1. कृषीपीडिया

विदर्भव्यापी पुरग्रस्त; संकटग्रस्त क्षेत्रातील कार्यकर्ता मेळावा आज आयोजित

यावर्षी सततचे पावस व पुरांचे थैमानामुळे खरीप पिके जमिनीसह खरडून गेलीत

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
विदर्भव्यापी पुरग्रस्त; संकटग्रस्त क्षेत्रातील कार्यकर्ता मेळावा आज आयोजित

विदर्भव्यापी पुरग्रस्त; संकटग्रस्त क्षेत्रातील कार्यकर्ता मेळावा आज आयोजित

यावर्षी सततचे पावस व पुरांचे थैमानामुळे खरीप पिके जमिनीसह खरडून गेलीत व पिकांचे प्रचंड सार्वत्रिक अभूतपूर्व नुकसान झाले;अजूनही सततचे पावसामुळे हातातोंडाशी आलेले पिकांची हानी झाली;वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाले;शेतकय्रांना जगणे कठिण झाले;अशा या अस्मानी संकटात सुल्तानी सरकारने तातडीने जाणत्या राजाप्रमाणे मदत करणे आवश्यक

होते;परंतु राज्यात सरकार असल्याचे शेतकय्रां ना जाणवले नाही But the farmers did not realize that there is a government in the state;त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहे.

"युवा महोत्सव युवकांना कलाविष्कारांचे प्रदर्शनाचे हक्काचे व्यासपीठ"

महसुल अधि काय्रांनी पिके उत्कृष्ट पिके असल्याचे नियमबाहय व बनावट पिकांची पैसेवारी 50ते 65 पैसे काढून आबादीचे अहवाल सरकारकडे पाठविलेत. विदर्भात सार्वत्रिक आपत्कालीन दुष्काळ जाहिर व्हावा; दुष्काळी सवलती;थकित सर्व कर्ज व अन्य वसुल्या थांबवाव्यात; नुकसानग्रस्त सर्व

शेतकय्रांना तातडीने नैसर्गिक आपत्ती निधी;पिक विमा;वन्य प्राण्यांनी केलेली भरपाई रक्कम मिळावी;याकरीता विदर्भव्यापी शेतकरी कार्यकर्ता मेळावा;शेतकरी बचाओ आंदोलनाचे वतीने ग्रामपंचायत भवन;मोझरी;ता.तिवसा;जि.अमरावती येथे;दि.14 आक्टो.शुक्रवार रोजी ला दु.12 ते 3 वा.पर्यंत आयोजित करण्यात आला. मेळाव्यास अॅड.गजानन पुंडकर; उपाध्यक्ष;श्री.शिवाजी

शिक्षण संस्था;अमरावती;प्रबोधनकार सत्यपाल महाराज; मा.ज्ञानेश्वर रक्षक;शेतकरी नेते श्री.विजय विल्हेकर; सिकंदर शहा;प्रेमकुमार बोके ;शेतकरी बचाओ आंदोलनचे संयोजक भाई रजनीकांत;प्रमुख अतिथी व विदर्भातील डाॅ.धर्मेंद्र राज पूत;रवि गावंडे;डाॅ.गोवर्धन खवले;डाॅ.किशोर मोघे; गजानन जिकर;सुनिल लाजूरकर;आदि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.20 आक्टोबर पर्यंत

दिवाळीपूर्वी शासनाने प्रत्यक्ष मदत शेतकय्रांना मिळावी. अन्यथा व्यापक आंदोलना ची दिशा ठरविण्यात येईल;करीता विदर्भातील शेतकरी कार्यकर्यांनी उपस्थित रहावे;असे आवाहन मेळावा आयोजन समिती ग्राम श्री.सुरेंद्र भिवगडे;सरपंच;मोझरी; महादेवराव कांडलकर; अध्यक्ष;राजेश बोडखे; गजानन तडस; सुयोग बानाईत श्री.अमर वानखडे;सामाजिक कार्यकर्ते तिवसा आदिंनी केले आहे. 

 

विनित- सुरेंद्र भिवगडे;मो.989054 4603,

8275282833

English Summary: Flooded across Vidarbha; Worker meeting in distressed areas organized today Published on: 14 October 2022, 04:09 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters