कांदा पीक महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. विशेषतः नाशिक जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. परंतु बऱ्याचदा हवी तेवढी कांद्याचे उत्पादकता दिसून येत नाही. यामागचे प्रमुख कारण म्हणजे असंतुलित खत व्यवस्थापन हे होय. व्यवस्थित माती परीक्षण करून दर खताचे व्यवस्थापन केले तर कांद्याची उत्पादकता निश्चितच वाढू शकते. या लेखात आपण कांदा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार करावयाचे खत व्यवस्थापन याबद्दल माहिती घेऊ
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे पडणारा प्रभाव
- कांदापिकासमुख्यअन्नद्रव्यांसोबत तांबे, लोह, जस्त,मॅग्नेट बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते
- या सूक्ष्म अन्नद्रव्यांची जर कांदा पिकास कमतरता असली तर कांदे मऊ पडतात.
- कांद्याचा पापुद्रा ठीसूळ व फिकट पिवळा पडून गळून जातो.
- बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर रोपांची वाढ खुंटते, कांदा पातीचा रंग करडा निळसर होतो व पात कडक व ठिसूळ बनते.
- झिंग च्या कमतरतेमुळे पात जाड होते व खालच्या बाजूला वाकते.
- लागवडीच्यावेळी:
1-24:24:00हेखत 76 किलो, एम ओ पी चाळीस किलो, गंधक 20 किलो, मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो व सूक्ष्म अन्नद्रव्ये एक किलो ही सर्व खते एकत्र करून जमिनीतून द्यावी.
2-24:24:00 या खतांमध्ये नाइट्रेट व अमोनिकल या दोन्ही स्वरुपातील नत्र असते. त्यासोबत दोन टक्के गंधक सुद्धा असते.
3- यामुळे पिकाची जलद,निरोगी व शाकीय वाढ जोरदार होते. कांदा पातीचा हिरवेगार पणा जास्त काळ टिकून राहतो.
4- हे खत आम्लयुक्त असल्यामुळे जमिनीचा सामू व पोत सुद्धा सुधारतो. तसेच डेंगळे व जोड कांद्याचे प्रमाण कमी होते.
- सुरवातीची वाढीची अवस्था( लागवडीनंतर 30 दिवस )
1-10:26:26 60 किलो, मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो एकत्र करून जमिनीतून द्यावे.याच्या वापराने स्फुरदाची उपलब्धता सुधारते.
2- पिकाचा मुळांचा विकास होतो तसे अन्नद्रव्यांचे कार्यक्रम पोषण होते. कांद्याची पात विधारा ते तसेच कांद्याचा आकार एकसारखा गोलाकार मिळतो. एकूण उत्पादनात 12 ते 15 टक्केपर्यंत वाढ होऊ शकते.
- लागवडीनंतर 45 दिवसांनी:
- एसओपी( फिल्ड ग्रेड ) 20 किलो जमिनीतून द्यावे. कांदा पिकाच्या भरघोस वाढीसाठी लागणाऱ्या पोटॅशची गरज हे भागवते.
ई ) लागवडीनंतर 60 दिवसांनी:
1-00:52:34 हे खत चार ग्रॅम + सुषमा अन्नद्रव्य 1ग्राम एकत्र करून प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- याफवारणीचाफायदाहाकंदपोषणाच्याकाळातसूक्ष्मअन्नद्रव्यांचीकमतरताभासूनयेयासाठीहोतो.
- या फवारणीमुळे कंदाचा आकार वाढतो व कंद घट्ट होतात.
कंद वाढीची अवस्था साधारण लागवडीनंतर 75 ते 105 दिवस
- याकालावधीत00:00:50 हे खत पाच ग्रॅम + बोरं अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- यामुळे कांदा पक्व होण्यास मदत होते. बोरा मुळे पानात तयार झालेली शर्करा कंदातउतरते. कांद्याचे गुणवत्ता सुधारते व साठवण कालावधी देखील वाढतो.
Share your comments