शेतकऱ्यांना (farmers) दिलासा देणारी बातमी आहे. सध्या देशभरात गव्हाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत गव्हाच्या किंमतीत (wheat prices) आणखी १०-१५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गहू उत्पादक (Wheat grower) शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. इथून पुढच्या काळात गव्हाच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन (Roller Floor Millers Federation) ऑफ इंडियाचे अध्यक्ष अंजनी अग्रवाल (Anjani Aggarwal) यांनी दिली आहे.
माहितीनुसार किमती जर कायम राहिल्या आणि एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेल्या तर सरकार हस्तक्षेप करण्याची देखील शक्यता आहे. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारपेठेने सरकारसमोरील मर्यादित पर्यायांचा विचार केला आहे.
Soil Fertility: शेतातील मातीची सुपिकता 'या' सोप्या मार्गांनी वाढवा; जाणून घ्या
या कारणाने गव्हाच्या किमतीत होणार वाढ
1) मागील आठवड्यात देखील देशात गव्हाच्या किंमतीत (wheat prices) चांगली वाढ झाली होती.
2) उष्णेतेच्या लाटेचा गहू पिकाला बसलेला फटका आणि सध्या गव्हाला होत असलेली मागणी यामुळं किंमती वाढत आहेत.
3) गव्हाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी पुरवठा कमी होत असल्यानं गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
4) बहुतेक शेतकऱ्यांनी त्यांच्या गव्हाची विक्री केली आहे.
Money Plant: मनी प्लांट लावताना 'या' चुका करू नका; अन्यथा घरावर येईल संकट
5) मात्र, मोठ्या व्यापाऱ्यांकडे सध्या गव्हाचा (wheat) साठा शिल्लक आहे.
6) सध्या बाजारपेठेत गव्हाची मागणी वाढली आहे. मागणी वाढली तरी पुरवठा मात्र, कमीच आहे.
7) त्यामुळं गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे.
8) सध्या स्थानिक बाजारात गव्हाच्या किंमती या 23 हजार 547 रुपये प्रति टनावर पोहोचल्या आहेत.
9) गव्हाला मिळणारा हा दर विक्रमी असल्याचे बोलले जात आहे.
10) 14 मे रोजी सरकारनं निर्यातीवर अचानक बंदी घातली होती. त्यानंतर गव्हाच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो सर्वात कमी कालावधीचे 'हे' पीक करेल मालामाल; जाणून घ्या लागवडीविषयी
Cultivation Walnuts: अक्रोडची लागवड अशा प्रकारे केल्यास मिळेल दुप्पट उत्पन्न; जाणून घ्या सविस्तर
शेतकरी मित्रांनो गायीच्या गोमूत्राचा शेतीत अशाप्रकारे वापर करा; मिळेल भरघोस उत्पन्न
Share your comments