काळानुसार शेती व्यवसायामध्ये बदल होत आहे. तर अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामध्ये उत्पादन वाढीसाठी तसेच शेती व्यवसायात प्रगती होण्यासाठी सिंचन व्यवस्था ही सर्वात महत्वाची आहे.
काळाच्या बदलानुसार शेतीपद्धतीमध्ये ही अमूलाग्र बदल होत आहे मात्र सिंचन व्यवस्थेला चांगले च महत्व प्राप्त झाले आहे. सिंचन व्यवस्थेमुळे पीक उत्पादनात वाढ होत आहे तसेच शेतीची प्रगती सुद्धा होत आहे. जरी उत्पादनात वाढ होत असली तरी अजून सुद्धा पूर्णपणे सिंचनव्यवस्था सुधारलेली नाही. पिकांना जर वेळेवर पाणी मिळाले नाही तर पिकांचे नुकसान हे ठरलेले असते. कृषी शास्त्रज्ञानी शेतीला पाणी देण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. हायड्रोजेल हे एक नवीन तंत्रज्ञान आहे जे की एकदा की शेतात टाकले की कोरडवाहू शेतात सुद्धा काही अडचण येत नाही तसेच या तंत्राचा पिकावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
पिकांना वेळोवेळी पाणी देणे खूप गरजेचे आहे कारण जर त्यांना मुबलक प्रमाणात आणि योग्य वेळी पाणी न मिळाल्यास पिकाचे मोठे नुकसान होते. तर याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो.
तर आता पिकांना पाणी देण्याचा एक नवीन आगळावेगळा मार्ग कृषी शास्त्रज्ञांनी काढला आहे. तो म्हणजे हायड्रोजेल.
हायड्रोजेल चे वैशिष्ट्य म्हणजे एकदा तुम्ही शेतात टाकले की तुम्हाला वर्षभर कोरडवाहू हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याच अडचणींचा सामना करावा नाही लागणार.
काय आहे हायड्रोजेल तंत्रज्ञान?
गवारपासून तयार झालेल्या गोंदमध्ये पाणी धरून ठेवण्याची प्रचंड क्षमता असते. त्यामुळे हायड्रोजेल तंत्रामध्ये या गोंद पावडर चा वापर केला गेला आहे. हायड्रोजेल शेतात टाकल्यानंतर १ वर्षापर्यंत राहते. त्यानंतर हळूहळू कालांतराने त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होत जाते. मग ते जमिनीमध्ये मुरते.
पावसाळ्यात पाऊस पडला तर हायड्रोजेलमध्ये वापरण्यात येणारी पावडर शोषून घेते. त्यानंतर पाणी जमिनीमध्ये खाली जात नाही. पाऊस संपल्यानंतर यामध्ये असलेला ओलावा शेत सिंचन करण्यास उपयोगी ठरतो.
त्यातील ओलावा संपला की तो पुन्हा सुकतो. मत त्यानंतर पाऊस पडला कि ओलावा लागतो.
कसा करावा हायड्रोजेल तंत्रज्ञानाचा वापर ?
हायड्रोजेल तंत्र वापरण्यापूर्वी शेताची चांगली नांगरणी करावी लागते. त्यानंतर शेतामध्ये प्रति एकरी प्रमाणे १ ते ४ किलो हायड्रोजेल शेतीक्षेत्रात पसरावे लागते. मग पीक लागवड करण्यास जमीन तयार होते.
बागायती लागवड करतांना वनस्पतींच्या मुळाजवळ हलका खड्डा करून हायड्रोजेल टाकावे. जेणेकरून हायड्रोजेल दुष्काळात पाणी शोषून घेऊन आद्रता सोडण्याच्या पद्धतीवर काम करेल.
याचे बियाणे तुम्हाला ऑनलाइन तसेच दुकानामध्ये देखील मिळते. तर हे तंत्र दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरू शकते.
गवारपासून बनवले जाणारे जे गोंद असते त्या गोंदमध्ये पाणी साचवून ठेवण्याची मोठ्या प्रमाणात क्षमता असते. गोंद पासून जी पावडर तयार केली जाते ती हायड्रोजेल या तंत्रासाठी वापरली जाते. ज्यावेळी तुम्ही हे तंत्र शेतात टाकता त्यानंतर जवळपास एक वर्ष ते शेतात राहते. एक वर्षानंतर मात्र त्याची पाणी साचवून ठेवण्याची क्षमता कमी कमी येते. हळूहळू हायड्रोजेल जमिनीत मुरते मात्र एकदा की पाऊस पडला की हायड्रोजेल मध्ये असणारी जी गोंद पावडर आहे ती पाणी शोषून घेते. नंतर पाऊस संपला की गोंद मध्ये असणारा ओलावा सिंचन करण्यासाठी उपयोगी पडते. त्यामधील ओलावा संपला की ते यंत्र पुन्हा सुकते आणि नंतर पाऊस पडला की नंतर ओलावा तयार होतो.
Share your comments