भारताचा शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात भाजीपाला वर्गीय पिकांची शेती करत असतात. भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड शेतकरी बांधवांना विशेष फायदेशीर ठरते कारण ती भाजीपाला वर्गीय पिके कमी कालावधीत उत्पादन देण्यास सुरुवात करतात. फुलकोबी देखील भारतात उत्पादित केले जाणारे एक प्रमुख भाजीपाला वर्गीय पीक आहे. याची शेती भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते.
आपल्या राज्यात देखील फ्लावर बहुतांशी ठिकाणी उत्पादित केला जातो. देशात भाजी म्हणून याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मित्रांनो पूर्वी सामान्यपणे फुलकोबीची भाजी विशेषतः थंडीच्या मोसमात उत्पादित केली जात असे. मात्र आता फ्लॉवरचे अनेक सुधारित वाण बाजारात आले आहेत, यामुळे आता याची लागवड शेतकरी बांधव दुसऱ्या हंगामातही करतात.
फुलकोबीची भाजी जेव्हा थंडीच्या मोसमात सुरुवातीच्या अवस्थेत येते तेव्हा त्याची किंमत साधारणपणे जास्त असते. पण मात्र आवक वाढली की इतर शेतमालाप्रमाणेच याचेही भाव खाली येतात. म्हणजेचं शेतकऱ्यांना काही दिवसच लाभ मिळतो.
अनेकवेळा फुलकोबीचे भाव इतके घसरतात की, शेतकऱ्यांचा खर्चही निघू शकत नाही, परंतु आता कृषी शास्त्रज्ञांनी अशा काही प्रगत जाती विकसित केल्या आहेत, ज्याची लागवड शेतकरी जून-जुलै महिन्यातही करू शकतात. सध्या बाजारात फुलकोबी उपलब्ध नाही. यामुळे त्यांना अधिक कमाई करण्याची संधी आहे.
या जाती निवडा
भारतीय कृषी संशोधन परिषद, पुसा, नवी दिल्लीच्या शासकीय विज्ञान विभागाचे कृषी तज्ज्ञ डॉ. श्रावण सिंग सांगतात, की खाली दिलेल्या जातीची पेरणी जून-जुलै महिन्यात केली जाते. सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत ते तयार होते.
पुसा मेघना, पुसा अश्विनी, पुषा कार्तिक, पुसा कार्तिक संकर या वाणांची लागवड करून शेतकरी फुलकोबीपासून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
आगात लावली जाणारी फुलकोबी
या जातींची आगात लागवड केली जाते. मात्र याची लागवड केल्यानंतर शेतकरी बांधवांनी शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. आगात फुलकोबीची पेरणी शेतात किडी व दीमक यांचा त्रास असताना करू नये. ज्या शेतात तुम्ही फुलकोबी पिकाची लागवड करत आहात, त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.
लवकरच काढणीसाठी तयार होते
फुलकोबीची आगात लावली जाणारी रोपे 40-45 दिवसांत तयार होतात. मात्र याची काळजी घ्यावी लागते आणि वेळेवर तण काढावे लागते. कीटक किंवा रोग आढळल्यास औषध फवारणी करावी. आगात लावली जाणारी फुलकोबी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास उपयुक्त ठरते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी पूर्ण तयारीनिशी शेती करून जास्तीत जास्त नफा मिळवावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
Share your comments