शेतकरी बांधवांनो आपले पिके जमिनीतून ८० पेक्षा जास्त मुलद्रव्यांचे शोषण करतात. परंतू शोषण केलेली सर्व मूलद्रव्य पिकांच्या वाढीसाठी आवश्यक नसतात. यापैकी फक्त १७ मूलद्रव्य पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असल्याचे आढळून आले आहे. पिकांच्या वाढीसाठी कोणती मूलद्रव्य आवश्यक आहेत हे ठरविण्यासाठी मृद शास्त्रज्ञांनी प्रमाणके ठरविली आहेत. त्यानुसार पीक वाढीसाठी आवश्यक मूलद्रव्य ठरविण्याकरीता खालील तीन बाबींचा विचार करण्यात येतो
१. एखाद्या मूलद्रव्याच्या कमतरतूळे पिके त्यांची कायीक वाढआणि उत्पादकवाढ पुर्णपणे करू शकत नाहीत.
२. प्रत्येक मूलद्रव्यांची कमतरतेची लक्षणे ही विशिष्ट प्रकारची असून त्यावर उपाय करण्यासाठी त्याच विशिष्टअन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
३. मूलद्रव्याचा पिकांच्या वाढीमध्ये (चयापचय क्रियेध्ये) घटक अन्नद्रव्य म्हणून प्रत्यक्षपणे सहभाग असला पाहिजे.पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्ये
सद्यस्थितीत पिकांच्या वाढीसाठी एकूण १७ अन्नद्रव्यांची आवश्यकता सिद्ध झालेली आहे.
कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांना प्रुख अन्नद्रव्ये तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक यांना दुय्यम अन्नद्रव्ये आणि लोह, मंगल, बोरॉन, जस्त, तांबे, मोलाब्द, क्लोरीन व निकेल या अन्नद्रव्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये असे म्हणतात. पिके आवश्यक असणारी अन्नद्रव्ये तीन वेगवेगळ्या स्त्रोतामधून शोषण करतात. पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्ये आणि त्यांचे स्त्रोत खालील प्रमाणे आहेत.
स्त्रोत- हवा, पाणी
अन्नद्रव्य: कार्बन, प्राणवायू, प्राणवायू, हायड्रोजन
स्त्रोत: जमीन
अन्नद्रव्य: प्राथमिक अन्नद्रव्ये
नत्र, स्फुरद, पालाश
दुय्यम अन्नद्रव्वय
कॅल्शीयम, मॅग्नेशियम,गंधक,
सुक्ष्म अन्नद्रव्ये
लोह, मंगल, जस्त,तांबे ,मोलाब्द, निकेल बोरॉन, मोलाब्द, क्लोरीन, निके अशाप्रकारे वेगवेगळे अन्नद्रव्यांची ओळख शेतकऱ्यांना करून घेणे गरजेचे आहे त्यामुळे शेतीवरील होणारा वायफळ खर्च वाचू शकतो व पिकांना योग्य त्या प्रमाणात अन्नद्रव्यांची पुरवठा शेतकरी करू शकतो.
Mission agriculture soil information
मिलिंद जि गोदे
Share your comments