1. कृषीपीडिया

रब्बी हंगामात भुईमूग लागवड करायचे आहे? तर वापरा ही पद्धत होईल फायदा

भुईमूग हे तेलबिया वर्गातील महत्त्वाचे पीक असून देशातील एकूण उत्पादनापैकी 80 टक्के तेलासाठी, दहा टक्के प्रक्रिया करून खाणे व 10 टक्के निर्यातीसाठी वापरले जाते. दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यांमध्ये अंड्या पेक्षा अधिक प्रथिने आहेत. या लेखात आपण रब्बी हंगामात भुईमुगाची पेरणी व व्यवस्थापन या बद्दल माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
groundnut

groundnut

भुईमूग हे तेलबिया वर्गातील महत्त्वाचे पीक असून देशातील एकूण उत्पादनापैकी 80 टक्के तेलासाठी, दहा टक्के प्रक्रिया करून खाणे व 10 टक्के निर्यातीसाठी वापरले जाते. दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यांमध्ये अंड्या पेक्षा अधिक प्रथिने आहेत. या लेखात आपण रब्बी हंगामात भुईमुगाची पेरणी व व्यवस्थापन या बद्दल माहिती घेणार आहोत.

रब्बी हंगामात भुईमुगाची पेरणी आणि व्यवस्थापन

जमीन

 भुईमूग लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत, वाळूमिश्रित व सेंद्रिय कर्ब असलेली जमीन निवडावी.अशा जमिनीत आऱ्यासहज जाऊन शेंगा चांगल्या पोसतात जमिनीमध्ये हवा खेळती राहून मुलांना भरपूर हवा मिळते.मुळावरील नत्राच्या गाठींची वाढ होते. भारी चिकण मातीच्या जमिनी ओलसरपणा कमी झाल्यावर कडक होतात. तसेच अशा जमिनीत भुईमूग काढणीच्या वेळी शेंगा जमिनीत राहण्याची शक्यता असते. अशा जमिनीत भुईमुगाची लागवड करू नये.

भुईमूग पेरणीचा कालावधी

रब्बी हंगामात भुईमुगाची पेरणी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधी दरम्यान करावी. त्यानंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता अधिक असते.

भुईमुगाचे सुधारित वाण

  • भुईमूग लागवडीसाठी एस.बी.-11, टी ए जी -24,टीजी – 26 या जातींचे हेक्‍टरी 100 किलो बियाणे लागते. तर फुले प्रगती, फुले ऊनप, फुले व्यास, जे.एल.- 501, फुले भारती या जातीचे हेक्‍टरी 120 ते 125 किलो बियाणे लागते.

भुईमूग लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया

 भुईमूग पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम मॅन्कोझेब किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्माचीप्रक्रिया करावी.त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम आणि 25 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून त्वरित पेरावे.

भुईमुगाची पेरणी ची पद्धत

 भुईमुगाची पेरणी करताना दोन ओळीतील अंतर तीस सेंटिमीटर व दोन रोपांतील अंतर दहा सेंटिमीटर ठेवावे. जमीन ओलावून नंतर वाफशावर पाभरीने अथवा टोकण पद्धतीने पेरणी करावी. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागून  उगवण चांगली होते.

English Summary: groundnut cultivation techniqe in rabbi session Published on: 18 October 2021, 10:43 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters