1. कृषीपीडिया

फुले संगमचे(केडीएस ७२६) उन्हाळी नियोजन(पहिल्या महिना)

सोयाबीन हे मराठी भूमीवरील महत्त्वाचे नगदी पीक आहे.विदर्भ, मराठवाड्याचे अर्थकारण चालवायची मदार ह्याच पिकावर आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
फुले संगमचे(केडीएस ७२६) उन्हाळी नियोजन(पहिल्या महिना)

फुले संगमचे(केडीएस ७२६) उन्हाळी नियोजन(पहिल्या महिना)

सोयाबीन हे मराठी भूमीवरील महत्त्वाचे नगदी पीक आहे.विदर्भ, मराठवाड्याचे अर्थकारण चालवायची मदार ह्याच पिकावर आहे. सोयाबीन पिकाने इकडे शंभरी पार केली आणि इकडे शेतकऱ्यांना हायसे वाटू लागले. वर्षानुवर्षे थकत गेलेली कर्ज फिटतील, फाटलेल्या संसाराला ठिगळ लावता येईल अशी आशा मनात ठेवून बळीराजा वाट पहात होता. भाव पडला आणि सगळी खेळी शेतकऱ्यांचा लक्षात आली. शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आणि एका रात्रीत पलीकडचा मिशावरचा ताव कमी झाला. आता परिस्थिती बद्दलली होती. आम्हास जो भाव हवा त्याच भावात आमचा मालाची विक्री होणार.सरकारनेही शेतकऱ्यांना धमकवायचा प्रयत्न केला पण सगळे प्रयत्न शेतकऱ्यांनी हणून पाडले. आज आपण नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. नवीन वर्ष म्हणातले की उन्हाळी सोयाबीनचा हंगाम. सोयाबीन पिकाचे दोन हंगाम असतात. एक पावसाळी दुसरा उन्हाळी.ह्या वर्षी बिजोत्पादनाचा माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना बियाणे देने शक्य झाले. आम्ही केडीएस ७२६ फुले संगम ह्या वाणाचे बिजोत्पादन हाती घेतले. हा वाण निवडण्याचा एक कारण असे की प्रत्येक पिकामध्ये काही चांगले वाण असतात जसे ऊसा मध्ये को ८६०३२,तुरी मध्ये बीडीएन ७११. हे वाण शाश्वत आहेत. 

आपण थोडे कष्ट केल्यास त्याचे चांगले उत्पादन हाती लागते. ११० दिवसांचा हा वाण उन्हाळ्यात आम्हास १३क्विंटल पर्यंतचा उतारा देतो आणि खरीप मध्ये जवळपास १६क्विंटल पर्यंतचा उतारा मिळतो. आमचा जिल्ह्यात काही शेतकरी ह्याच वाणाचा जोरावर २०क्विंटलचे उच्च उत्पादन घेतात. फुले संगमची रोपं जवळपास कंबरे एवढे उंच वाढते. त्याला फुटवा ही चांगला असतो. ऐका झाडाचे घेर जवळपास १.५ फुटांचा असतो. त्यामुळे दोन ओळीतील अंतर १.५फूट आणि दोन झाडांमधील अंतर ९इंच असावे. ह्या वाणाची पेरणी करणे शक्यतो टाळावी कारण पेरणीस बियाणे जवळ पडते आणि ऐका झाडाचा घेरा मध्ये दोन ते तीन झाडं येतात. त्यामुळे उत्पादन घटण्यास सुरुवात होते. जेवढे दोन झाडांमधील अंतर आपण जास्त ठेऊ तेवढे उत्पादन हाती लागते. ऐका झाडाला कमीतकमी ३००-४००शेंगा लागण्याची क्षमता ह्या वाणामध्ये आहे. जर दोन झाडांमधील अंतर कमी राहिले तर शेंगांची संख्या आणि दाणे भरण्यावर विपरीत परीणाम दिसून येतो. दोन ओळीतील अंतर १.५फूट आणि दोन टोकणीतील अंतर ९इंच ते १८इंच ठेवावे. सुरवातीस आपल्याला शेतात सोयाबीन पातळ दिसेल पण महिन्याभरात पूर्ण क्षेत्र गर्द हिरव्या पर्णाचा सागरात डूबुन जाईल. सरी सोडतेवेळेस ४फुटी सरी सोडावी जेणेकरून बोद १.५फुटांचा होईल आणि बोदाचा बगलेला टोकन करता येईल. जर ट्रेकटरचा साह्याने पेरणी करण्याचा नियोजन असेल तर पेरणी यंत्रास तुरीचे किंवा मक्याचे चक्र बसवावे जेणेकरून दोन टोकणीमध्ये ९इंचाचे अंतर पडेल. 

                   सोयाबीन पिकाची लागवड करण्या आधी आपण बीज प्रक्रियेचे नियोजन करणे आवश्यक आहे. सोयाबीनचा बियाण्याला बुरशींपासून धोका आहे. त्यावर सहसा कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे बीजप्रक्रिये साठी गौचो(इमिडा क्लोप्रिड) किंवा इतर कीटकनाशकांचा वापर करणे अयोग्य ठरते. थायरम सारख्या बुरशीनाशकांचा वापर बीजप्रक्रियेसाठी आपण करू शकतो. 

सोयाबीन पिकासाठी फक्त तीन खतांची गरज पडते

सिंगल सुपर फॉस्फेट-४पोती

म्युरेट ऑफ पोटॅश(पांढर पोटॅश)-१पोत

गंधक-१०किलो

सुष्मअन्नद्रव्य(फवारणी)

                    ह्याचा व्यतिरिक्त इतर कोणत्याही मिश्र खते किंवा विद्राव्य खतांची गरज पडत नाही. खतांचा वापर करतेवेळेस खते मोकळ्या रानात विस्कटून मशागत करू नये. कारण ह्या खतांचा जास्तीतजास्त वापर पिकाला होणे गरजेचे आहे. जर पेरणी पूर्वी ह्या खतांचा वापर आपण जमिनीत केला तर मातीत मिसळल्यावर ह्या खतांचा वापर तनांसाठी होऊ शकतो. खते फक्त पिका पुरते मर्यादित रहावे ह्यासाठी बियाण्याची उगवण झाल्यानंतर खतांचा वापर करावा.सोयाबीनचा इवल्याशा रोपांनी आपले डोके वर काढल्यास दोन ओळीचा मध्ये ह्या खतांना आपण टाकू शकतो आणि वरून कोळपणी करून घेऊ शकतो अथवा दोन ओळीचा मधून मोगण्याने ह्या खतांची पेरणी करावी.जेणेकरून ही खते मातीआड होतील. पेरणी नंतर दहा दिवसांच्या अंतराने रायझोबियम ह्या जिवाणूंची किनवन प्रक्रिये नंतर त्यांची आळवणी करावी. रायझोबियम जिवाणू मुळे सोयाबीनचा वाढीचा अवस्थेत नत्राचा पुरवठा चांगला राहतो आणि त्याची नैसर्गिक वाढ चांगली राहते. रायझोबियम जिवाणूंचे पाकीट आपणास बियाणे सोबत मिळाले आहे. आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये एक पाकीट रायझोबियम दोन किलो गुळ अर्धा किलो बेसन मिसळून त्याला तीन दिवस ठेवावे. तीन दिवसानंतर तयार द्रावण शिवारात पाटपाणी,स्प्रिंकलर,ठिबकने सोडून द्यावे अथवा पंपाने आळवणी करावी.

 कीड आणि रोग नियंत्रणासाठी फक्त तीन औषधांची गरज भासते. 

निंबोळी तेल किंवा अर्क

इमामेकटिन बेंझोइट

क्लोरोपायरीफोस २०%

                         पेरणीनंतर कीड रोग व्यवस्थापनासाठी पहिली कृती दहाव्या दिवशी करावी. दहाव्या दिवशी छोट्या पानांवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. 

त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी निंबोळी अर्काची फवारणी करावी.दर्जेदार निंबोळी तेलाची उपलब्धता ही खूप अवघड गोष्ट आहे. त्यासाठी आपण निंबोळी अर्काची निर्मिती घरचा घरी करू शकतो. दोन किलो निंबोळीचा पाला स्वच्छ करून दहा लिटर पाण्यामध्ये घालावा. हे द्रावण उकळी येऊ पर्यंत गरम करावे. उकळी आल्यास हे द्रावण प्रति पंप अर्धा लिटर घेऊन फवारणी करावी. ही फवारणी झाल्यास पिकाची पाने कडवट होतील आणि त्यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होईल.निंबोळी अर्काचा फवारणी व्यतिरिक्त शेतात पिवळे निळे सापळे लावावेत जेणेकरून रसशोषक किडीवर नियंत्रण मिळवणे आणखीन सोपे जाईल.रसशोषक किडींवर नियंत्रण मिळाल्यास येलो मोझाक व्हायरस आणि कुकुम्बर मोझाक व्हायरस ह्या रोगांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. विसाव्या किंवा एकविसाव्या दिवशी खोड किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी इमामेकटिन बेंझोइट ह्या कीटकनाशकाचा वापर करावा. जर शक्य झाल्यास सुष्मअन्नद्रव्यची फवारणी करावी. सिव्हिड,अमिनो ऍसिड किंवा इतर कोणत्याही टॉनिकची फवारणी करणे टाळावे. केडीएस ७२६ फुले संगम ही जात उंच वाढणारी आहे.त्यामुळे त्याची उंची मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे. उंची जास्त असली तरीही फुटवाही जास्त असतो. त्यामुळे त्याचा फुटवा वाढण्यावर आपण लक्ष दिले पाहिजे.

                    हे झाले प्रथम तीस दिवसांचे नियोजन. वेळोवेळी भांगलन किंवा कोळपणी गरजेनुसार करावे. ह्या वाणाचे उत्पादन चांगले मिळते. तांबिर्याचा प्रादुर्भाव होत नाही. जेवढे काम कराल तेवढे उत्पादन हाती येते. पुढील तीस दिवसांचे नियोजन काही दिवसात लिहतो.

 

विवेक पाटील,सांगली

०९३२५८९३३१९

English Summary: Fule saangam variety summer management frist month Published on: 08 January 2022, 09:41 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters