राज्यात कांद्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कांद्याचे उत्पन्न वाढीसाठी शेतकरी प्रयत्न करत आहे. उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळी फवारणी आणि खतांचा वापर केला जातो. गावरान कांदा हे पीक १२० ते १४० दिवसात काढणीला येतो. या दिवसात योग्य प्रकारे नियोजन करणे गरजेचे असते. योग्य वेळी खतांची मात्रा दिली तर चांगले उत्पन्न मिळते.
खतांचे नियोजन
कांदा हे सल्फर प्रेमी पीक आहे. चांगले उत्त्पन्न आणि कमी खर्च यासाठी गावरान कांद्याला लागवडीला एकरी खत १४.२८.०० किंवा DAP 1 गोणी देणे आवश्यक आहे.
आंबवणीसाठी 20.20.0.13 दोन गोणी, POLYSULPHATE कॅल्शिअम पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर २५ किलो, WELRICH (HUMIC ACID) १० किलो, A TO Z (MYCORRHIZA), १० किलो देणे गरजेचे आहे.
कांद्यांची खुरपणी झाल्यावर, 10.26.26 दोन गोणी, BRAND स्टिंगमेस्टिरॉल ४ किलो, EXOGEN चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्य २ किलो देणे गरजेचे आहे.
योग्य वेळी आणि उत्तम रित्या खतांचे नियोजन केले तर अधिक उत्पन्न मिळते. गरजेनुसार पाणी देणे आवश्यक आहे.
Share your comments