भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर, मध्यप्रदेश या संस्थेने हे नवीन वाण विकसित केले आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या संस्थेने विकसित केलेले हे नवीन वाहन पाण्याचा ताण सहन करण्यास सक्षम आहे शिवाय हवामानाचा बदलाचा देखील कोणताच विपरित परिणाम या जातीच्या सोयाबीन पिकावर (Soybean Crop) होणार नाही.
निश्चितच यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) फायदा मिळणार आहे.Surely this will benefit the farmers who produce soybeans. भारतीय सोयाबीन संशोधन संस्था यांनी NRC 136 सोयाबीनचे नवीन वाण विकसित केले आहे.
मित्रांनो या जातीच्या प्रसाराला मध्यप्रदेश राज्यात मान्यता मिळाली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी देखील या सोयाबीन च्या वाणाचा फायदा होणार आहे. कारण की मराठवाडा कृषि विद्यापीठमध्ये या जातीच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.
या जातीच्या चाचणीचे हे दुसरे वर्ष असून. 3 वर्ष या जातीची चाचणी घेतली जाणार आहे. चाचणीमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आल्यास महाराष्ट्रासाठी या जातीची शिफारस केली जाऊ शकते. भारतीय सोयाबीन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉक्टर ज्ञानेश कुमार सातपुते यांनी याबाबत माहिती दिली. मित्रांनो सध्या मध्य प्रदेश राज्यात या जातीच्या प्रसाराला मान्यता दिली गेली आहे.
आगामी खरीप हंगामात मध्यप्रदेश राज्यात या जातीची शेती शेतकरी बांधवांना करता येणार आहे. भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने तब्बल दहा वर्षे मेहनत घेऊन ही जात विकसित केली आहे. अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीन संस्थेने विकसित केलेल्या या नवीन जातीविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.भारतीय सोयाबीन संस्थेने विकसित केलेल्या एनआरसी 136 जातीची वैशिष्ट्य नेमकी कोणते :- मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही
नवीन जात पाण्याचा ताण सहन करण्यास सक्षम आहे. दाणे भरण्याच्या काळात पावसाचा 20 ते 25 दिवसांचा खंड पडला तरी देखील या नवीन जातीच्या सोयाबीनची समाधानकारक वाढ होऊ शकते.NRC 136 ही सोयाबीनची नवीन जात 102 दिवसांत काढणीसाठी तयार होत असते.या नवीन जातीच्या सोयाबीनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यलो मोझॅक रोग, पाने खाणाऱ्या अळीस मध्यम स्तरीय प्रतिकारक आहे. यामुळे निश्चितच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
याशिवाय ही नवीन जात प्रति हेक्टरी 17 क्विंटल उत्पादन देण्यास सक्षम आहे.ओडिशा, छत्तीसगड, बिहार, झारखंड राज्यात पेरणीसाठी ही जात प्रसारित झाली आहे. आगामी काही वर्षात आपल्या महाराष्ट्रात देखील या जातीचा प्रसार पाहायला मिळू शकतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात या जातीची चाचणी सुरू आहे. सकारात्मक परिणाम आढळून आल्यास महाराष्ट्रात देखील या जातीची लागवड होणार आहे.
Share your comments