जमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म हे सेंद्रिय कर्बामुळे प्राप्त होतात. अशी जमीन सुपीक आणि उत्पादनक्षम असते. सेंद्रिय कर्बाविना जमीन पीक उत्पादनासाठी अयोग्य होते. साधारणपणे ०.५ टक्के पेक्षा कमी सेंद्रिय कर्ब असणाऱ्या जमिनीचे आरोग्य खराब समजले जाते. ०.५ ते ०.८ टक्के सेंद्रिय कर्ब असणाऱ्या जमिनी मध्यम, ०.८ ते १.०
टक्के असणाऱ्या चांगल्या आणि एक टक्यांपेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असणाऱ्या जमिनी उत्तम समजल्या जातात.Soils with organic curbs are considered best. सेंद्रिय कर्ब हे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारून जमीन सुपीक व उत्पादक बनविण्याचे महत्त्वाचे कार्य करते.भौतिक गुणधर्मपोत हा मातीमधील रासायनिक खनिज पदार्थाच्या विघटनातून तयार झालेले वाळू कण, गाळाचे कण व चिकण कण यांच्या तुलनात्मक प्रमाणावरून ठरतो.
या तीनही मातीच्या कणांचे समतोल मिश्रण असणाऱ्या जमिनी पिकांच्या दृष्टीने उत्तम पोत असणाऱ्या समजल्या जातात.जमिनीतील सेंद्रिय कर्ब मातीच्या या तीन प्रकारच्या कणांच्या एकत्रीकरणातून लहान-मोठे मातीचे संच (ढेकळे) तयार करतात. या ढेकळांचा आकार व प्रकारानुसार जमिनींची विशिष्ठ संरचना तयार होते.
मोठ्या पोकळ्या आणि सूक्ष्म पोकळ्यांचे जाळे तयार होऊन जमीन सच्छिद्र बनते.सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी उपाय ः शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खते, जिवाणू खतांचा नियमित वापर.पिकांच्या शिल्लक अवशेषांचा पुनर्वापर.जमिनीची गरजेपुरती मशागत.जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा आच्छादनासाठी वापर.चांगल्या जमिनीतील घटक
डॉ. हिंमत काळभोर
Share your comments