भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून मानला जातो. या देशात 60% लोक शेती हा व्यवसाय करतात. शेती व्यवसाया सोबतच अलीकडच्या काळात शेतकरी शेती पूरक जोडधंद्याकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळू लागले आहेत. या मध्ये तीन प्रकारचे जोडधंदे केले जातात. कुक्कुटपालन , शेळीपालन, दुधजन्य व्यवसाय, यात दूधजन्य व्यवसायाला मोठया प्रमाणात वाटा आहे. देशातील वाढती लोकसंख्या आणि त्या वाढत्या लोकसंख्यामुळे बेरोजगारपणा वाढत चालला आहे आणि अन्नपुरवठा साखळी कमी पडत चालली आहे. त्यामुळे बेरोजगार असणारे तरुण या व्यवसायाकडे वळाले आहेत. पण दिवसेंदिवस वाढत्या पशुखायच्या दरामूळे हा व्यवसाय पण ठप्प पडण्याच्या मार्गावर चालला आहे. तर यातच काही शेतकऱ्यांना अझोला ची साथ मिळाली आहे.
पशुकडून अपेक्षित असलेले दूध मिळवण्यासाठी त्यांना संतुलित आहार देणे आवश्यक आहे. दूध वाढी साठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हिरवा चारा खाऊ घालणे ही गोष्ट शेतकऱ्यांना साठी आवडती आहे. त्यामुळे अझोला चा वापर पशुखाद्यात मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मोरघास, कडबा, वैरण, घास, पशुखाद्य यांच्या वाढत्या महागाईत अझोला शेतकऱ्यांना किफायतशीर व पौष्टीक आहे. त्यामुळे पशु जास्त प्रमाणात दूध देतात व दुधाची गुणवत्ता वाढते. आणि पशु चे वजन सुद्धा वाढते.
अझोला ही वनस्पती प्रकारामध्ये मोडते. तिचा प्रसार आणि लागवड जास्त प्रमाणात झाली तर ती बहुउपयोगी सिद्ध होते. ही वनस्पती 2 ते 3 सेमी आकाराची असते व ती अतिशय वेगाने वाढते, साधारणपणे दर दोन दिवसांनी दुप्पट वाढण्याची क्षमता आहे.
अझोला मध्ये प्रथिने, आवश्यक एमिनो ऍसिडस, जीवनसत्त्वे वाढ आणि खजिनासाठी कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, तांबे, मॅग्नेशियम यांचा खजिना आहे. याच्यात उच्च प्रथिने आणि अर्धे लीनिन कंटेंट असून सुद्धा जनावरांना ते पुणेपणे पचते. ऍझोला जनावरांना तसाच देऊ शकतो किंवा इतर पशुखाद्यात मिश्रण करून देऊ शकतो. अझोला हा गाय व म्हैस याना दर दिवशी दीड ते दोन किलो द्यावा, शेळी मेंढ्या साठी 300 ते 400 ग्रॅम द्यावा. कोंबडीसाठी 20 ते 30 ग्रॅम द्यावा.
अझोला ही वनस्पती पाण्यात तरंगणाऱ्या निळ्या- हिरव्या शेवाळाच्या प्रमाणात येते. अझोला सावलीत असताना पोपटी आणि मोठा झाल्यावर हिरव्या-करड्या रंगाचा दिसतो. अझोला च्या वाढीसाठी तापमान 25℃ - 28℃ असावे. 50% पूर्ण सूर्यप्रकाश असावा. संबंधित आद्रता 65-80% असावी. पाणीच्या टाकी.
अझोला ही वनस्पती पाण्यात तरंगणाऱ्या निळ्या- हिरव्या शेवाळाच्या प्रमाणात येते. अझोला सावलीत असताना पोपटी आणि मोठा झाल्यावर हिरव्या-करड्या रंगाचा दिसतो. अझोला च्या वाढीसाठी तापमान 25℃ - 28℃ असावे. 50% पूर्ण सूर्यप्रकाश असावा. संबंधित आद्रता 65-80% असावी. पाणीच्या टाकीमधील पाणी 5-12 cm असावे. PH 4-7.5 असावा. अझोलाच्या वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खजिनयुक्त असल्याने ते इतर पिकासाठी, झाडांसाठी वापरता येते. व वाफ्यातून काढण्यात येणाऱ्या एक किलो मातीचे गुणधर्म हे सुमारे 0.5 रासायनिक खता इतके असते.अझोला लागवड ही अगदी सोप्या आणि किफायतशीर तंत्रज्ञानमधून होते आणि यासाठी अल्पसा खर्च लागतो. आणि हे जनावरांना देणे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना परंत घेऊन जाणे काळाची गरज आहे म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना परंत ही बातमी घेऊन जा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अझोला चा वापर करायला सांगा आणि देशातील शेतकऱ्यांना प्रगती करण्यात हातभार लावा.
Share your comments