निसर्ग मध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असतात. त्यातील बऱ्याचशा पिकांना हानीकारक असतात तर काही बुरशी पिकांचे इतर रोगांपासून संरक्षण करतात. अशीच एक उपयुक्त बुरशी म्हणजे ट्रायकोडर्मा. या लेखात आपण ट्रायकोडर्मा बुरशी विषयी माहिती घेऊ.
ट्रायकोडर्मा एक जैविक बुरशीनाशक
ट्रायकोडर्माची कार्यपद्धती
- ट्रायकोडर्मा ही बुरशींच्या धाग्यांना विळखा घालून त्यातील पोषकद्रव्ये शोषून घेते. परिणामी रोगकारक बुरशी मध्ये कार्बन नायट्रोजन व जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. परिणामी त्यांची वाढ खुंटते.
- ट्रायकोडर्मा बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थ कुजवण्याकरता सुद्धा उपयोगी ठरते.
ट्रायकोडर्मा वापरण्याची पद्धत
- ट्रायकोडर्मा ही बीजप्रक्रिया, माती प्रक्रिया, झाडांच्या बुंध्याभोवती द्रावणाचा आळवणी तसेच पिकांवर फवारणी आणि सेंद्रिय खत निर्मिती करिता उपयोग होतो
- बीजप्रक्रिया- चार ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाण्यासाठी वापरावे. यासाठी बियाणे स्वच्छ फरशी, प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर चार ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळावे. बियाणे ओलसर होईल इतपत पाणी शिंपडून संवर्धन हलक्या हाताने बियाणास चोळावे. प्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून त्वरित पेरणी करावी.
- महत्वाचे म्हणजे ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक बुरशीनाशकांचा सोबत करू नये.
ट्रायकोडर्मा चे फायदे
- ट्रायकोडर्मा ने बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवण शक्तीत वाढ होते
- रोगकारक बुरशीचा नाश होऊन पिकांच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत संरक्षण मिळते.
- जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजविण्याच्या साठी मदत होते. परिणामी जमिनीचा पोत सुधारतो.
- ट्रायकोडर्मा ही बुरशी नैसर्गिक घटक असून, पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही. रासायनिक बुरशीनाशकांचा प्रमाणे माती, पाणी व पक्षी यांच्या आरोग्यास धोका पोहोचत नाही. ही बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थावर वाढत असल्यामुळे रासायनिक बुरशीनाशके पेक्षा जास्त काळप्रभाव टिकून राहतो. पिकांचे संरक्षण चांगल्या प्रकारे होते.
Share your comments