बुरशी म्हटलं म्हणजे पिकांची नासाडीचं चित्र आपल्या समोर येत असतं. परंतु काही बुरशी या आपल्या फायद्याच्या असतात. आपल्या मातीत बुरशीच्या अनेक प्रजाती आढळतात, यात दोन प्रकारच्या बुरशी असतात. त्यात एक म्हणजे (शत्रू बुरशी) ही हानिकारक असते तर काही प्रजाती फायद्याच्या (मित्र बुरशी) देखील असतात, जसे की ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा हा सूक्ष्म-कामगार आहे जो रोपांच्या मूळा जवळील भागात (राइजोस्फियर)मध्ये काम करतो. ही बुरशी बहुतेकवेळा सेंद्रिय अवशेषांवर आढळते. म्हणूनच,जमिनीत बुरशीचे माध्यमातून होणाऱ्या अनेक प्रकारच्या पिकाच्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी हे एक महत्त्वपूर्ण बुरशी आहे.
हे मातीत वाढते व तेथेच जगते आणि मुळा जवळील भागात राहुन रोपाचे संरक्षण करते.
ट्रायकोडर्माच्या जवळपास ६ प्रजाती ज्ञात आहेत. परंतु केवळ दोन ट्रायकोडर्मा विरिडि आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम मातीत मुबलक प्रमाणात आढळतात. हे शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आणि उपयुक्त आहे. हे एक जैव बुरशीनाशक आहे आणि विविध प्रकारचे बुरशीजन्य रोग टाळण्यास मदत करते. हे रासायनिक बुरशीनाशकांवरील अवलंबून कमी करते. हे प्रामुख्याने रोगजनक जीवांच्या प्रतिबंधासाठी वापरले जाते. त्याचा वापर नैसर्गिकरित्या सुरक्षित मानला जातो कारण त्याचा वापर केल्याने निसर्गात कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
ट्रायकोडर्मा उत्पादन पद्धत
•गावकरी, ट्रायकोडर्मा उत्पादनासाठी घरगुती पद्धतीने गाईचे शेण किवा गोवरी वापरु शकतात.
शेतातील एखाद्या सावलिच्या ठिकाणी शेण खताला बारिक-बारिक केले जाते. त्यात २८ किलो किंवा सुमारे ८५ वाळलेल्या गोवरी असतात. यामध्ये पाणी टाकुन हाताने चांगले मिसळले जाते जेणेकरून गोवरीचा ढीग जाड तपकिरी दिसेल. त्यानंतर, या ढीगात सुमारे ६० ग्रम उच्च कोटीचा ट्रायकोडर्मा शुद्ध कल्चर (विकत आनावा) मिसळवावे. जुन्या पोत्याने हे ढीग चांगले झाकून घ्यावे आणि नंतर पोत्याला वर-वरून पाण्याने भिजवावे. वेळा-वेळाने पोत्यावर पाण्याची फवारणी केल्यास योग्य तसा ओलावा कायम राहते.
•१२ ते १६ दिवसांनंतर, त्या ढिगास फावड्याने चांगले मिक्स करावे आणि पुन्हा पोत्याने झाकून टाकावे.
मग वेळोवेळी पाण्याची फवारणी केली जाते. सुमारे १८ ते २० दिवसांनंतर हिरव्या बुरशीचे वाढ झाल्याचे दिसू लागते. सुमारे २८ ते ३० दिवसांत ढिग पूर्णपणे हिरवेगार दिसू लागते. आता याला मातीच्या उपचारासाठी वापरता येऊ शकते.
•अशाप्रकारे आपण आपल्या घरी साधे, स्वस्त आणि उच्च प्रतीचे ट्रायकोडर्मा तयार करू शकता. नवीन ढिगाच्या पूर्व तयारीसाठी आपण आधीपासूनच तयार केलेल्या ट्रायकोडर्माचा काही भाग वाचवू शकता आणि अशा प्रकारे पुन्हा पुन्हा बाहेरून कल्चर घ्यावी लागणार नाही.
Share your comments