शेतकरी मित्रांनो मेथी एक प्रमुख भाजीपाला वर्गीय पीक (Vegetable Crop) आहे. हिवाळ्यात मेथीची भाजी, (Fenugreek vegetable) लोणची आणि लाडू बनवला जातो. या भाजीपाला तसेच मेथीच्या दाण्याला कडू चव असते पण त्याचा सुगंध खूप चांगला असतो. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.
खरं पाहता हे एक नगदी पीक मानले जाते. शेतकऱ्यांनी व्यावसायिक पद्धतीने मेथीची लागवड (Fenugreek cultivation) केल्यास चांगला नफा मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो (Farmers) जर मेथीची लागवड करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी. आज आपण मेथीच्या काही सुधारित जातींची माहिती जाणुन घेणार आहोत. जेणेकरून शेतकरी बांधवांना मेथीच्या भाजीची लागवड फायदेशीर ठरू शकते. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्वपूर्ण माहिती विषयी.
महत्वाच्या बातम्या:
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारतात, पंजाब, राजस्थान, दिल्लीसह सर्व उत्तर भारतात याची यशस्वीपणे लागवड केली जाते. राजस्थान आणि गुजरात ही देशातील प्रमुख मेथी उत्पादक राज्ये आहेत. असे असले तरी महाराष्ट्रातही याची लागवड केली जाते. मेथीचे 80 टक्क्यांहून अधिक उत्पादन राजस्थानमध्ये होते. मेथीची लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात केली जाते, परंतु दक्षिण भारतात याची लागवड पावसाळ्यात केली जाते.
कसुरी मेथी- ही जात भारतीय कृषी संशोधन परिषद, दिल्लीने विकसित केली आहे. या जातींचे पाने लहान व विळ्याच्या आकाराची असतात. या मधून 2-3 वेळा बियाण्याची काढणी करता येते. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही उशिरा फुलते आणि पिवळ्या रंगाचे असते, याला विशिष्ट प्रकारचा वास देखील असतो. या जातीला पेरणीपासून बियाणे तयार होईपर्यंत सुमारे 5 महिने लागतात. त्याचे सरासरी उत्पादन हेक्टरी 65 क्विंटल आहे.
लॅम सिलेक्शन - दक्षिणेकडील राज्यांमध्ये ही जात बियाणे घेण्याच्या उद्देशाने घेतली जाते. ही वनस्पती सरासरी उंचीची आहे, परंतु झाडी आहे. यामध्ये अधिक शाखा निघतात.
पुसा अर्ली बंचिंग- मेथीची ही लवकर पक्व होणारी जात देखील ICAR ने विकसित केली आहे. त्याची फुले गुच्छात येतात. यामध्ये 2-3 वेळा काढणी करता येते. त्याच्या शेंगा 6-8 सेमी लांब असतात. या जातीचे बियाणे ४ महिन्यांत तयार होते.
UM112- सरळ वाढणाऱ्या मेथीच्या काही जातींपैकी ही एक आहे. त्याची झाडे सरासरीपेक्षा उंच आहेत. ही जातं भाजीपाला म्हणुन आणि बियाणे उत्पादित करणे हेतू या दोन्ही बाबतीत चांगली आहे.
काश्मिरी- मेथीची काश्मिरी या जातीची बहुतेक वैशिष्ट्ये पुसा अर्ली जातीशी मिळतीजुळती आहेत परंतु ही 15 दिवसांनी उशीरा पक्व होणारी जात आहे. ही जात जास्त थंड सहन करणारी आहे. या जातीच्या मेथीची फुले पांढर्या रंगाची असून शेंगांची लांबी 6-8 सें.मी. असते. डोंगराळ भागासाठी ही एक चांगली जातं आहे.
हिसार सुवर्णा- चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठ, हिसार यांनी विकसित केलेली ही जात भाजीपाला म्हणुन आणि बियाणे म्हणुन दोन्हीसाठी चांगली आहे. या जातींचे सरासरी उत्पादन 16 क्विंटल प्रति हेक्टर आहे. यामध्ये सर्कोस्पोरा लीफ स्पॉट रोग आढळत नाही. हरियाणा, राजस्थान आणि गुजरातसाठी ही योग्य जात आहे. या वाणांव्यतिरिक्त सुधारित मेथीचे वाण RMT 1, RMT 143 आणि 365, हिस्सार माधवी, हिसार सोनाली आणि प्रभा हे देखील चांगले उत्पादन देतात.
Share your comments