प्रमाणित न केलेल्या बियाण्यास बीज प्रक्रिया करा.
खते व बियाणे दोन चाडी तिफणीने जमिनीत पेरा.
ओलिताखाली रब्बी पिकाची पेरणी केल्यानंतर पाणी देण्यासाठी सारा यंत्राच्या साह्याने सारे पाडा. सारा यंत्र नसल्यास वखराच्या पासाला दोरी बांधून सारे पाडा.
कडधान्य व गळीत धान्य पिकास स्फुरद हे सिंगल सुपर फॉस्फेटद्वारा द्यावे म्हणजे गंधकाचाही पुरवठा होतो.
हरभऱ्याचे सुधारित व अधिक उत्पादन देणारे वाण पेरावेत. पेरणीच्या वेळी 25 कि. नत्र व 50 कि. स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.
पूर्वहंगामी उसासाठी को.सी. 671, को-8014, को-86032, कोएम-265 या वाणांची लागवड करावी.
पूर्व हंगामी उसामध्ये बटाटा व कांदा ही पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत.
ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी गव्हाऐवजी, हरभरा, मोहरी, सूर्यफूल ही पिके पैरावीत.
रब्बी पेरणी करण्यास उशीर झाला असल्याने, लागवडीसाठी लवकर तयार होणारे आणि कीडरोगास बळी न पडणारे वाण पेरावेत.
पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशी नाशके व पीएसबीची बीज प्रक्रिया करावी.
पेरणी नंतर लगेच पाणी देण्यासाठी सारे पाडावेत.
पेरणीच्या वेळी घ्यावयाची मिश्र तसेच संयुक्त खते जमिनीत पेरूनच द्यावीत.
कोरडवाहू फळझाडात आच्छादनाचा व मटका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
केळीच्या बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस सकाळीच पाणी द्या. बागेभोवती सकाळी शेकोट्या पेटवाव्यात.
खत व्यवस्थापन
रब्बी पीक व्यवस्थापनात माती परीक्षण करून आवश्यकतेनुसार खताची मात्रा द्यावी. रब्बी हंगामामध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी योग्य प्रकारे खते देणे आवश्यक असते.
- गहू - वेळेवर पेरणीसाठी 100 ते 120 किलो नत्र, 50 ते 60 किलो स्फुरद व 50 ते 60 किलो पालाश वापरावे. शिफारशीपैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी वेळी द्यावे. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा 21 दिवसांनी द्यावी.
- रब्बी ज्वारी -
- कोरडवाहू ज्वारीसाठी हेक्टरी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 20 किलो पालाश पेरणीपूर्वी किंवा पेरणीवेळी जमिनीत पेरून द्यावे.
- ओलिताखालील रब्बी ज्वारीस पेरणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 30 किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर 30 दिवसांनी 40 किलो नग द्यावे. खते देताना जमिनीत ओल असावी.
- सूर्यफूल - पेरणीवेळी हेक्टरी 30 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 30 किलो पालाश सरीमध्ये पेरून द्यावे किंवा तिफणीने पेरणी करावयाची असल्यास खतेसुद्धा पेरून द्यावी. पेरणीनंतर 30 दिवसांनी 30 कि. नत्र द्यावे.
- हरभरा - कोरडवाहू हरभरा पिकासाठी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद तर बागायती हरभरा पिकासाठी 25 नत्र व 50 किलो स्फुरद लागवडीच्या वेळेस द्यावे.
- करडई - कोरडवाहू करडईसाठी 20 किलो नत्र, 20 किलो स्फुरद पेरणीवेळी द्यावे तर बागायती करडई पिकासाठी पेरणीवेळी 30 नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. व 30 दिवसांनी 30 किलो नत्र द्यावे.
- मिरची - 50-50-50 नत्र, स्फुरद व पालाश द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.
रब्बी पिकांची पाण्याची गरज
पाण्याची बचत करण्यासाठी फळझाडास/उसास ठिबक संचाद्वारा पाणी द्यावे.
पाण्याची कमतरता असल्यास पिकांना एकसरी आड पाणी द्यावे.
वरील तक्त्यानुसार रब्बी हंगामातील पाण्याची गरज असते. त्याप्रमाणे पिकांसाठी पाण्याचे नियोजन करावे.
पिकांना पाणी देण्याची अवस्था व वेळ
वरील तक्त्यावरून पिकांना वेगवेगळ्या अवस्थेत पाणी देणे महत्त्वाचे आहे. या वेळा कटाक्षाने पाळल्यास पिकांच्या वाढीसाठी उपयोग होऊन उत्पादन भर पडते.
Share your comments