1. कृषीपीडिया

गौमुत्र:उत्तम वाढवर्धक व बुरशीनाशक पिकांसाठी संजीवनी

प्राण्यांचे आणि शेतकऱ्याचे खुप जवळचे नातं आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
गौमुत्र:उत्तम वाढवर्धक व बुरशीनाशक पिकांसाठी संजीवनी

गौमुत्र:उत्तम वाढवर्धक व बुरशीनाशक पिकांसाठी संजीवनी

प्राण्यांचे आणि शेतकऱ्याचे खुप जवळचे नातं आहे. गाय, बैल,म्हैस,शेळी,मेंढी,श्वान आशा नाना प्रकारच्या प्राण्यांनी शेतकऱ्याचे जीवन गजबजलेलं असतं. शेतकरी आणि गाय ह्या समिकरणाची सुरुवात सिंधू घाटी संस्कृतीचाही पूर्वी झालेले आढळते. गाय आपल्याला शेण,गौमुत्र व दुग्ध हे तीन प्राथमिक घटक उपलब्ध करते.ह्या तिघांचा ही वापर आपण शेती अथवा आरोग्यासाठी करतो.देशी गाईंचा गौमुत्रामध्ये सायटोकायनीन सदृश संप्रेरकांची उपलब्धता आहे असे ऐका पुस्तकामध्ये नमूद केले आहे. ज्यावेळी आपण सुष्मदर्शिकेमधून गौमूत्राच्या एखादा नमुन्याचे निरीक्षण करतो त्यावेळी

त्यामध्ये बरेच जिवाणू आढळतात. हे जिवाणू आपण जीवामृत तयार करण्यासाठी वापरतो. हेच जिवाणू बुरशीनाशक म्हणून खुप चांगले काम करते. गौमूत्राचा वापर आपण वाढवर्धक स्वरूपात करत असतो.त्यासाठी पंधरा लिटरच्या पंपास २५०मिली गौमुत्र वापरतो. म्हणजे प्रति लिटर आपण १७ मिली गौमुत्र वापरतो. तेवढे पुरेसे आहे. पण ह्या पद्धती मध्ये वापर करत असताना त्यामध्ये बुरशीनाशक सारखे कार्य केले जात नाही. कारण १७मिली प्रति लिटर ह्या प्रमाणात जिवाणूंची संख्या खुप कमी असते. त्याचा बुरशीनाशक सारखा वापर होऊ शकत नाही. आणि जर गौमुत्राचे प्रमाण वाढवले १७मिली चा ऐवजी ५०मिली किंवा त्यामध्ये

वृद्धी केली तर गौमुत्रामध्ये असलेला सायटोकायनीन सदृश्य पदार्थ हा अपायकारक ठरतो.आपल्या कडे एक म्हण आहे अति तिथे माती.त्याच प्रमाणे सायटोकायनीनचे प्रमाण जास्त झाल्यास ते अपायकारक ठरते. ह्या दोन्ही प्रश्नांवर एक सुवर्णमध्य काढणे आवश्यक होते. गौमूत्राचा वापर हा वाढवर्धक व बुरशीनाशक अश्या दोन्ही पध्दतीने करता यावा.Cow urine can be used both as a growth enhancer and fungicide.त्यासाठी आम्ही काही महिन्यांपूर्वी एक प्रयोग केला. त्यामध्ये आम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये ३.४ लिटर(१७मिली प्रति लिटर ह्याप्रमाणे) गौमुत्र वापरले व त्यामध्ये १किलो गुळ व पाव किलो बेसनचा वापर जिवाणूंचे खाद्य म्हणून केले. हे द्रावण ३ दिवस अंबावण्यासाठी ठेवले(हा काळ ऋतू नुसार बदलतो.

उन्हाळ्यात जिवाणू ४-५ दिवसात तयार होतात,पावसाळ्यात ३-४ दिवसात द्रावण तयार होते व हिवाळ्यात ६-७ दिवसांमध्ये द्रावण तयार होते.). द्रावण तयार झाल्यावर आम्ही त्याची केळी पिकावर वर फवारणी केली.केळी वर करपा रोगाचा प्रादुर्भाव आम्हाला नियंत्रणात आणता आला व नवीन तयार होणाऱ्या पानांची रुंदीही तुलनेने वाढलेली जाणवली.त्यामागचे शास्त्र सांगायचे झाल्यास. ज्यावेळी आपण गौमुत्र ३.४ लिटर २००लिटर पाण्यासाठी घेतो त्यावेळी त्यामध्ये असलेली सायटोकायनीनची मात्रा ही मर्यादित असते. त्यामध्ये कोणतीही घट किंवा वृद्धी होऊ शकत नाही.अपेक्षित सायटोकायनीनचा मात्रेमुळे हे द्रावण वाढवर्धक म्हणून काम करणार हे निश्चित आहे,फक्त त्यामध्ये बुरशीनाशकाचे गुण उतरवावे लागतील.

English Summary: Gaumutra: Excellent growth enhancer and fungicide for crops Published on: 20 July 2022, 06:05 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters