांकुर,नीमास्त्र,ब्रम्हास्त्र वगैरे चा उपयोग करावा.
नैसर्गिक विषमुक्त शेती,महाराष्ट्र.
या मधे काही अडचन आल्यास संपर्क करु शकता.सकाळी दहा ते संध्या.पाच पर्यंत.
शेवटी आपन सर्व नियोजन आपले हीशेबानेच करावे,मी जे सांगीतले तसेच करावे कींवा नाही हे तुम्ही ठरवावे.ज्या पध्दतीने उत्पन्न वाढेल व खर्च कमी होईल तीच पध्दत नीवडावी.
Share your comments