संग्रामपूर/तालुक्यातील निरोड बाजार येथे शासकीय हमी भाव योजनेअंतर्गत नाफेड मार्फत ग्रामित फार्मर प्रोड्युसर कंपनीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या हस्ते वजन काटा पुजन करुन खरेदिचा शुभारंभ करण्यात आला. भिलखेड येथिल शेतकरी कृष्णराव शिवाजीराव देशमुख यांनी सर्व प्रथम आपला माल खरेदी केंद्रावर मोजणीसाठी आणला असल्याने यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासनाचा हमीभाव मिळावा यासाठी ग्रामीत फार्मर प्रोड्युसर कंपनीने चालु केलेल्या खरेदी केंद्राने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना प्रचंड मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणलेल्या मालासाठी कंपनीने सुसज्ज गोडाऊनची व्यवस्था केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची संरक्षणाची जबाबदारी मिटली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी चालु केलेल्या कंपनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी उद्घाटनप्रसंगी ग्रामीत फार्मर कंपनीचे अध्यक्ष आशिष देशमुख, सरपंच दीपक साबे, कंपनीचे संचालक ऊमेश सौदागर, वैभव देशमुख विश्वासराव देशमुख सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.भिलखेड येथिल शेतकरी कृष्णराव शिवाजीराव देशमुख यांनी सर्व प्रथम आपला माल खरेदी केंद्रावर मोजणीसाठी आणला असल्याने यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासनाचा हमीभाव मिळावा यासाठी ग्रामीत फार्मर प्रोड्युसर कंपनीने चालु केलेल्या खरेदी केंद्राने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना प्रचंड मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय हमी भाव योजनेअंतर्गत नाफेड मार्फत ग्रामित फार्मर प्रोड्युसर कंपनीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या हस्ते वजन काटा पुजन करुन खरेदिचा शुभारंभ करण्यात आला.
Share your comments