1. कृषीपीडिया

हमखास उत्पन्न मिळवून देणारी जिरेनियम ची शेती

जिरेनियम हे पीक कोणत्याही जमिनीमध्ये आपण वर्षभर कधीही लागवड करू शकतो.या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते.एका एकरमध्ये 10,000 हजार रोप लागतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हमखास उत्पन्न मिळवून देणारी जिरेनियम ची शेती

हमखास उत्पन्न मिळवून देणारी जिरेनियम ची शेती

जिरेनियम हे पीक कोणत्याही जमिनीमध्ये आपण वर्षभर कधीही लागवड करू शकतो.या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते.एका एकरमध्ये 10,000 हजार रोप लागतात.आणी हे पिक एका वर्षात तीन वेळा कापणीला येते. एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो.इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये 75% खर्च कमी आहे.या पिकामध्ये आंतरपिक म्हणुन शेवगा हे पिक उत्तम असते.या शेवग्याच्या उत्पादनावर लागवडीचा खर्च निघून जातो.

      या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते,व कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती केली जाते.

 

        जिरेनियम ची शेती करताना एकरी पाच ते सहा ट्रॉली शेणखत वापरणे गरजेचे आहे. कारण जिरेनियम हे पीक तीन वर्ष आपल्या जमिनी मध्ये राहणार आहे. जिरेनियम ला रासायनिक खतांची गरज नसते. त्यामुळे आपण जेवढे शक्य होईल तेवढे शेणखत वापरणे गरजेचे आहे. 

जिरेनियम ची लागवड वर्षभर आपण कधीही करू शकतो. एकरी आठ ते दहा हजार रोप लागतात.

       जिरेनियम पिकाची जेवढी वाढ होईल तेवढे आपले उत्पादन जास्त येते आणि त्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते शेणखत. शेणखत जमिनीमध्ये मिसळून मे महिन्यामध्ये हलक्‍या जमिनीसाठी तीन फूट व भारी जमिनीसाठी चार फूट अंतरावर उसाच्या सरी प्रमाणे रुंद सरी काढून घ्यावी. त्यावर ड्रिप अंथरून हलक्या जमिनीमध्ये एक फुटावर व भारी जमिनीमध्ये दीड फुटावर जिरेनियम रोपांची लागवड करावी.

         लागवडीनंतर त्याला कोणतेही रासायनिक खत देऊ नये. जिरेनियम ची लागवड ही जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. त्यामुळे रोप व्यवस्थित सेट होते. त्यानंतर पहिल्या कटिंग ची वेळ ही ऑक्टोबर महिन्यामध्ये येते. कटिंग झाल्यानंतर व बुरशीनाशकांची फवारणी करून जमिनीमध्ये जिवाणूजन्य बुर्शिनाशक सोडावे. त्यानंतर प्रत्येकी तीन महिन्यांनी आपल्याला कटिंग करता येते.

वर्षभरामध्ये कोण कोणती खते व औषधांचा वापर करायचा आहे ते आपल्याला ज्यांच्याकडून प्लांट मिळतात त्यांच्याकडून माहिती मिळते. जिरेनियममध्ये कोणत्याही कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.

          पावसाळ्याच्या दिवसात फक्त बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी आपण बुरशीनाशक वापरणे गरजेचे आहे. इतर कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर रोग येत नसल्यामुळे आपला खर्च होत नाही.

        या पिकाला जनावरेसुद्धा खात नसल्यामुळे कोणत्याही भागामध्ये आपण याची लागवड करू शकतो. ज्यांची जमीन पडीक आहे व पाण्याची व्यवस्था आहे अशा जमिनीमध्ये सुद्धा वर्षाला तीन ते चार लाख रुपये आपण कमावू शकतो.

  ज्या शेतकरी मित्रांना जिरेनियम ची लागवड करायची आहे त्यांच्यासाठी उत्तम प्रकारची जिरेनियम ची रोपे देऊन वर्षभर लागणाऱ्या खत आणि औषधांचा पुरवठा आमच्याकडून केला जाईल. लागवडीपासून काढणीपर्यंत प्लॉट विजीट व संपूर्ण मोफत योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.

     ज्या शेतकरी मित्रांना जिरेनियम विषयी अधिक माहिती पाहिजे असेल त्यांच्यासाठी विनामूल्य चर्चासत्र असतात. यामध्ये कोणीही शेतकरी येऊ शकता. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आपण मला कधीही फोन करू शकता.

          अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमिच आहे.हे पिक फायदयाचे आहे,यात कुठला घाटा किंवा फसवेगीरी नाही, असे खुद्द शेतक-यांचे म्हणणे आहे.आणी हे पिक इनस्टंट अर्निंग देणार पिक आहे.

English Summary: Ferfect production give jiraniyam Published on: 10 January 2022, 06:42 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters