1. कृषीपीडिया

हरभरा रोग आणि कीड व्यवस्थापन

KJ Maharashtra
KJ Maharashtra

हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जानारे महत्वाचे कडधान्य आहे. हरभरा पिकाच्या उत्पादनात कमी होण्याचे मुख्य करणे हरभाऱ्याला होणारे बुरशीचे रोग आणि त्याला लागणारी किड आहे त्यामुळे हरभरा वाढिच्या वेळेला मर, मानकुजव्या, मुळकुज सारखे रोग आणि घाटे आळी सारख्या किडी चे लंक्षणे ओळखून नियंत्रण करने फार गरजेचे आहे.

रोग व्यवस्थापन

मर

मर रोग फ्युजाहियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमीन मधुन आणी बियाव्दारे होतो. हा झाडाची अन्नद्रव्य वाहून घेऊन जाणाऱ्या पेशीला मारतो. मर रोगाची बुरशी 6 वर्षापर्यंत जमीन जिवंत राहू शकते. पण ज्या भागात हवामान जादा थंड राहते तेथे याचा प्रार्दुभाव कमी दिसतो.

लक्षणे

 • झाडाचा जमिनी वरचा भाग, देठ आणी पाने सुकतात व झाड वाळून मरतात.
 • कोवळी रोप सुकतात.
 • जमिनी खालचा खोडाच्या भागाचा रंग कमी होतो.
 • रोगग्रस्त झाडाच्या खोडांना उभा छेद दिल्यास फिकट तांबुस काळसर रंग दिसून येतो.

व्यवस्थापन

 • वेळेवर पेरणी करावी.
 • मोहरी किंवा जवस आंतरपिक म्हणून घ्यावेत.
 • रोग प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा.

पीकेव्ही, हरिता, बीडी एन जी 797, दिग्विजय, जे एस सी 55

 • बीजप्रक्रिया

3 ग्राम कार्बेन्डाझिम (बाविस्टीन) किंवा कारबॉक्सिन + 2 ग्राम थायरम + 4 ग्राम ट्रायकोडेना व्हायरिड / किलो बियाणे

कोरडी मूळकुज

हा राइझोक्टोनिया बॅटॅटिकोला या बुरशीमुळे होतो. याचा प्रसार जमिनी व्दारे होतो. या रोगाची लक्षणे फुल लागणे वेळी आणि घाटे भरतेवेळी मुख्यत्वाने दिसते. शेतात ओलावा कमी आणि तापमान (300c) जास्त असेल तर या रोगाचा प्रार्दुभाव जादा दिसतो.

लक्षणे

 • रोगग्रस्त झाडाची पाने व फांद्या वाळतात.
 • संपूर्ण झाडाचा हिरवा रंग बदलून राखाडी होतो.
 • मुळे कुजतात आणि काळी पडतात.

व्यवस्थापन

 • वेळेवर पेरणी करावी.
 • उन्हाळ्यात रोगग्रस्त जमिनीची खोलवर नागरट करावी आणि मातिचांगली तापू द्यावी
 • बीजप्रक्रिया

1 ग्राम कार्बेन्डाझिम (बाविस्टीन) किंवा कारबॉक्सिन + 2 ग्राम थायरम + 4 ग्राम ट्रायकोडेना व्हायरिड / किलो बियाणे

 • प्रतिकारक्षम जातीचा वापर.

भरती, डब्ल्युसीजी 10, हरियाणा काबूली चना 2

मान कुजव्या

या रोगाचा प्रार्दुभाव स्क्लेरोटियम रोल्फसी या बुरशीमुळे होतो. ज्या शेतात पेरणीवेळी जमिनित जास्त ओलावा आणि तापमान जास्त (300c) असते त्या ठिकाणी रोगाचा प्रार्दुभाव अधिक अढळून येतो. जमिनीवर पुर्विच्या पिकाचे अर्धवट किंवा न कुजलेले अवशेषामुळे या रोगाचे प्रमाण अधिक असेते.

लक्षणे

 • पेरणी नंतर 50 दिवसांपर्यंत या रोगाचे जास्त प्रमाण दिसून येते.
 • झाडे पिवळी पडून वाळून मरतात.
 • रोगग्रस्त झाड सहजासहजी उपटून येते.
 • खोडाचा जमिनी लगतचा भाग बारीक होऊन कुजू लागतो.
 • प्रार्दुभाव झालेल्या भागावर पांढऱ्या रंगाची बुरशी वाढते.
 • खोडावर व मुळवर मोहरीच्या आकाराचे गोलाकार स्क्‌लेरोशिया दिसतात.

व्यवस्थापन

 • अधिच्या पिकाचे सर्व अवशेष शेतातून काढून टाकावे.
 • उन्हाळ्यात जमिनीची खोलं नागरट करावी.
 • शेतात उत्तम प्रतिचे कंपोस्ट कुजलेले खत वापरावे (5 टन प्रति हेक्टरी)
 • बीजप्रक्रिया

 विटावॅक्स 2-3 ग्राम / किलो बियाणे

1 ग्राम कार्बेन्डाझिम किंवा कारबॉक्सिन + 2 ग्राम थायरम + 4 ग्राम ट्रायकोडेना व्हायरिड / किलो बियाणे

 • प्रतिकारक्षम जातिचा वापर

जेजी 63, हरियाणा काबुली चना 2, आधार

करपा

हा रोग एस्कोचीटा रबीएई नावाच्या बुरशी मुळे होतो. अती आद्रता आणि कमी तापमानाच्या हवामानामुळे या रोगाचा प्रसार होण्यास मदत होते असे हवामान फार कमी ठिकाणी असते. हा रोग 100 टक्‌क्यापर्यंत नुकसान करू शकतो जर त्याला पोषक असे ववातावरन मिळाले तर.

लक्षणे

 • फुले लागणीच्या आणि घाटे भरणीच्या वेळेला या रोगाची सुरवात होते.
 • रोगग्रस्त झाडे शेतात वेग-वेगळ्या ठिकाणी दिसुन येतात.
 • खोडा जवळ गडद तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
 • पोषक वातावरन नमिळाल्या मुळे हा रोग खोड, पान आणि घाट्यावर मर्यादित राहून झाडे वाचतात.

व्यवस्थापन

 • उशीरा पेरनी करावी.
 • दोन ओळीत व रोपात जास्त अंतर ठेवणे.
 • गहु, बारली आंतरपिक घेणे.
 • बीजप्रक्रिया

थिरम, बेनोमिल, कॅल्ब्रिन-एम, थायोबेन्डाझोल, बाविस्टीन + थिरम (१:२), हेक्साकॅप, कॅप्टॅफ 3 ग्राम / किलो बियाणे  

रोव्ह्रल 2.5 ग्राम / किलो बियाणे

 • रोगप्रतिकारक्षम जातीचा वापर

सम्राट, पीबीजी-1, पीबीजी-5, पुसा – 372

बोट्रीटिस ग्रे मोल्ड

हा रोग बोट्रीटिस सिनेनेरिया बुरशीमुळे होतो. ज्या प्रवेशात जास्त आर्द्रता व मध्यम तापमान असने अशा ठिकाणी अधिक प्रमानावर हा रोग अढळून येतो आणि पुर्ण नुकसान करू शकतो.

लक्षणे

 • रोगाची सुरवातीची लक्षणे कळ्या आणि फुलांवर दिसते.
 • फुले आणि कळ्यांवर करड्या व परकिरी रंगाची ठिपके दिसून येतात.
 • शेतात वेगवेगळ्या ठिकाणी मरून पडलेली दिसतात.

व्यवस्थापन

 • बागायती भागात उशीरा पेरणी करणे
 • दोन ओळीत आणि रोपात जास्त अंतर ठेवणे.
 • बीजप्रक्रिया

बाविस्टीन + थिरम (1: 2), दिथेन एम 45, बाविस्फिन 3 ग्राम / किलो बियाणे

थिओबेंडाझोल 2 ग्राम / किलो बियाणे

रोव्ह्रल आणि रोनिलन 4 ग्राम /किलो बियाणे

 • फवारनी

डायथेन एम 45, 350 ग्राम / हेक्टर

थायोबेन्डाझोल किंवा बेलेटोन 200 ग्राम / हेक्टर

रवुजा रोग

हा विषाणूजन्य रोग आहे यात झाडाची वाढ खुटते हा गुजरात व राजस्थान राज्यांचा स्थानिक रोग असून इतर भागात कमी प्रमानत अढळून येते.

लक्षणे

 • झाडाची वाढ खुंटते.
 • पाने लहान, पिवळी जाड होतात.
 • झाडाची पाने पिवळी किंवा नारंगी किंवा तपकिरी रंगाची दिसतात.
 • रोगग्रस्त झाडाच्या खोडाचे निरिक्षन केल्यास तंतूपेशी तपकिरी रंगाच्या दिसतात.

व्यवस्थापन

 • उशीरा पेरणी केल्यास रोगाची प्रार्दुभाव कमी होतो.
 • हा रोग तुडतुडे व मावा किंडींन पासून पसरतो त्यांचे नियंत्रण करणे.
 • रोगास सहनशील जेजी 16 चा वापर करावा.

 

कीड यवस्थापन

घाटे आळी

हेलिकओव्हरपा आर्मिगेरा (घाटे आळी) खूप खाणारी असून ती कोवळी पान, फुल, कळ्या आणि घाट्या, कोवळी पाने, सर्व काही खावुन टाकते.

लक्षणे

 • अळी बाल्यावस्थेत, पिवळी, गुलाबी, काळे किंवा राखडी रंगाची असुन कोवळी पाने व फांद्या वर उपजिकिा करते.
 • दसऱ्या अवस्थेत पाने, कळ्या, फुले खाते.
 • तिसऱ्या अवस्थेत घाट्यांना छिद्र करून दाने खाते.

व्यवस्थापन

 • सहनशील जातीची लागवड करणे.

जेजी-130, जेजी 322, जेजी 11, जेजी 74, आयपीसी 97-67, आरएसजी 888,

 • खोल नांगरट करणे.
 • लवकर पिकणाऱ्या जाती बरोबर मोहरी, जवस, बोरलीचे आतंरपिक घेणे.
 • प्रतिहेक्टर 5-6 कामगंध सापळे उभारने.
 • अळी खानाऱ्या पक्षी ला थाबन्यासाठी टी आकाराचा पक्षी थांबा तयार करावे.
 • अळी ची सुर्वातिच्या अवस्थात दिसल्यास 5 टक्के निबोंकीवर आधारित किटकनाशक 1 टक्के साबनाचे द्रावण मिसळून फवारणी करणे.
 • जैविक किड नियंत्रण एन पी व्हि या विषाणूचा वापर करून केली जाते.
 • फवारणी

प्रोफेनफॉस 50 इसी 1500 मिली / हेक्टर

इंडोक्सॅकार्ब 145 एस सी 500 मिली / हेक्टर

स्पिनोसॅड 45 इसी 60 मिली / हेक्टर

रायनाक्सापिर 20 एस सी 75 मिली / हेक्टर

वाळवी (ओडोटोटरमेस आबेसस आणि मायक्रोटरमेस आबेसी)

हा किडा कोरड्या जमिनीत अढळुन येतो. मुरमाड व हलक्या गाळाच्या जमिनीत वाळवी चे प्रमाण जास्त असते. हा समुहाने राहनारा किडा असुन तो अनेक पिकांवर उपजिविका करतो. याला पांढरी मुंगी असे म्हणुन ओळखले जाते. वाळवी पेरणी केल्या नंतर लगेच दिसण्यास सुरू होते व झाडे लहान असतानाच खाऊन टाकते

लक्षण

 • मुरमाड व हलक्या गाळच्या जमिनीत याचा प्रादुर्भाव जास्त असतो.
 • नविन उगवलेल्या रोपांना नुकसान करते.
 • किडग्रस्त झाडे सुकतात कोरडी पडतात.
 • मोठी झाडे सावकाश कोरडी पडून मरतात.

व्यवस्‍थापन

 • बीज प्रक्रिया

क्लोरिप्राफोस 10 मिली / क्विंटल बियाणे

 • फवारणी

क्लोरिप्राफोस 0.05 टक्के

 • क्लोरिप्राफोस 0.3 टक्के पाण्यात सोडावे.

देठ कुरतडणारी अळी (अ‍ॅग्रोटीस इपिसलन)

ही किड मुख्यता ज्या भागात सेंद्रीय पदार्थ जास्त आहे अशा शेतात प्रादुर्भाव जास्त दिसतो. ही अळी दिवसा लपून राहते आणि रात्री जमनिलगतची झाडाची देठ किंवा फांद्यांना कुरतडुन वेगळी करते आणि मातीत घेऊन जाऊन खाते. त्यामुळे लहान रोप किंवा फाद्या शेतात पसरलेल्या दिसतात. या फाद्यायाच्या खाली अळी लपुन बसलेली असते.

लक्षण

 • फक्त रात्रीच्या वेळी कार्यक्षम होते.
 • नविन झाडांना जमिनी लगत तोडुन टाकते.
 • जमिनी लगतच्या फांद्यांना कुरतडुन झाडा पासुन वेगळी करते.
 • झांडाच्या खाली माति उकरून बघितल्यास अळ्या दिसुन येतात.

व्यवस्थापन

 • उन्हाळयात खोल नांगरट करून जमिन चांगली तापु देणे.
 • अर्धवट कुजलेले पुर्वीच्या पिकाचे अवशेष होतात बाहेर काढणे.
 • बीजप्रक्रिया

क्लोरपायरीफॉस 1 लिटर/ क्विंटल

 • फवारणी

क्लोरपायरीफॉस 0.05 टक्के

 • क्लोरपायरीफॉस 0.3 टक्के खोडा जवळ मातित सोडणे.

उंट अळी (ऑटोग्राफी निग्रिसिग्ना)

ही सर्व भारततात हरभरा पिकांवर कमी प्रमाणात अढळून येते.

लक्षणे

 • चालताना शरिराचा मधला भाग उंच करून चालते.
 • हि हिरव्या रंगची अळी आहे.
 • झाडाचा जो भाग तिने खाल्लेला असतो तिथेच ती दिसुन येते.
 • पान, फुल, कळी आणि कवळी घाटे खाते.
 • अळी दान्या सगट घाटयाचे कवच पन खाऊन घेते.

व्यवसथापन

 • वनस्पतीजन्य किटकनाशक

कडुनिबाच्या पानाचा रस, निबोळीचे तेल, करंज तेल

 • रासायनिक किटकनाशक

फेनवेलेरेट 0.01 टक्के

क्लोरीरीफॉस 0.05 टक्के

मावा (अपीस क्रॅसीव्हरा)

हा किडा फार कमी प्रदेशात अढळुन येतो.

लक्षणे

 • काही प्रदेशात उशारी पेरणी केल्या नंतर याचा प्रादुर्भाव होतो.
 • ही किड कोवळ्या फांद्या आणि घाटे यांच्यातला अर्क पिवुन घेते त्यामुळे फांद्या सुकतात आणि दाणे लहानच राहतात.

व्यवस्थापन  

 • पेरणीनंतर आणि आधि शेतात स्वच्छता ठेवणे.
 • मित्र किटकांचा उपयोग करने.

कडधान्य भुंगेरे (कॅलोसोब्रुचस चिननेसिस)

हा दाने साठून ठेवण्याच्या वेळेत नुकसान करतो.

लक्षणे

 • देशी हरभरा पेक्षा जास्त काबुली हरभरा वर प्रार्दुभाव करतो.
 • ओले दाने साडुन हेवले तर ही किड जादा लागते.

व्यवस्थापन

 • दाने चांगले उन्हात वाळवून साठवणे.
 • दाने न साठवता त्याची डाळ करून साठवणे
 • बिजप्रक्रिया (दाने साठवन्या आधि)

मोहरी तेल, खोबरे तेल 10 ग्राम / किलो दाने

 

लेखक:

एन. व्ही. लांडे (पीएच.डी. विद्यार्थी)

8802360388

राष्ट्रीय पादप जीनोम अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली

 

एस. एच. टिमके (पीएच.डी. विद्यार्थी)

8459950081

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

डॉ. ए. ए. दसपुते (सहायक प्राध्यापक)

9607705240

कृषि बायोटेक्नॉलॉजी कॉलेज मदडगाव, अहमदनगर

 

डॉ. एस. जी. वाघ (सहायक प्राध्यापक)

9673806666

एस. डी. एम. व्ही. एम. कृषि बायोटेक्नॉलॉजी कॉलेज, औरंगाबाद

 

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters