1. कृषीपीडिया

लसुणच्या लागवडीत महाराष्ट्राचा जलवा! लसुण पिकातून शेतकरी करू शकतात बक्कळ कमाई

महाराष्ट्र केळी उत्पादनात आपलं मोलाचे स्थान ठेवतो, कांदा उत्पादनात (Onion Production)अग्रस्थानी आहे अहो एवढेच नाही आता लसुणच्या बाबतीत पण महाराष्ट्र मागे राहिलेला नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लसूणची लागवड (Garlic Farming) केली जातं आहे. आपल्याकडे सफेद जामनगर जातीबरोबरच गोदावरी आणि श्रेता जातींची लसूणची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
garlic crop

garlic crop

महाराष्ट्र केळी उत्पादनात आपलं मोलाचे स्थान ठेवतो, कांदा उत्पादनात (Onion Production)अग्रस्थानी आहे अहो एवढेच नाही आता लसुणच्या बाबतीत पण महाराष्ट्र मागे राहिलेला नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लसूणची लागवड (Garlic Farming) केली जातं आहे. आपल्याकडे सफेद जामनगर जातीबरोबरच गोदावरी आणि श्रेता जातींची लसूणची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

 वास्तविक, लसूण शेतीसाठी, जास्त गरम हवामान किंवा जास्त थंड हवामान मानवत नाही. म्हणुन अशा परिस्थितीत येणारा महिना म्हणजे ऑक्टोबरचा महिना लसुणच्या लागवडीसाठी योग्य मानला जातो. या कालावधीत लसणाची कंद निर्मिती चांगली होते. लोममाती (वाळू, गाळ आणि थोड्या प्रमाणात चिकनमाती याचे मिळून बनलेली) असलेल्या जमीनीत लसूणची लागवड केली तर उत्पादन अधिक होते. लसूणचा वापर चटणी, भाज्या आणि लोणच्यामध्ये केला जातो. लसनामध्ये प्रोपिल डिसल्फाइड आणि लिपिड्स असतात. पोटाचे आजार, अपचन, कानदुखी, डोळ्यांचे विकार, डांग्या खोकला इत्यादींवर उपचार करणारे गुणधर्म लसूणमध्ये आहेत असं सांगितले जाते. ह्या औषधी गुणांमुळे आणि जेवणाचा एक अविभाज्य भाग असल्यामुळे लसूणची मागणी ही बाजारात कधीच कमी होत नाही ह्यामुळे शेतकरी बांधव (Farmer) लसूण लागवडीतून नक्कीच चांगले उत्पन्न घेऊ शकतात.

लहसून लागवडीसाठी जमीन आणि हवामान कसं हवं बरं

महाराष्ट्र कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार समशीतोष्ण हवामान लसुणाच्या लागवडीसाठी (Garlic Cultivation)अनुकूल आहे. तथापि, खूप गरम आणि खूप थंड हवामान या पिकासाठी अनुकूल नाही.  समुद्र सपाटीपासून 1000 ते 1300 मीटर उंचीवर लसणाची लागवड करता येते. 75 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास पिकांची वाढ चांगली होत नाही. म्हणुन यासाठी ऑक्टोबर महिन्यात लसूण लागवडीचा (Garlic Farming) सल्ला दिला जातो, आणि ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेल्या लसूनचे उत्पादन हे देखील जास्त असते. लोममाती(वाळू, गाळ आणि थोड्या प्रमाणात चिकनमाती याचे मिळून बनलेली) असलेल्या मध्यम खोल असलेल्या जमिनीत हे पिक घ्यावे असा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात, आणि लोममाती असलेल्या जमिनीत जैविक खत टाकावे. हलकी माती, पूर्णतः चिकण माती असलेली जमीन लसुणच्या लागवडीसाठी योग्य नाही.

 

लहसूनच्या जाती नेमक्या कोणत्या-कोणत्या?

कुठलेही पिकाची लागवड करण्याआधी सर्वप्रथम विचार करण्याची गोष्ट म्हणजे त्या पिकाची वाण चला तर मग जाणुन घेऊया लसुणच्या वाणी (Garlic Species):-

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोरड्या हंगामात लसणाची लागवड 10 × 7.5 सेंमी. पाकळ्या किंवा काड्या काढल्या जातात आणि मातीने झाकल्या जातात. सफेद जामनगर, गोदावरी आणि श्रेता ह्या जाती खुपच लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात सुमारे 5000 हेक्टर जमीन लसुणच्या लागवडीखाली आहे. लसूणची लागवड ही मुख्यता नाशिक, पुणे, ठाणे, मराठवाडा आणि विदर्भात केली जाते.

 

 लसुणच्या पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसं असायला हवं बरं? (Water Management For Garlic Cultivation)

लागवडीनंतर पहिल्यांदा पाणी हळूहळू दिले पाहिजे. पाण्याची दुसरी पाळी त्यानतर 3-4 दिवसांनी आणि त्यापुढील पाणी 8 ते 12 दिवसांनी हंगामानुसार द्या. कापणीच्या दोन दिवस आधी पाणी द्या, यानंतर पाणी देऊ नये. यामुळे लसूनचे गाठ काढायला सोपे जाते आणि गांठा फुटून पाकळ्या पाकळ्या नाही होत.

English Summary: garlic cultivation growth in maharashtra Published on: 23 September 2021, 09:30 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters