1. कृषीपीडिया

वेल वर्गीय पिकांचे असे करा व्यवस्थापन तरच मिळेल भरघोस उत्पन्न

वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये फुलांची निर्मिती

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
वेल वर्गीय पिकांचे असे करा व्यवस्थापन तरच मिळेल भरघोस उत्पन्न

वेल वर्गीय पिकांचे असे करा व्यवस्थापन तरच मिळेल भरघोस उत्पन्न

वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये फुलांची निर्मिती आणि अपेक्षित फळधारणेमध्ये येणाऱ्या समस्यांसाठी प्रतिकूल वातावरण,लागवडीची अयोग्य वेळ व जातीची निवड,असंतुलित खतमात्रा,अयोग्य सिंचन व्यवस्थापन, परागीभवनातील समस्या,कीड-रोगांचा प्रादुर्भाव,अतिरिक्त शाकीय वाढ इत्यादी कारणे

आहेत. यासाठी वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या लागवडीचा योग्य हंगाम साधावा व कालावधीनुसार योग्य जातीची निवड करावी. अन्नद्रव्यांची कमतरता किंवा असमतोल;तसेच अयोग्य वेळी वापर केल्यास फुलांची निर्मिती,फळधारणा कमी होते. म्हणून माती परीक्षणानुसार पिकास मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा

योग्य अवस्थेला संतुलित मात्रेत वापर करावा.It should be used in a balanced amount at the right time.पिकवाढीच्या अवस्थेनुसार आवश्यकते प्रमाणे सिंचन करावे. जमीन कायम वाफसा स्थितीत राहील तसेच शेतात अतिरिक्त पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्राधान्याने ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते. परपरागीभवनासाठी मधमाशा, उपयुक्त कीटक मदत करतात. त्यामुळे

भाजीपाला लागवड क्षेत्रात किंवा सभोवती मधमाशीपालन किंवा मधमाशांचे संवर्धन करावे. पीक फुलधारणा अवस्थेत आल्यानंतर कीडनाशकांचा वापर टाळावा.ते शक्य नसल्यास मधमाशा किंवा मित्रकीटक यांना हानिकारक असणारी कीडनाशके वापरण्याचे टाळावे किंवा जैविक कीडनाशके वापरावीत. फळांची काढणी योग्य पक्वतेस करावी,

जेणेकरून नवीन फुलांच्या निर्मितीसाठी व उपलब्ध फुलांच्या योग्य वाढीसाठी मदत मिळेल.लक्षणे व प्रादुर्भावाची पातळी यानुसार वेळीच कीड व रोग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. मादी फुलांचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच फुलगळ, फळगळ रोखण्यासाठी शिफारशीत संजीवकांचा योग्य त्या मात्रेमध्ये वापर करावा.

English Summary: Good income can be obtained only if the vine crops are managed in this way Published on: 12 August 2022, 03:28 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters