भारतात भाताचा समावेश हा आहरात जवळपास सर्वत्रच केला जातो. विशेषतः दक्षिण भारतात ह्याचा वापर खुप मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणुन भारतात भाताची मागणी ही वर्षभर कायम असते. भारतात ह्या हंगामात खरीप पिकांची पेरणी, लागवड केली जाते; खरीप पिकात, भातशेती, मका आणि सोयाबीनचे पिके महत्वाची आहेत. प्रामुख्याने आपण जर भातशेतीचा फक्त विचार केला तर उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत जवळपास संपूर्ण भारतात ह्याची लागवड केली जाते.
खरीप हंगामातील भातशेती ही महत्वाची मानली जाते. महाराष्ट्रात भातशेती प्रामुख्याने कोकणात केली जाते आणि थोड्याबहू प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात केली जाते. भात लागवड हा भारतातील वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या वेळी केली जाते, त्यामुळे साहजिकच ह्या सर्व प्रांतात भातपिकाचा विकास हा भिन्न भिन्न झालेला असणार आहे. जिथे भातपिकाला कणसे निघायला लागली आहेत, ह्या स्टेज मध्ये पिकाला पोषणासाठी मोठ्या प्रमाणात पोषकतत्वाची गरज भासते. ह्या स्टेज मध्ये शेतकऱ्यांनी कृषी वैज्ञानीकांचा जर सल्ला घेतला तर त्यांचे उत्पादन हे नक्कीच चांगले होईल आणि शेतकरी बक्कळ कमाई करू शकतात.
बळीराजांनो केव्हा करणार भातपिकात युरियाचा वापर
जेथे भाताचे पीक शिगेला पोहोचले आहे म्हणजेच जेथे पिक हे कणसे काढत आहेत तेथे शेतकरी नायट्रोजनचा दुसरा डोस मारू शकतात, यामुळे भात कणसाची स्थिती सुधारेल. भात पिकातील कीड किंवा तण असेल तर या दोन्ही गोष्टींचे नियंत्रण केल्यानंतरच शेतकऱ्यांना हेक्टरी 40 किलो युरिया फवारणी करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक द्वारा देण्यात आला आहे.
कृषी वैज्ञानीकांनी पिकाच्या सुरुवातीच्या गाभोट अवस्थेत मध्यम आणि पसात येणाऱ्या भात पिकाला लावून जर 60-75 दिवस झालेत तर नायट्रोजनचा तिसरा डोस मारावा असा सल्ला दिला आहे. फुलांच्या अवस्थेत शिफारस केलेल्या 25% पोटॅशची फवारणी केल्यास भाताच्या कनीस चांगले विकसित होते आणि भाताचे वजन देखील वाढते.
भातपिकात जर किंडिंचा प्रकोप वाढला तर करा ह्या पद्धतीने नियंत्रित
सध्या, जेव्हा पिवळ्या स्टेम बोरर कीटकांचे प्रौढ भात पिकावर दिसतात, तेव्हा स्टेम बोररच्या अंड्याचे क्लस्टर गोळा करून नष्ट करावे तसेच कोरडी पाने बाहेर काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्टेम बोररचे पतंग प्रति चौरस मीटर एक पतंग असल्यास, शेतकऱ्यांना एक लिटर प्रति लिटर दराने Fipronil 5 SC फवारण्याचा सल्ला देण्यात आली आहे.
Share your comments