1. कृषीपीडिया

पिक उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीचे खत आणि सेंद्रिय उपाय

हिरवळीची खते सेंद्रिय पदार्थ तसेच पिकांच्या अन्नद्रव्यांचा जमिनीतील साठा वाढावा यासाठी हिरवे पिक जमिनीत गाडण्याची प्रक्रिया पार पाडली जाते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पिक उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीचे खत आणि सेंद्रिय उपाय

पिक उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीचे खत आणि सेंद्रिय उपाय

सेंद्रिय पध्दतीने शेती करण्यात हिरवळीच्या खतांचे प्रयोग :-

हिरवळीची खते सेंद्रिय पदार्थ तसेच पिकांच्या अन्नद्रव्यांचा जमिनीतील साठा वाढावा यासाठी हिरवे पिक जमिनीत गाडण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. अशा प्रक्रियेतून तयार झालेल्या खतांना हिरवळीचे खत वा बिवड म्हणतात.

पावसाळ्यातील पहिल्या पावसात हिरवळीच्या खताचे बी पेरले जाते, व तयार झालेले पिक जमिनीत गाडले जाते. बरयाचदा करंज, भेंड, अंजन व ग्लीरीसिदिया या वनस्पतीची पानेही जमिनीत गाडली जातात.

हिरवळीचे खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पिके/वनस्पती व त्यातील नत्राचे प्रमाण : पिकाचे नाव नत्राचे शेकडा प्रमाण ताग (भोरू) ०.४६ चवळी ०.४२ गवार ०.४९ सुर्यफुल ०.४५ हरभरा ०.५० सोयाबीन ०.७१ उडीद ०.४७ मटकी ०.३५ लसून घास ०.७३ करंज २.६१ अंजन १.४२ ऐन २.०४ भेंड २.९० गिरिपुष्प २.७४

हिरवळीचे खत तयार करताना घ्यावयाची काळजी :

पिक लवकर भरपूर वाढणारे असावे. पिक रसरशीत व तंतूचे असावे ज्यायोग्य ते लवकर कुजते. पिक कोणत्याही जमिनीत वाढणारे व शक्यतो शेंगाकुलीतील असावे. पिकामुळे जमिनीवर वाईट परिणाम होऊ नये. पिक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी ते जमिनीत गाडावे. पिकला सिंचनाची सुविधा असावी, म्हणजे पिक साधण्यास मदत होते.

हिरवळीचे खते:

हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती ,झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरुन आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरुन वाढलेली पिके फुलो-यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांपासून तयार झालेल्या खतास "हिरवळीचे खत "असे म्हणतात.

हिरवळीच्या खताचे फायदे :-

• ही खते जवळजवळ प्रति हेक्टरी ५० -१७५ किलो नत्राचे योगदान करते .

• फार मोठ्या प्रमाणात जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवते

• मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवणयाची क्षमता वाढवते .

• मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवते

• मातीच्या भौतिक रासायनिक व जैविक पोतावर किंवा वातावरणात कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.

• सर्वसाधारपणे शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले १ टन हिरवळीचे खत २.८ ते ३ .० टन शेणखताच्या बरोबर असते .

या खतांच्या आच्छादनाने जमिनीची धुप होत नाही .

हिरवळीच्या खतांचे प्रकार -

हिरवळीच्या खतांचे दोन प्रकार आहेत .

१) शेतात लगवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते :- जेव्हा हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग ,मिश्न किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलो-यावर येण्यापूर्वी शेतात नागंरून मिसळतात ,तेव्हा त्याला शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात .या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग, गवार ,चवळी ,धैचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी ,लसुरघास ,बरसीम या पिकांचा समावेश असतो.

२) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत :- पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लगवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळणे होय .हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प , शेवरी ,करंज ,सुबाभुळ ,टाकळा,कर्णिया,ऎन ,किंजळ यांची झाडे व झुडपे पडीक जमिनीत वाढ्वून त्यांच्या हिरव्या पानाण्चा व कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात .

हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती -

१) निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलो-यावर आलेले असावे .ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलो-यावर येतात .ही पिके ज्या शेतात घेतली असतील त्याचे खत तयार करावे .या हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणतात ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत .ट्रायकोडरमा चा उपयोग केल्यास ह्या खताची प्रत वाढविता येईल .

२) नुकत्याच फूलो-यात आलेले हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी . कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नागंराने तास घेउन नागंराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे .नंतर नागंराच्या दुस-या तासाच्या वेळी अन्यथा धानाच्या चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी .हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरुन फळी किंवा मैद फिरवावा .त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणॆ झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरु हाते.

३) हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करुन आँगस्टमध्ये गाडणी

हिरवळीच्या खतांचे जमिनीमध्ये तसेच पिकांवरती होणारे परिणाम:

हिरवळीच्या खतांमध्ये ह्युमस नावाचे सेंद्रिय द्रव्य असते, त्यामुळे मातीला काळा रंग येतो. 

हिरवळीच्या खतामधील सेंद्रिय द्रव्यांमुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणुंना अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. परिणामी जिवाणुंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमाने वाढते. जमिनीतील पोषक द्रव्ये रासायनिक क्रियेने विरघळून ती पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात. 

लवकर कुजणारी हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदचे प्रमाण आणी एझोटोबॅक्टरसारख्या जीवाणुंचे प्रमाण वाढते. 

जमिनीत टिकून राहणाऱ्या कणसमूहांचे प्रमाण वाढते. 

जमिनीची जलधारणा क्षमता वाढते. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूपही कमी होते. 

सेंद्रिय पदार्थांमुळे माती रवेदार होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत साचून न राहता. त्याचा निचरा लवकर होतो. हलक्या जमिनीत देखील सेंद्रिय पदार्थांमुळे पाणीधारण करण्याची क्षमता वाढते. 

द्विदल वर्गातील हिरवळीची पिके ही हवेतील नत्र शोषून घेतात आणि ते नत्र जमिनीत साठविले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते. 

क्षार जमिनीत हिरवळीचे पीक गाडण्यामुळे जमिनीतील क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीखाली आणता येतात.

हिरवळीच्या खताची पिके जमिनीत असेंद्रिय स्फुरदाचे सेंद्रिय स्फुरदात रूपांतर करतात व जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात. 

हिरवळीच्या पिकांच्या दाट वाढीमुळे तणांचा नायनाट होण्यास मदत होते. 

English Summary: For crop production increases use screen mirroring and some organic solutions Published on: 04 February 2022, 05:46 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters