शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व एकात्मिक किड नियोजन करून मानवी शरीराला हानिकारक रासायनिक कीडनाशकांचा कमी वापर करून दर्जेदार शेती उत्पादनासाठी इको-पेस्ट ट्रॅप' हा कमी खर्चात अत्यंत प्रभावी कीड व रोग नियंत्रणासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान आहे.इको-पेस्ट ट्रॅप' हा प्रकाश सापळा, चिकट सापळा आणि कामगंध सापळा याचे संयुक्तरित्या काम करते. पिवळ्या आणि निळा रंगाचा चिकट सापळा दिवसा शेतात उडणारे हानिकारक कीटक उदा.पांढरी माशी, तुडतुडे, फळ माशी, फुलकिडे पंखाचा मावा, नागअळी ची माशी व इतर उडणारे बारीक कीटक त्याला आकर्षित होऊन चिटकतात.
तसेच मीज माशी,खोड किडीची माशी, कंदमाशी याचाही यामध्ये समावेश होतो.या सापळ्यात ठराविक प्रकाश तिव्रतेचा व स्वयंचलीत लाईट लावलेला असुन तो अंधार पडल्यावर प्रकाशमान होऊन रात्री संचार करणारे विविध प्रकारचे गळ्याचे पतंग जसे की गुलाबी बोंडआळी पतंग,
हे ही वाचा - कापुस. मका सोयाबीन या पीकांसाठी सुरक्षीतप्रकारे तणनाशकाचा वापर
अमेरिकन बोंडआळी पतंग, टिपक्याची बोंडआळी पतंग , फळ पोखरणाऱ्या अळीचा पतंग, शेंडे पोखरणाऱ्या अळीचा पतंग, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा पतंग उडणारे कीटक हे प्रकाशामुळे आकर्षित होऊन सापल्याला चिटकतात.फायदे बघा - प्रकाश सापळे पिकातील हानिकारक कीटकांना नियंत्रण करण्यात मदत करते.
हंगाम सुरु होण्याआधी प्रकाश सापळ्याचे वापर केल्यास पिक क्षेत्रातील पिकांवर प्रादुर्भाव करू शकणाऱ्या किडींचा अनुमान लावण्यात मदत होते.प्रकाश सापळे मित्र कीटकांना सुरक्षित आहे.प्रकाश सापळे पर्यावरणाला अनुकूल आहे. सापळे जाड प्लास्टिक ने बनले असल्यामुळे टिकाऊ आहेत.प्रकाश सापळ्यांमुळे कमी वेळात हानिकारक कीटकांवर नियंत्रण मिळवता येतो.पिकांमध्ये लावण्याची पद्धती :प्रकाश सापळे पिकाच्या बांधावर लावावेत. उदा. एक प्रकाश सापळा प्रति एकर 4-6 पिकांपासून हे सापळे 1 फुट उंच लावावे.
प्रकाश सापळ्याची उपयोगिता :-नर व मादी हे दोन्ही प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात त्यामुळे त्यांच्या मिलनाला अडथळा निर्माण होऊन येणाऱ्या नवीन पिढीला अटकाव करण्यास मदत होते.प्रकाश सापळ्याची रचना असा प्रकारे केली जाते कि ज्यामुळे मित्रकीटक आकर्षित जरी झाले तरी त्यांना काही हानी पोहचत नाही.प्रकाश सापळे हे बॅटरी वर, सेल वर सुद्धा चालू शकतात.प्रकाश सापळ्याच्या उपयोगाने हानिकारक कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक कीटनाशकांचा वापर कमी होतो.मजूर खर्च , फवारणी खर्च , मास्क ट्रापिंग पैसा वाचतो.
ट्रॅप पाहिजे असल्यास संपर्क साधा
-गोपाल उगले,9503537577
Share your comments